माहिती अद्ययावत करणे चालू आहे, तुम्ही तुमचे योगदान देऊ शकता.
वाण:
श्रीवर्धनी
लागवड:
लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत. लागवड करण्यासाठी 2.7 x 2.7 मीटर अंतरावर 60 सें.मी. x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा. लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, 12 ते 18 महिने वयाची रोपे निवडावीत. रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत. उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी. रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.
उत्पादन:
या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो. योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन कि.ग्रॅ. उत्पादन मिळते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.