दुष्काळी भागात मासेपालन हे नव्याने उदयास आलेला कृषिपूरक व्यवसाय आहे. आतापर्यंत फक्त नदी, समुद्र, मोठे तलाव अश्या मोठ्या पाणीसाठ्यावर चालणारा व्यवसाय आता घराघरापर्यंत पोहचला आहे. वि.स.पागे यांनी शेततळे संकल्पना दुष्काळी भागात वरदान ठरली आहे. शेततळे जरी उपयोगी असले तरी जागा उपलब्धता कमी असल्यामुळे बहुतांशी शेतकरी यापासून दूर राहतात. परंतु शेततळ्यामध्ये मासेपालन केल्यास शेतकऱ्यांना अगदी कमी गुंतवणुकीमध्ये कृषिपुरक व्यवसाय चांगल्या उत्पन्नाची हमी देणारा व्यवसाय ठरत आहे.
बिरणवाडी (तासगाव, जि.सांगली) येथे उपजीविका विकास अंतर्गत मासेपालन करिता उपयुक्त साहित्य महेश बोरगे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यावेळी उपस्थित गावचे प्रतिष्ठित नागरिक, लाभार्थी ... |
उपलब्ध जमीन आहे तशीच राहणार आहे. लोकसंख्यावाढीमुळे आहे त्या जमिनीत प्रति मानसी जमीनधारणा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. यावेळी आहे त्या उपलब्ध क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. आमच्या काही लाभार्थी घटकांनी स्वतः भूमिहीन असताना दुसऱ्यांचे शेततळे भाड्याने घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. आज ते अगदी अल्पगुंतवणुकीमध्ये स्वतःच्या पायावर उभे आहेत. स्वयंसहाय्यता गटांच्या (SHG) माध्यमातुन या क्षेत्रात यशस्वी व्यवसाय शृंखला तयार होते. जसे कि ग्रामीण भागातील SHG गट उत्पादन, संचयन, वेष्टन आणि वाहतूक करतील तर शहरी भागातील SHG गट संकलन, वितरण आणि गुणवत्ता नियंत्रणाचे काम करतील. व्यवसायाच्या प्रत्येक स्तरावर आम्ही संसाधने व्यवस्थापन करण्याचे काम करून स्तंभाचे काम करीत आहोत. मासेपालन सोबत त्यांना सेवा पुरवठा करण्यासाठी इतर उद्योगही उभे राहतात. परिणामी शाश्वत ग्रामीण विकास होणे शक्य होईल.
मासे पालनासोबत झिंगा पालन पण करता येते कारण तळाला असलेले माश्यांनी न खाल्लेले अन्नपदार्थ झिंगे खातात त्यासाठी अतिरिक्त व्यवस्थापन आवश्यक नाही शिवाय पाण्यात वाढणारे कीटक, पतंगांच्या लार्वा खाते त्यामुळे एक प्रकारे स्वच्छतेचे काम यांच्यापासुन होते. एका हेक्टर मध्ये जवळपास 15000 बीज आवश्यक असते. मासे पालनासोबत झिंगा पालन असल्याने स्वतंत्र खाण्याची व्यवस्था करावी लागत नाही तरीही सहा महिन्यात 100 ते 150 CM लांब आणि 70 ते 80 Gram वजनाचा झिंगा मिळतो. मासे पालनासोबत सिंघाडा उत्पादन केले तर नैसर्गीक खत आणि मास्यांना अन्न मिळते. याची पाने मासे खातात तर पाण्यात पडलेल्या पानांमुळे प्रवाळ वाढते तेही मास्यांना खाद्य म्हणुन उपयोगी येते.
शासकीय योजनांतर्गत व्यावसायिकाला ३० व १० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, नायलॉन दोरी, प्रशिक्षण स्थळापर्यंत येणे-जाने प्रवास भत्ता अश्याप्रकारच्या सुविधा दिल्या जातात. शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पण विमा योजना लागू आहे. व्यावसायिक स्तरावर प्रोत्साहन देण्याकरिता वैयक्तिक व सहकारी तत्वावरील एकत्रित लाभार्थ्यांना अनुदान / कर्ज उपलब्ध करून दिले जाते.