नवीन बागेची रचना आणि कलम भरणे
द्राक्षबाग ही जवळपास 12 ते 14 वर्षे उत्पादन देत असते. द्राक्ष हे खुप संवेदनशील पिक आहे. उदा. ख़त, पाणी व्यवस्थापन या पिकात घडनिर्मितीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येक वेलीच्या मुळाजवळ एकसारख्या दाबाचे पाणी मिळणे गरजेचे होते.
पाहिले पाणी मोकाट पद्धतीने दया. माती समपातळीत करून घ्या. पाणी देवून वाफसा आलेवर नर्सरी लावावी. नर्सरीकरीता रूट स्टॉक, बेंगलोर डोगरीच्, अमेरिकन डोगरीच् यापैकी एकाची निवड करावी.
आखणी
|
चर
|
चर भरणे
|
भारी जमीन - लागन टाळावी. दोन ओळींतील १० फूट, तर दोन वेलींतील अंतर ०६ फूट
ठेवा.
हलकी जमीन - दोन ओळींतील नऊ फूट, तर दोन वेलींतील अंतर हे ५
फूट ठेवा.
|
मुळांचा विस्तार चांगला व्हावा या दृष्टीने
चरी घ्याव्यात. २ X २ फूट खोल अशी चर घ्यावी.
२०० फुटांपेक्षा जास्त लांबी नसावी.
|
चर भरताना खालची माती वर आणि वरची माती खाली
घालवावी. चर 10 ते 15 दिवस उन्हात चांगली तापुन द्यावी. खालच्या एक फूटानंतर शेणखत, हिरवळीचे खत (उपलब्ध असेल तर) पसरावे. शेणखत, सिंगल
सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून चर
भरा.
|
कलम भरणे
खुंटकाडी
|
सायन काडी
|
1) बागेत ज्या खुंटकाडीवर आपण कलम करणार आहोत, त्या काडीवर कलम करण्याकरिता सरळ वाढणारी, सशक्त (8-10 मि.मी. जाड) आणि रसरशीत काडी असल्यास कलम यशस्वी होण्यास चांगली मदत होते.
2) खुंटकाडी रसरशीत नसेल तर कलम करण्याच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ठिबक सिंचनाद्वारे भरपूर पाणी द्यावे.
|
1) कलम करण्यापूर्वी सायन काडी ही विशेषतः रोगमुक्त, सतत जास्त उत्पादन देणाऱ्या वेलीवरून परिपक्व काडी निवडा.
2) परिपक्व काडी बाहेरून पूर्ण खाकी रंगाची दिसते, काप घेतल्यानंतर त्यामधील पीथ हे पूर्णपणे तपकिरी रंगाचे दिसते.
3) द्राक्षकाडीची निवड सुरवातीस जास्त क्षेत्रामध्ये लागवड करण्यापेक्षा थोड्या वेलीवर कलम करून त्याचा अनुभव घेऊन ठरवावे.
|
आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या...