मुग व उडीद लागणीपासुन काढणी पर्यंत सर्व माहिती
(शेतकऱ्यांनी या माहितीचा उपयोग संदर्भाकरिता
करावा, प्रत्यक्षात वस्तुस्थितीनुसार स्वतःच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करावी)
खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मुग व उडीद ही
महत्त्वाची पिके आहेत. दुबार तसेच एकत्र पिकासाठी ही महत्त्वाची पिके आहेत.
जमीन – या कडधान्यासाठी मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन लागते.
पूर्वमशागत – उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरणी करून घ्यावी. जमीन चांगली
तापल्यावर पावसाळा सुरु झाल्यावर कुळवून घ्यावी. याच बरोबर हेक्टरी ५ पाच टन
चांगले कुजलेले शेणखत घालावे.
बियाणे –
सुधारित वाण –
मुग >> वैभव, BMR 145 विशेषता –
रोगप्रतिकारक व अधिक उत्पन्न देणारे वाण.
उडीद >> TPU-4, TAU-01 विशेषता – पक्वतेचा
काळ २ ते २.५ महिने
पेरणीची वेळ – मान्सूनचा पहिला पाऊस झालेनंतर जुनच्या २रया आठवड्यापासुन जुनअखेर
पेरणी करावी. पेरणीस होणारा वेळ उत्पादनात घट होते.
बीजप्रक्रिया – पेरणीपुर्वी ०१ किलो बियाण्यास ५ ग्राम ट्रायकोडर्मा + २५ ग्राम
रायझोबियम + २५ ग्राम PSB ही जीवाणूची पावडर गुळाच्या पाण्यात मिसळुन लावावी. ट्रायकोडर्मामुळे
बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळाच्या गाठी वाढून नत्राचे
प्रमाण वाढते. PSBमुळे जमीनीतील स्फुरद्युक्त होऊन विकास होतो.
पेरणी – पेरणीसाठी दोन ओळीमधील अंतर ३० सेमी आणि दोन रोपांमधील अंतर १० सेमी
असावे. या पिकांमध्ये तुरीचे पिक घ्यावयाचे झालेस २ ते ४ ओळीनंतर १ ओळ तुरीची
पेरणी करावी.
खतमात्रा – या दोन्ही कडधान्यांना हेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद द्यावे
लागते.
आंतरमशागत – ही कडधान्ये ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावी. यासाठी दोन वेळा कोळपणी
आणि एक वेळ खुरपणी करून घ्यावी.
पाणी व्यवस्थापन – कोरडवाहु पिके असल्यामुळे शक्यतो पाणी लागत नाही परंतु फुलोरा आणि
शेंगा भरावयाच्या वेळी पाऊस नसेल आणि ओलाव्याची कमतरता भासल्यास हलके पाणी द्या.
कीड नियंत्रण –
मुग – रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव – मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति
हेक्टरी फवारावे.
भुरी, पिवळा विषाणू – नियंत्रणासाठी पानात
मिसळणारे गंधक १२५० ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम २५० ग्राम + ३०% प्रवाही मोनोक्रोटोफॉस
५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुबार
फवारणी घ्या.
उडीद – केसाल आळी – नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे उपटुन सर्व आळ्या
नष्ट करा.
भुरी, पिवळा विषाणू – नियंत्रणासाठी पानात
मिसळणारे गंधक १२५० ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम २५० ग्राम + ३०% प्रवाही मोनोक्रोटोफॉस
५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुबार
फवारणी घ्या.
साठवण – साठवणीपुर्वी मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून
कडुनिंबाची पाने मिसळुन पोत्यात किंवा टाकीत साठवावे.
सरासरी उत्पादन – मुग – १२ ते १५ क्विंटल उडीद –
१० ते १२ क्विंटल