माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे……
- संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी
सध्या कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. परंतु शनिवार, रविवारपर्यंत सांगली, सोलापूर आणि पुणे विभागांमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे सध्या बऱ्याच विभागांमध्ये सकाळी दव पडत आहे. ते कमी होईल किंवा पडणार नाही. असे झाल्यास डाऊनीचा धोका कमी होईल. सध्या बऱ्याच विभागांमध्ये शेंड्यावरती वाढणाऱ्या पानांवरती डाऊनी दिसत आहे. सध्या अशा प्रकारच्या डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होणार नाही. परंतु ढगाळ वातावरणामध्ये जुनी जिवंत असलेली डाऊनी फुलण्याची शक्यता आहे. परंतु अशी फुललेली डाऊनी दिसल्यास नियंत्रणासाठी जास्त फवारणीची जरुरी नाही.
1) जर छाटणीनंतर 50 दिवसांपुढे बाग पोचलेली असल्यास अशा बागेमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड 2 ते 3 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 2 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शक्य झाल्यास शेंड्याच्या काही पानांवर वाढलेली डाऊनी काढून टाकावी.
2) जर फुलोऱ्याच्या जवळपास बाग असल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. डायमिथोमार्फ (50 टक्के) 1 ग्रॅम व मॅन्कोझेब दोन ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपीनेब संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपामीड 0.65 मि.लि. प्रति लिटर अधिक दोन ग्रॅम मॅन्कोझेब, सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर मिसळून फवारावे.
3) फुलोऱ्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी दोन फवारण्यांतील अंतर आता पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढविल्यास धोका राहणार नाही.
भुरीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना -
1) ढगाळ वातावरणामध्ये विशेषतः काड्या व घडांची जास्त गर्दी असलेल्या बागांमध्ये वेगाने भुरी वाढू शकते. अशा बागांमध्ये आता भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी आवश्यक आहे. बागा छाटणीनंतर 50 ते 60 दिवसांपर्यंत असल्यास डिनोकॅप 25 मि.लि. प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
2) फुलोऱ्याच्या जवळपासच्या बागांमध्ये हेक्झाकोनॅझोल 5 ईसी 1 मि.लि. प्रति लिटर किंवा फ्ल्यूसिलॅझोल 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्या ठिकाणी अगोदरच भुरी वाढलेली असेल, अशा ठिकाणी या बुरशीनाशकांच्या बरोबरीने पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास चांगले नियंत्रण मिळेल.
3) गर्दी असलेल्या बागांमध्ये आतल्या भागापर्यंत बुरशीनाशकाची फवारणी चांगल्या प्रकारे पोचत नाही, म्हणून प्रथम बागेतील गर्दी झालेली खालची पाने काढून बुरशीनाशकाची फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळेल.
4) फळधारणा झाल्यानंतर फ्ल्यूसिलॅझोल आणि हेक्झाकोनॅझोलची फवारणी शक्य नाही. असे केल्यास रेसिड्यूचा धोका वाढेल. छाटणीनंतरच्या 60 दिवसांनंतर डायफेनकोनॅझोल अर्धा मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल 0.75 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून भुरीच्या नियंत्रणासाठी रेसिड्यूचा धोका न घेता वापरणे शक्य आहे
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444
No comments:
Post a Comment