Search here..

Saturday, December 6, 2014

हवामान अंदाज (दि.०६/१२/२०१४ ते १५/१२/२०१४) करिता

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान कडुन प्रसारित हवामान अंदाज (दि.०६/१२/२०१४ ते १५/१२/२०१४) करिता

*** प. महाराष्ट्र
(सांबरा, बेळगाव येथुन प्राप्त माहितीनुसार)
तापमानः १५ ते ३१°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१४ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

मंगळवार पर्यंत वातावरन कोरडे राहील. बुधवारपासुन पुढे वातावरन ढगाळ राहील. शुक्रवार,  शनिवार तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात पहाटेची सापेक्ष आद्रता वाढलेली राहील.

*** खाणदेश

तापमानः १० ते ३३°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१४ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

वातावरन कोरडे राहील.

*** मराठवाडा

तापमानः १५ ते ३१°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१४ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

मंगळवार पर्यंत वातावरन कोरडे राहील. बुधवारपासुन पुढे वातावरन ढगाळ राहील. शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात पहाटेची सापेक्ष आद्रता वाढलेली राहील.

*** िवदर्भ
तापमानः १० ते ३१°
आद्रता: २९ - ५६%
हवादाब : १०१८ hPa
दृश्यता: ०८ km
वारा - ०५ km/hr (प.)

मंगळवार पर्यंत वातावरन कोरडे राहील. बुधवारपासुन पुढे वातावरन ढगाळ राहील.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला आमचेसोबत सामाजिक काम करावयाचे असल्यास mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
* शेतीविषयक माहितीसाठी तुमचे नाव, संपुर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Tuesday, December 2, 2014

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे…… - संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे……
- संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी

सध्या कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्‍यता नाही. परंतु शनिवार, रविवारपर्यंत सांगली, सोलापूर आणि पुणे विभागांमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे सध्या बऱ्याच विभागांमध्ये सकाळी दव पडत आहे. ते कमी होईल किंवा पडणार नाही. असे झाल्यास डाऊनीचा धोका कमी होईल. सध्या बऱ्याच विभागांमध्ये शेंड्यावरती वाढणाऱ्या पानांवरती डाऊनी दिसत आहे. सध्या अशा प्रकारच्या डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होणार नाही. परंतु ढगाळ वातावरणामध्ये जुनी जिवंत असलेली डाऊनी फुलण्याची शक्‍यता आहे. परंतु अशी फुललेली डाऊनी दिसल्यास नियंत्रणासाठी जास्त फवारणीची जरुरी नाही.

1) जर छाटणीनंतर 50 दिवसांपुढे बाग पोचलेली असल्यास अशा बागेमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड 2 ते 3 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 2 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शक्‍य झाल्यास शेंड्याच्या काही पानांवर वाढलेली डाऊनी काढून टाकावी. 
2) जर फुलोऱ्याच्या जवळपास बाग असल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. डायमिथोमार्फ (50 टक्के) 1 ग्रॅम व मॅन्कोझेब दोन ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपीनेब संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपामीड 0.65 मि.लि. प्रति लिटर अधिक दोन ग्रॅम मॅन्कोझेब, सायमोक्‍झॅनील अधिक मॅन्कोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर मिसळून फवारावे. 
3) फुलोऱ्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी दोन फवारण्यांतील अंतर आता पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढविल्यास धोका राहणार नाही. 

भुरीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना - 
1) ढगाळ वातावरणामध्ये विशेषतः काड्या व घडांची जास्त गर्दी असलेल्या बागांमध्ये वेगाने भुरी वाढू शकते. अशा बागांमध्ये आता भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी आवश्‍यक आहे. बागा छाटणीनंतर 50 ते 60 दिवसांपर्यंत असल्यास डिनोकॅप 25 मि.लि. प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
2) फुलोऱ्याच्या जवळपासच्या बागांमध्ये हेक्‍झाकोनॅझोल 5 ईसी 1 मि.लि. प्रति लिटर किंवा फ्ल्यूसिलॅझोल 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्या ठिकाणी अगोदरच भुरी वाढलेली असेल, अशा ठिकाणी या बुरशीनाशकांच्या बरोबरीने पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास चांगले नियंत्रण मिळेल. 
3) गर्दी असलेल्या बागांमध्ये आतल्या भागापर्यंत बुरशीनाशकाची फवारणी चांगल्या प्रकारे पोचत नाही, म्हणून प्रथम बागेतील गर्दी झालेली खालची पाने काढून बुरशीनाशकाची फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळेल. 
4) फळधारणा झाल्यानंतर फ्ल्यूसिलॅझोल आणि हेक्‍झाकोनॅझोलची फवारणी शक्‍य नाही. असे केल्यास रेसिड्यूचा धोका वाढेल. छाटणीनंतरच्या 60 दिवसांनंतर डायफेनकोनॅझोल अर्धा मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल 0.75 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून भुरीच्या नियंत्रणासाठी रेसिड्यूचा धोका न घेता वापरणे शक्‍य आहे
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Monday, December 1, 2014

आपल्या गावात दुर्देवानी शेतकर्यांचा अपघाती मृत्यु झाला तर ....

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
शेतकरी बाधंवाना महत्वाची सुचना....
संकलन - मनोज ओ. लोखंडे, कृषि विभाग, वसमत

आपल्या गावात दुर्देवानी शेतकर्यांचा अपघाती मृत्यु झाला तर महाराष्ट्र शासन, कृषि विभाग मार्फत '' शेतकरी अपघात विमा योजना अंर्तगत 100000/- ची मदत केली जाते. त्यासाठी लागणारी कागदपत्राचा तपशील

1. 7/12
2.होंल्डीग
3.गावनमुना 6-ड
4.गावनमुना 6-क
5.तलाठी प्रमाणपत्र (गोल शिक्का)
6.वयाचा पुरावा
7.FIR
8.मृत्यु /अपंगत्वाचा दाखला
9.घटना स्थळाचा पंचनामा (पोलीस सांक्षाकीत)
10.मरणोत्तर पंचनामा (पोलीस सांक्षाकीत) 11.पोस्टमार्टम पंचनामा
12.ड्रायव्हिग लायसन्स (मोटारसायकल अपघात)
13.MSEB report (विजेचा शॉक लागुन)
14.पासबुक झेराक्स (क्लेम धारक)
15.रहिवाशी प्रमाणपत्र

अधिक माहीतीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा

कृपया विनंती जवळील शेतकरी बाधंवाना ही माहीती सागंणे.
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444