भाजीपाला काळजी (150929)
-इरफ़ान शेख,केज,बीड
* रब्बी हंगामात वाटाणा, कोबी, फुलकोबी, लसूण, टोमॅटो पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची तयारी करून लागवड करण्यास सुरवात करावी.
* ज्या भागात भाजीपाला पिकांची लागवड झालेली असेल तिथे सध्याच्या वातावरणामुळे बऱ्याचशा भाजीपाला पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
* कांदा पिकावर फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १५ मिली अधिक मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* टोमॅटो पिकावर लागवडीनंतर रस शोषणाऱ्या किडीसाठी इमिडाक्लोप्रीड ५ मिली किंवा थायामेथॉक्झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी.
*टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी प्रथम पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरत आत शिरून गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १० मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १टक्के + ट्रायझोफॉस १० टक्के हे संयुक्त कीटकनाशक २० मिली अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बन्डाझीम १० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार अधूनमधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करावे.
* कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकावे आणि नष्ट करावेत.
* तोडणीवेळी कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
* ल्युसील्युर कामगंध सापळे एकरी ४० या प्रमाणात वापरावेत. त्यातील ल्यूर दोन महिन्यांनी बदलावा.
* अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्के + ट्रायझोफॉस ३५ टक्के कीटकनाशक २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* गरजेनुसार अधून-मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर वातावरणामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444
No comments:
Post a Comment