कृषि विस्तारात बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर
महाराष्ट्राची विशेषतः मराठवाड्याची शेती अविकसित असण्याच्या अनेक कारणा पैकीच एक सर्वात मोठ कारण म्हणजे कृषि तंत्रज्ञानाचा अल्प विस्तार होय. अशी हजारो संशोधन आहेत जी लोकोपयोगी,शेतीतीत अल्प खर्चीक तंत्र आहेत पण दुर्दैवाने ती अद्याप सामान्य शेतकर्यांत रूजली, पोचली नाहीत. कृषि विस्ताराच मूलतत्व “ Learning by Doing” ( प्रात्यक्षिकातून शिकणे) हे होय. हे न होण्या मागचा मोठा अडथळा हा कुशल मनुष्य बळाचा अभाव होय.हा प्रश्न आत्ता काही अंशी सुटत असला तरी सुधारनेस आणखीन प्रचंड वाव आहे.सुधारणेचा वेगही कमीच आहे.
दरम्यानच्या कालावधीत तंत्रज्ञान विशेषतः माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होताना दिसते आहे.जादूची कांडी फिरवण्या इतका आयटी क्षेत्राचा वेग वाढतोय. “सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानात शोधणं कदाचीत चूक ठरेलही पण या क्षेत्राचा वापर न करता निव्वळ दुर्लक्ष करन मात्र नक्कीच चूक ठरेल”.
शासकीय पातळीवर कृषि क्षेत्रात माहिती तंत्राचा वापर करण्याचा वेग गरजेपेक्षा कमी आहे पण याला नजुमानता खूप सारी खाजगी मंडळी आता या कृषि क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत, वेगाने आकर्षित होत आहेत. यातल्या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी आणखीन एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. माझ्या महितीतील एका कृषि मंडळात ३२ गाव आहेत आणि मागच्या साधारणपणे ३ वर्षाहून अधिक कालावधी पासून ४-६ कृषि कर्मचारी/अधिकारी या गावांचे अतिरिक्त वा नियमित काम पहात आहेत. एका कृषि सहाय्यकास २५०० हे. क्षेत्रावर काम करणे अपेक्षित असते पण इथे क्षमतेपेक्षा ४ ते ५ पट अधिक प्रभार आहे. असे अनेक ठिकाणी आहे. असे असताना मग ग्रामस्तरावरील कृषि कर्मचारी प्रतेक शेतकर्यां पर्यन्त पोचणे कसे शक्य होईल?
कृषि तंत्रज्ञान प्रसारातील आयटी वापरासाठी शासकीय पातळीच्या प्रयत्नांपुढे जाऊन खालील काही मंडळी काम करत आहेत.
१) भारत४इंडिया.कॉम- वेब चॅनल आणि मोबाईल अॅपद्वारे (व्हीडीओबेस) कृषी क्षेत्रातील घडामोडी, कृषी संस्कृती, संशोधन, यशोगाथा, नवीन प्रयोग, मार्केट तंत्र. शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणार नवीन माध्यम या बाबत माहिती इथे दिली जात आहे.
२) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस- M Krishi- शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे कृषी सल्ला. ग्राफ, Pictureचा वापर करून कृषि तंत्रज्ञान प्रसारित करण्यात येत आहे..
३) थॉमसन रॉयटर्स- रॉयटर्स मार्केट लाईट (myRML): मोबाईल SMSद्वारे शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती, स्पीड, अॅक्युरसी आणि फ्रीडम फ्रॉम बायस या तत्त्वांचं पालन. या सेवेचा भारतभर स्थानिक भाषेत प्रसार हवामान, आणि एप्प्लीकेशनच्या माध्यमातून हवामान अंदाज, नियमीत बाजारभाव,प्रमुख पीक निहाय शेती सल्ला दिला जात आहे.
४) इफको-एअरटेल- IKCL: मोबाईलद्वारे शेतीविषयक माहिती. व्हॉईस मेसेजद्वारे सेवा दिली जात आहे ज्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांनाही फायदा मिळतोय.
५) आय.आय.टी., मुंबई- अॅग्रोकॉम: वेबसाईटद्वारे शेतीविषयक माहिती, तज्ज्ञांचं मोठं जाळे आणि युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय.
६) मायक्रोसॉफ्ट- डिजीटल ग्रीन- व्हीडिओ डॉक्युमेंटरीद्वारे इंडिजीनस कृषी ज्ञानाचा प्रसार. शेतकऱ्यांच्या इनॉव्हेटिव्ह प्रयोगाच्या प्रसारावर भर दिला जात आहे. छोट्याच पण उपयुक्त विडिओ क्लिप्सच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान प्रसार केला जात आहे.
७) नोकिया- नोकिया लाईफ- मोबाईलवरून शेती, शिक्षण, मंनोरंजनविषयक माहिती दिली जात आहे. कृषी क्षेत्रात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा (ICT) म्हणजेच नवीन माध्यमांचा (वेब, डिजीटल, मोबाईल, सोशल) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फायदा प्रगतशील युवा शेतकऱ्यांना शेतमालाचं गुणवत्ताक्षम अधिक उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचं प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी होत आहे. म्हणूच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) युगातील तळागाळातील आपला शेतकरी खऱ्या अर्थानं `ग्लोबल` (Global+Local) बनत आहे.
८) व्हाटसप्प सोशल मीडियाचा कृषि क्षेत्रात वापर: कृषि-उन्नती,माझी शेती फाउंडेशन,आम्ही शेतकरी ग्रुप,श्री. संजीव माने, आष्टा, इत्यादि मार्फत नियमित कृषि संबंधी मोफत शेतकरी सल्ला दिला जातोय. याची दखल तर मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी अमेरिकेत जाऊन सांगितली. या माध्यमातून कृषि क्षेत्रातील ऑडिओ,विडियो, मोठ्या प्रमान्त टेक्स्ट,या माध्यमातून वेगवेगल्या कृषि प्रश्नां संबंधी मागच्या दीड ते दोन वर्षा पासून जागृती कार्य सुरू आहे.
९) अप्प्स: गूगल प्ले स्टोर ला कृषि संबंधी अॅग्रिकल्चर इन्फॉर्मेशन अप्प, क्रॉप इन्फो अप्प, योजनांची माहिती देणारे अप्प, कृषि निविष्ठांची माहिती देणारे अप्प, मार्केट लिंकेज देणारे अप्प असे अनेक एप्प्लीकेशन इत्यादीच्या माध्यमातून शेतकर्यांना नियमित माहिती मिळते आहे.
१०) फेसबूक: या सामाजिक माध्यमाने तर जगभर क्रांती घडवणारी आंदोलने,उठाव निर्माण करण्यास वापर झाला आहे. मग याला शेती क्षेत्र तरी कसा अपवाद ठरेल. कृषि संबंधी माहिती चर्चीले जाणारे अनेक फेसबूक पेजेस आहेत. ज्यावर कृषि संबंधी अनेक बाबींची चर्चा होताना, यशोगाथा शेअर करताना, प्रशोणोत्तर चर्चा करताना दिसतात.या अश्या एकना अनेक तंत्रज्ञान टूल्सचा आलेख देता येईल.
इंटरनेट व सामाजिक माध्यम आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. मोबाइलच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांनी आज जगभरात क्रांती घडवली आहे. या सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलंय. कुठल्याही क्षणी, कुठल्याही गोष्टीवर आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपले मत व्यक्त करण्याच स्वातंत्र्य सोशल मीडियानं आपल्याला दिलं आहे. चांगल्या गोष्टी, विनोद, आपले आनंदाचे क्षण, आपल्या मनातील भावना सहज दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचं व्यासपीठ चांगलं आहे. या माध्यमांचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणाऱ्या आपल्या मित्राशी, मैत्रिणीशी, नातेवाईकांशी, सहकाऱ्यांशी सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते. जगभरात सामाजिक माध्यमांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
फेसबुक, ट्वीटर, व्हाट्सअप, किवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो. कधीही, कुठेही कितीही लांब असून सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहता येते त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या घडामोडी काही सेकॅंदाच्या आत आपल्याला कळतात व त्यावर आपली प्रतिक्रियाही नोंदविता येते हे याचे फायदे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवणे सोपे झाले. आता तरुणांपासून ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सोशल मीडिया हे नक्कीच सर्वात दर्जेदार शस्त्र आहे पण त्याचा शासकीय पातळीवरही कृषि विस्तार क्षेत्रात वापर करायला हवा.
कृषी संशोधन आणि योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत रुजवण्याचं काम, नवीन माध्यमं (ICT Tools) अतिशय प्रभावीपणे करू शकतात. मल्टीमीडिया, कम्युनिकेशन क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमाच्या या युगात शेतीविषयक माहिती, संशोधन, तंत्रज्ञान, इनॉव्हेटिव्ह प्रयोग ग्रासरूट लेव्हलपर्यंत प्रभावीपणं पोहोचवण्यासाठी अजूनही प्रचंड स्कोप आहे. या कामामध्ये नवीन माध्यम वेब चॅनल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात कृषी विस्तार, आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये व शेतकऱ्यांमध्ये नवीन संशोधन रुजवण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (आय.टी.) वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळंच शेती आणि ग्रामीण क्षेत्रात नवनवीन माध्यमं जोमानं पुढं येत आहेत. आजच्या युगात इन्फॉर्मेशन ही `पॉवर` आहे. यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून ज्ञानकेंद्रित समाज निर्माण होतो. अण्ड्रोइड मोबाइल हे गावागावात पोचलेल साधन झाल आहे. माझ्या महितीतील एका गावचा गुरेराखी ( जनावरे सांभाळणारा) सुधा अण्ड्रोइड मोबाइल वापरतो, व्हाटसएप्प,फेसबूक वर चॅट करतो. असे एकना अनेकजन आता दिसत आहेत. अतिशय ढोबळमनाने पकडली तरीही महाराष्ट्रा साठी हा आकडा सहा लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्रची एकूण लोकसंख्या ११ कोटी यातील ५५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणारी म्हणजे जवळपास सहा कोटी लोकसंख्या शेतकर्यांची आहे. यातली ५०% तरुण म्हणजे ३कोटी तरुण शेतकरी आहेत. याच्या किमान २% जरी अण्ड्रोइड वापरकर्ते पकडले तरी हा आकडा ६ लाखांचा मिळतो. प्रत्यक्षात याहून खूप मोठा आकडा आहे आणि पुडच्या २ वर्षात हा आकडा १० पट वाढणार आहे.
Entrepreneur dot com च्या एका सर्वे अनुसार २०१७ पर्यन्त एप्प्लीकेशन डेवलपमेंट मार्केट सतेहत्तरशे कोटीहून अधिकचा व्यवसाय क्षेत्र असेल. याच्या १०% जरी एप्लीकेशन कृषि संबंधी असल्या तरी तो खरेच खूप मोठा बदल कृषि विस्तार क्षेत्रात अनू शकेल.
शेतीच्या निविष्ठा ऑनलाइन खरेदी, कृषि उत्पादन तंत्रासाठी एका तज्ञाशी अनेकजन सहज जोडणे,उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे तंत्र प्रसारित करणे, थेट माल-थेट भाजीपाला उत्पादक ते ग्राहक पोचवणे, हे सर्व आणि असे बरेच काही अल्पखर्चीक, सहज शेतकर्यांना उपलब्ध होवू शकेल.
गावच्या सार्वजनिक चौकात,ओट्यावर आजही गप्पा रंगतात. या गप्पांमध्ये एका अण्ड्रोइड वापरणार्याने आसपासच्या १० जणांना जरी ही तंत्र चर्चा केली तरी सुधा हा बदल शेती,समाज व्यवस्थेला पुढच्या टप्प्यावर नेवू शकेल.गरज आहे ती धोरणकर्त्यांनी या कडे लक्ष देण्याची व सर्वकश प्रयत्न करण्याची.
-इरफान शेख, केज,बीड ०९०२१४४०२८२
(लोकछत्र या दिवाळी अंक २०१५ मधील माझा लेख)
No comments:
Post a Comment