चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन या पिकास योग्य आहे. नदीकाठच्या पोयटयाच्या सुपिक जमिनी लागवडीस योग्य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्या दरम्यान असावा.
** लागवड
रोपे तयार करण्यास निवडलली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्यानंतर तीन मीटर लागवडीसाठी लांब 1 मीटर रूंद व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून वाफयावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफयांच्या रूंदीला समांतर अशा 2 सेमी खोलीच्या रेघा ओढून त्यांत फोरेट 10 जी हे किटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाफयात टाकून बी पेरावे व ते मातीने झाकून टाकावे व बियाण्यांची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफयांना झारीने हलकेसे पाणी दयावे. बी 6 ते 8 आठवडयाने लागवडीस तयार होते.
पुर्नलागवड करण्यासाठी 60 सेमी अंतराने स-या काढाव्यात. रोपे सरीच्या दोनही बाजूस सरीच्या बगलेत 30 सेमी अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पूर्नलागवड शक्यतो दुपारी 4.00 नंतर करावी. व रोपांना लगेच पाणी द्यावे.
**बियाणे
लागवडीसाठी अर्का गौरव, अर्का मोहिनी, कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडर या जातींची शिफारस करण्यात आली आहे. दर हेक्टरी 3 किलो बियाणे लागतील. एक किलो बियाण्यास पेरणी करण्यापूर्वी 2 ग्रॅम थायरम चोळावे.
रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा स्वच्छ असावी. जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करून तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे. वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात.नंतर बी पेरणी करावी. प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्टर ढोबळी मिरची लागवड करण्यासाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.
** खत व्यवस्थापन
शेणखत - हेक्टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले
नत्र - 150 किलो नत्र,
स्फुरद - 150 किलो आणि
पालाश - 200 किलो
संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. एक लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे. रासायनिक मिश्रखतांचा उपयोग केल्यास फायदा अधिक होतो.
** पाणी व्यवस्थापन
ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्याची आवश्यकता असते. फूले व फळे लागताना नियमित पाणी दयावे. सर्वसाधारपणे एक आठवडयाचे अंतराने पाणी दयावे.
**रोग व किड व्यवस्थापन
पीक संरक्षण : (संदर्भ : बावस्कर टेक्नोलॉजी)
१) मर : रोप बाल्यावस्थेमध्ये असताना उन्हाळ्यामध्ये मर होत असते. उगवण व्यवस्थित होऊन रोपातील मर टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. लागवडीस तयार झालेली रोपे नंतर पुर्णपणे जर्मिनेटरमध्ये बुडवून लावावीत. त्यामुळे रोपांची मर होत नाही.
२) करपा : रोपे लहान असताना पहिल्या अवस्थेत पाने जाड हिरव्या रंगाची होतात. दुसर्या अवस्थेत पाने वाळू लागतात. तिसर्या अवस्थेत जुन्या पानांच्या खालील भागावर पिवळे ठिपके पडून करड्या रंगाची अनियमित छटा चकल्यासारखी दिसते. पानाचा तो भाग जळाल्यासारखा दिसतो. या डागांचे प्रमाण वाढत जाऊन पाने जळतात व झाड निकामी होते. काही वेळा रोगाची लागण रोपाच्या बाल्ल्यावस्थेत झाल्यास झाडांचा शेंडा पिवळसर होऊन खालच्या बाजूने पांढर्या रंगाची बुरशीही दिसू लागते.
३) चुराडा -मुरडा (बोकड्या ) : या विकृतीचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढी माशी आणि विषाणूंमुळे होतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने आकसतात. त्यातील अन्नरस कमी होतो आणि झाडांची वाढ खुंटते. नवीन पालवी येत नाही.
ढोबळी मिरचीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत, हार्मोनी फवारण्याची वेळ व प्रमाण -
फवारणी (रोपांवर ) - बी उगवल्यानंतर ८ -८ दिवसांनी - (३० दिवसांत तीन वेळा) जर्मिनेटर २० मिली.+ थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली. + प्रोटेक्टंट १ चमचा + प्रिझम २० मिली.+ १० लि.पाणी
रोपांची लागवड करताना : २५० मिली जर्मिनेटर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १० लि.पाणी या प्रमाणात घेऊन रोपे त्यामध्ये संपूर्ण बुडवून सुकवून लावावीत.
पुन : लागवडीनंतरच्या फवारण्य :
१) पहिली फवारणी :(रोप लावल्यानंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ४० मिली.+ थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + न्युट्राटोन २० मिली + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ४५ दिवसांनी) : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ३० ते ४० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ३० ते ४० मिली + हार्मोनी २० मिली + १० लि.पाणी.
४) फळे काढणीच्या सुमारास व नंतर मिरची संपेपर्यंत (७ महिने ) वरील फवारणीनंतर दर ८ ते १५ दिवसांनी : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ४० ते ५० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ५० मिली + हार्मोनी २० ते २५ मिली + १५ लि.पाणी.

** काढणी व उत्पादन
फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहीत काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्वर पिक निघते.
प्रति हेक्टरी ढोबळया मिरचीचे 17 ते 20 टनापर्यंत सरासरी उत्पादन मिळते.
No comments:
Post a Comment