कारले लागवड
* हवामान
जास्त थंडी झाल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव होवून नुकसान होते, उबदार वातावरण योग्य.
* जमीन
मध्यम भारी ,पोयट्याची ते रेताड चालते. ६.५ ते ७.५ पीएच योग्य.
* लागणपूर्व मशागत
- चांगल्या वाढीसाठी १५ टन शेणखत किंवा एरंड पेंड १५ किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या. खोल नांगरट व सपाट करा.१.५ ते २ मी. अंतराच्या ओळी तयार करा.
- ट्राइकोडर्मा विरडी २५० ग्रॅम प्रति १० किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणाऱ्या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणाऱ्या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.
- दोन बाय दोन फुटाचे खड्डे किंवा रेज्ड बेड करून हेच वरील अंतरावर लागवड करावी. मांडव उभारणी करणे आवश्यक आहे.
* लागण
वरीलप्रमाणे एका खड्यात एका ठिकाणी पाच बिया लावा, पंधरा दिवसांनी त्यातील दोन सशक्त रोपे ठेवावी.
* वाण
- फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी,कोईमतूर लॉंग, अर्का हरित, पुसा मोसमी, पुसा विशेष इत्यादिचे बियाणे एकरी दोन किलो वापरावे.
- बियाणे प्रक्रिया साठी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किंवा कार्बनडेझिम १० ग्रॅम एका किलोस चोळावे.
* खत व्यवस्थापन
चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी २० किलो नत्र (४३ किलो युरिया)+२० किलो फॉस्फरस (१२५ किलो एसएसपी) + २० किलो पोटॅशियम (३३ किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.
त्यानंतर ३२ दिवसांनी २० किलो नत्र (४३ किलो युरिया किंवा ९७ किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर द्या.
* पाणी व्यवस्थापन
तापमानानुसार दर ३ ते १० दिवसांनी पाणी पाळी द्यावी जेने करुण ५०%आर्द्रता राहील.
* पीक काळजी, कीड व रोग नियंत्रण -
* फुलगळ
फुलगळ रोखण्यासाठी, उत्पादनात १०% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड ३ मिली + १२:६१:०० ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.
*फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड ३५० मी.ग्रॅ. च्या,४-५ गोळ्या १५ लीटर पाण्यातून १-२ वेळा फवारा. तसेच चांगली फुलधारणा मिळण्यासाठी ०:५२:३४ची १५० ग्रॅम प्रति १० पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .
* गुणवत्ता मिळण्यासाठी १३:०:४५ हे १० ग्रॅम +हाइ बोरॉन १ मिली प्रती लीटर पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा.
* नाग अळी
नियंत्रणासाठी अबामेक्टिन ४ मिली १० लीटर पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अॅसिफेट +इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
* अंकुर आणि मुळे खाणारी अळी
पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान ३जी १२ किलो प्रती एकर सरीत टाका. उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल ५%एस सी ५०० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० ई सी ड्रेंचिंग करा किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड ८० डब्ल्यू जी १५० मिली प्रति २५० लीटर पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.
* फळ माशी
नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ एस सी ५ मिली + स्प्रेडिंग एजेंट ६मिली १० लीटर पाण्यातून फवारा किंवा फिप्रोनिल ५ एस सी ३० मिली प्रति १५ लीटर पानी किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन ५ मिली प्रति १० लीटर पानी ची फवारणी करा.
* पांढरी माशी
ही माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन ५० डब्ल्यू पी २०ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अॅसिफेट ५०%+इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
* डाऊनी/केवडा
नियंत्रणासाठी बिटरटेनोल २५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल २५ मिली प्रती १५ लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम १२%+ मॅनकोझेब ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
* भूरी
या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते. प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर १० किलो प्रति एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम+ मॅनकोझेब २ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.
* पाना फळांवरील ठिपके रोगात
सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी भूरी प्रमाणे नियंत्रण करा.
* तण नियंत्रण
पेंडीमेथलीन १.२५ लीटर प्रती २०० लीटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ४८ तासांच्या आत जमीन ओलसर असताना ऐका एकरात फवारा. तसेच बियाणांची उगवण झाल्यावर १० ते १५ दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी १-२ वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.
* काढणी
२ ते २.५ महिन्यानी सुरु करता येईल, आठ ते दहा तोडे करुण १८० दिवसात उत्पादन एकरी १० टना पर्यंत उत्पन्न मिळवता येईल.
No comments:
Post a Comment