पडवळ
पडवळ लागवडीस अर्धा ते एक मीटर खोलीची जमीन निवडावी .
लागणीची पद्धत
पडवळ लागवडीस सरी वरंबा चांगली मानली जाते .पङवळच्या जाती नुसार 200×120 सेंमी दोन वेलीतील अंतर ठेवावे. खुरप्या सहायाने 3ते 4 बीयाची लागवड करावी.
बियाणे:-
5ते 6लागवडीस वापरावे
बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बियायान्यास प्रती किलो प्रमाणे 20 ग्रॅ म बविस्टिन याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.
ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.
पाणी व ख़त व्यवस्थापन
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति हे. 25 ते 30 टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 50 किलो प्रमाणे नत्र , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी परत 30 दिवसानी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी .
किड नियंत्रण
1) लाल भुंगेरे - पिकाचि पाने कुरतडुन खाते नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात 40 ग्राम कर्बारील किंवा मॅलॅथिऑन 10 मिली ची फवारनी करावी .
2) फळ माशी - मॅलेथियॉन 10- मिली 10 लिटर पाण्यात फुले येण्यापूर्वी 1ते 2 वेळा फवारावेत .
रोग नियंत्रण
1)भुरी - फळावर पांढरे डाग पडतात ,वाढ खुंटते
नियंत्रण - बाव्हिस्टीन किंवा कॅरेथेन 10 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे .
2) केवडा -नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन - एम -45 हे बुरशी नाशक फवारावे .
3)करपा -पानावर लाल रंगाचे दाग पडून पाने सुकतात नियंत्रण करीता डायथेन एम- 45 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम प्रमाणे मिसळून फवारावे
महत्वाची घ्यावयाची काळजी
पडवळची काढनी फळे कोवळी असतांनच करने आवश्यक आहे कारण फळे जास्त जुने झाल्यास साल व बी टनक होते त्यामूळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडणार .करीता काळजी घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment