Search here..

Friday, January 15, 2016

गुलछडी / निशिगंध

निशिगंध (गुलछडी)
जमीन -
निशिगंध लागवडीस हलकी ते मध्यम पोयटयाची  जमीन निवडावी .जमिनीचा सामू 4.5  ते  7.5  दरम्यान असावा.

लागणीची पद्धत-
लागवडीस  4 सेंमी आकाराचे कंद (कॉर्म)चा  वापर करवा .  जाती नुसार90×20 सेंमी चे गदी वाफ्यावर लागवड करावी .दोन वाफ्यातील अंतर   60ते75 सेंमी ठेवावे .  .सरी वरंबा पद्धतीने 60 सेंमी अंतर सऱ्या पाडून  लागवड करावी .

बीज प्रक्रिया -जमिनीतुन कंद  काढल्या नंतर 
लागनीपूर्वी  10 लिटर पाण्यात 40 ग्रॅम  बाविस्टिनच्या  द्रावनात 15 ते 20 मिनिटे  बुडुन  भिजत ठेवा .लागनी कंद 1% थायोयुरीया किंवा पोटॅशियम नायट्रेटच्या द्रावणात अर्धा तास बुडून ठेवल्यास उगवण जोमदार होते . 

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति हे. 30 ते 50 टन शेनखत किंवा  सेंद्रीय पदार्थ  द्यावे .लागवड करताना प्रति हे 150 ते 200 किलो प्रमाणे  , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी नत्र पहिला हप्ता लागवडीच्या वेळेस  100किलो व दुसरा नत्राचा  हप्ता  पीक दोन पानावर असताना  150   -किलो  मात्रा द्यावी तिसरा  हप्त्ता पीक चार पानावर असताना 150 किलो मात्रा द्यावी  .
जमिनीच्या मगदुराने 6-8 दिवसाच्या अंतराने पाणी  द्यावे.

लागवडीस उपयुक्त जाती - सुचीत्रा  ,आय .आय . एच .आर . सीलेक्शन -1, ट्रॉपिक सीज ,सपना ,नझराना ,संसरे ,यलो स्टोन,हंटिंग सॉंग ,ऑस्कर ,आरती ,शोभा ,मुक्ता, मनीषा ,पूनम ,मयूर इ . जाती वापरावि.
किड नियंत्रण 
1) खोड कुरतडनारी  आळी -
पिकाच्या कोवळ्या मूळ कुरतडुन खाते  पानातून रस शोषून घेते  खाते नियंत्रना लगवडिच्या वेळी क्लोरडेन भुकटी हे .50 किलो प्रमानात जमिनीत टाकावी .

2) फुलकिडे  - कळी आणी पानातीला रस शोषून घेते मोनोक्रोटोफॉस  15- मिली 10 लिटर पाण्यात फुले  येण्यापूर्वी  1ते 2 वेळा  फवारावेत .           

3)पाने खाणारी आळी -पिकावरील सर्व पाने खाऊन  टाकते नियंत्रण करीता 12 मिली इकॅलकस (35%प्रवाहि)किंवा -मोनोक्रोटोफॉस 10 लिटर पाण्यात 15 मिली मिसळून फवारावे .

4) सुत्र कृमी- मुळामधील पेशीत राहून   रस शोषण करतात. नियंत्रण -20 किलो  कार्बोफ्युरॉनदर हेक्टरी टाकावे .

रोग नियंत्रण 
1)साठवनीतील कंद कुज - जास्त साठवनीत  कांदावर बुरशी वाढते 
नियंत्रण - थायरम 30ग्रॅम  किंवा कॅप्टन 30 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 मिनिटे भिजून नंतर लागवडीस वापरावि.

2) आल्टरनेरिया लीफ स्पॉट  -आल्टरनेरीया फॅसीक्युलॅटा नावाच्या बुरशीमुळे पानावर तांबूस वेडे वाकडे  ठिबके पडतात नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25ग्रॅम डायथेन एम - 45  हे बुरशी नाशक फवारावे .

3) मर रोग   -रोप तपकिरी रंगाचे पडून पाने  सुकतात व कालांतराने रोप मरते  नियंत्रण करीता रोगप्रतीबांधक जाती वापरावि. 10 लिटर पाण्यात 60 ग्रॅम कॅप्टन किंवा 40 ग्रॅम  कार्बेडेझिमचे द्रावण मुळाजवळ  ओतावे .

4)कव्हुलॅरिया  करपा -पानावर  राखडी  रंगाचे ठिबके पडतात व फुले कमी येतात नियंत्रणकरीता 25 ग्रॅम डायथेन एम -45    10 लिटर पाण्यातून फवारवे .
5) विषाणुजन्य रोग -
मोझॉइक ,टोमॅटो रिंग स्पॉट, ॲस्टर यलो इ .विषाणु च्या प्रादुर्भावामुळे होतो रोपाची वाढ खूंटने , फुलांचा आकार वेडा वाकडा होने . उपाय फक्त एकच आहे मावा ,तुडटुडे  यांचे वेळेत  नियंत्रण करावे. 

महत्वाची घ्यावयाची काळजी 
फुलांची काढनी   सकाळच्या वेळी करावी. काढनि नंतर फुले थंड ठिकाणी ठेऊन लवकरात लवकर प्रतवारी करून सारख्या लांबीच्या 10 ते 12  फुलदांद्यची जुड़ी  बंधून  पॅकिंग करून बाजारपेठेत विक्रीस पाठवावे.

No comments:

Post a Comment