मेथी लागवड.
वर्षभर चवीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथी. याची मागणीपण वर्षभर असते आणि समशीतोष्ण हवामानात लागवडही वर्षभर करता येते.
* यासाठी जमीन मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा होणारी असावी.
* हि भाजी ४०ते ६० दिवसांनी काढता येते त्यामुळे टप्प्या टप्प्याने वाफे लावल्यास वर्षभर उत्पन्न घेता येते.
* लागवड करण्यापूर्वी दोन वखर पाळ्या देवुन जमीन भुसभूषित करावी.
* त्यानंतर ३ बाय २ मीटरचे सपाट वाफे करुण भाजीसाठी फेकून लागवड करता येते.
* वाण: मेथी-१, राजस्थान मेथी-१. मेथी नं.४७, प्रभा,पुसा अर्ली बंचिंग, कसुरी इत्यादि सुधारित वाण निवडावेत.
* पाणी व्यवस्थापन करताना जमिनीच्या मगदुरा नुसार मध्यम जमिनीस दर ७-८ दिवसांनी एक पाणी पाळी द्यावी.
* यात मर हाच प्रमुख रोग आहे. बियाणे संस्कार करुण तो टाळता येतो. इतर विशेष रोग येत नाही.
* किडी मधे नागअळी हा मोठा धोका आहे. यासाठी लागवडी नंतर ७ दिवसांनी १००० पी पी एम निंबोळी अर्काची ३ मिली प्रति लीटर प्रमाणे एक फवारनी घ्या.ु
* ४० ते ६० दिवसांनी उपटून जुड्या बांधाव्या व भाजीची माती तिथेच शेतात झटकुन घ्यावी. हिरवी भाजी उत्पादन एकरी ३ टन मिळू शकते.
मेथी बीजोत्पादन करण्यासाठी:
* मेथी बिया उत्पादनासाठी थंडी आवश्यक म्हणून लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधे करावी.
* दोन रोपात १० सेमी.अंतर काही राज्यात रोप तयार करून सरी वरंबालागवड करतात
* बिया काढणीसाठी १५० दिवसांनी काढनी करुण खळ्यावर वाळवाव्या नंतर मळणी करावी याचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्विंटल मिळते.
No comments:
Post a Comment