
पोषकद्रव्ये आणि आरोग्यासाठी उपयोग
- पचनासाठी उपयुक्त - पपईमध्ये असलेल्या पपेन एंझाइममुळे अन्नाचे पचन सुधारते.
- आँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत - शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते.
- संपन्न पोषणतत्त्वे - जीवनसत्त्व A, C, E, फायबर, आणि पोटॅशियमयुक्त.
- त्वचेसाठी फायदेशीर - त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त.
जमीन
- पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते.
- गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते.
- खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही.
- या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचऱ्याला फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.
- चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते.
- लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात.
- एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते.
- बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ - १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात.
- दोन खड्ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात.
- रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०-६० टेक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात.
- नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात.
- रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो.
- तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात.
- नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यांवर पानांच्या बगलेतून लांब नर-पुष्पांचे घोस अथवा एकेकटी स्त्री-पुष्पे येतात.
- एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळतात. फुले पिवळी असतात; नर-पुष्पांमध्ये पाच पाकळ्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसतो.
- त्यात आखूड तंतूंची दहा केसरदले व वंध्य किंजमंडल असते.
- स्त्री-पुष्पाच्या पाच मांसल पाकळ्या तळाशी जुळलेल्या परंतु वर सुट्या व बाहेरच्या बाजूस वळलेल्या दिसतात.
- त्यात वंध्य केसरदले आढळतात; किंजदले पाच, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यावर पंख्यासारखा पाच भागांचा किंजल्क असतो.
पपई ची लागवड खालील प्रमाणे दोन ओळींत व दोन रोपांत अंतर ठेवुन करतात.
पपई खत व्यवस्थापन
- लागवडीपूर्वी: ८-१० टन शेणखत प्रति एकर + २५० किलो निंबोळी पेंड
- वाढीच्या टप्प्यावर:
- ५ किलो रायझोबियम + ५ किलो पीएसबी + १० किलो जैविक कंपोस्ट
- गाडवखत किंवा गांडूळ खत १ टन प्रति एकर
पपई पिकांस विविध संस्था २५० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाशची शिफारस करतात. यापैकी २५० ग्रॅम नत्राचा पुरवठा जर पपई पिकांस रासायनिक खतांद्वारे केला तर पपई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होवुन पपई पिकावर विविध व्हायरस ची लागण मोठ्या प्रमाणात होवुन त्याच्या परिणामी उत्पादन घटण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे पपई पिकांस रासायनिक स्वरुपातुन नत्राचा पुरवठा मुळीच करु नये. त्याऐवजी नत्र स्थिर करणारे जीवाणु, शेणखत यांचा वापर करावा. पपई लागवडीनंतर नियमितपणे पिकावर रसशोषण करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी फवारण्या घेत राहव्यात. पपई पिकांस सुरवातीचे ४ ते ५ महिने काळातील रसशोषण करणा-या किडींच्या फवारण्यांमुळे जर किड मुक्त ठेवण्यात यश मिळाले तर पपई पिकावरिल व्हायरस रोगांवर नियंत्रण मिळवणे फार सोपे होते.
कीड व रोग नियंत्रणासाठी सापळे आणि फायदे
रसशोषण करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी खालिल प्रमाणे किटक नाशकांचा वापर करावा.
पपईवरील रोग नियंत्रण
पपईवर कोळी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी, काळी आळी या किडींचा आणि रोपमर, मूळ कुजव्या, करपा, भुरी यांचा प्रादुर्भाव होतो. उत्तम प्रतीचे बियाणे, उत्कृष्ट मशागत, बागेचे सातत्याने निरीक्षण व प्रतिबंधात्मक उपाय योजनांनी किडी रोगांवर मात करता येते. पपई रिंग स्पोट हा अतिशय घातक विषाणू जन्य रोग पपईला होत असून त्यावर उपाययोजनांचा शोध सुरु आहे. हा रोग पसरविणाऱ्या किडीचा नायनाट करणे हा त्यावरील उपाय आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र व दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरलेल्या मावा या किडीवर एसरोफेगस पपया या किडीचा वापर करून जैविक नियंत्रण करता येवू शकतो असा शोध नुकताच लागला आहे.
काढणी व्यवस्थापन
- लागवडीनंतर ८-१० महिन्यांत फळ काढणीस तयार होते.
- फळांची साली पिवळीसर होताच काढणी करावी.
- हळुवार हाताळणी आवश्यक.
- मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी योग्य ग्रेडिंग करावे.
प्रक्रिया उद्योग संधी
- पपई ज्यूस आणि जॅम
- डिहायड्रेटेड पपई चिप्स
- पपई बियाण्यांपासून तेल उत्पादन
- पपई पल्प आणि प्युरी
It's going to be finish of mine day, except before ending I am reading this wonderful piece of writing to improve my experience.
ReplyDeleteIts our pleasure
ReplyDelete