Search here..

Friday, January 15, 2016

मोहरी / राई

सुधारित वाण -
1) सीता - पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र विदर्भासाठी प्रसारित.
2) पुसा बोल्ड- पीक तयार झाल्यावर गळ होत नाही.
3) वरुणा -महाराष्ट्रासाठी.
4) पुसा जयकिसान - महाराष्ट्रासाठी.
5) रजत - महाराष्ट्रासाठी.
6) टी.पी.एम.-1 - भुरी रोगास प्रतिकारक, पिवळे दाणे, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी.

जिरायती पीक घ्यावयाचे असल्यास पुरेशी ओल असताना व बागायती पिकास पाणी देऊन चांगला वाफसा आल्यावर तिफणीने पेरणी करावी. भारी जमिनीत दोन ओळींतील अंतर 45 सें.मी., तर मध्यम जमिनीत 30 सें.मी. ठेवावे. बियाणे फार खोलवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

पेरणीपूर्वी बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. हेक्‍टरी पाच किलो बियाणे वापरावे.

त्यासाठी पेरणीनंतर 15-20 दिवसांनी विरळणी करून दोन रोपांमधील अंतर 10 ते 15 सें.मी. ठेवावे. आंतरपीक प्रयोगात गहू अधिक मोहरी (4:2) या प्रमाणात घेतल्यास जास्त फायद्याचे आढळून आले.

खत व्यवस्थापन :
बागायती पिकासाठी हेक्‍टरी 50 किलो नत्र व 25 किलो स्फुरद द्यावे. नत्राची अर्धी मात्रा (25 किलो) व संपूर्ण स्फुरद (25 किलो) पेरणीच्या वेळी पेरून द्यावे. राहिलेले अर्धे नत्र (25 किलो) पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावे. कोरडवाहू पिकासाठी 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. रासायनिक खते पेरून द्यावीत. 

पाणी व्यवस्थापन:
या पिकाला पाण्याची गरज कमी असते. पिकास योग्य वेळी दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पादनात भरपूर वाढ होते. सर्वसाधारण फुले येण्याच्या अवस्थेत, शेंगा लागण्याच्या वेळी आणि दाणा भरतेवेळी पाणी देणे फार महत्त्वाचे व फायद्याचे ठरते.

No comments:

Post a Comment