नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्टरी महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत. खरीप, रब्बी उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिक घेता येते.
जमिन
रोपे तयार करण्यासाठी -
रोपे तयार करण्यासाठी - गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा.
गादी वाफयात 1 घमेले शेणखत 50 ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा.
रोपे लागनीसाठी -
टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमिन लागवडी योग्य असते. हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्यम प्रतिचा म्हणजे 6 ते 8 असावा.
शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी. जमिनीत एकरी 12-15 गाडया शेणखत मिसळावे. लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेमी व दोन रोपातील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे.
लागवड
खरीप – जून, जूलै
रब्बी ( हिवाळी हंगाम) सप्टेबर, ऑक्टोबर
उन्हाळी हंगाम – डिसेंबर, जानेवारी
बियाण्याचे प्रमाण – हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम
पुसा रूबी, पुसा गौरव, पुसा शितल, अर्का गौरव, रोमा, रूपाली, वैशाली, भाग्यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे.
बियांची पेरणी ही वाफयाच्या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफयास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफयास 10 ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणविरहीत ठेवावेत. बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्यावर रोपांची सरी वरंब्यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्ध होतात. रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्याकाळी किंवा उन कमी झाल्यावर करावी.
बागेला वळण आणि आधार देणे
टोमॅटोच्या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो.
1. प्रत्येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडिच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्या वाढीप्रमाणे काठीला बांधले जाते.
2. या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून मांडव करून झाडे वाढविली जातात.
रासायनिक खते
सरळ वाणांसाठी 200-100-100 व संकरीत वाणांसाठी 300-150-150 किलो नत्र, स्फूरद पालाश या प्रमाणात खत द्यावे. अर्धा नत्र लागवडीच्या वेळी व उरलेला लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळयात टोमॅटो पिकास 8 ते 10 दिवसांच्या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्या अंतरानी व उन्हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्या अंतरानी रोपांना पाणी द्यावे. भारी काळया जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पिक फूलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्वाचे आहे.
किड व रोग नियंत्रण
पर्णगुच्छ किंवा बोकड्या
टोबॅको लीफकर्ल व्हायरसमुळे पर्णगुच्छ किंवा बोकड्या या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पांढरी माशी पानांतील रस शोषते. पाने पिवळी पडून वाळतात. या किडीने सोडलेल्या चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते.
प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास रोगग्रस्त झाडे नष्ट करावित. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि.किंवा मिथाईल डेमेटॉन (25 टक्के प्रवाही) 15 मिलि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ८ -१० दिवसांच्या अंतराने फवारावे.
टोमॅटोवरील नागअळी
किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाय करता येतील:
1. पीक फेरपालट: दरवर्षी एकाच ठिकाणी टोमॅटोचे पिक न घेता पिकांची अदलाबदल करा. त्यामुळे नागअळीच्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
2. रात्री फुलणाऱ्या पिकांचे नाश: नागअळीच्या पतंगांचा अंडी घालण्याचा काळ रात्रीचा असतो. त्यामुळे रात्री फुलणारे गवत आणि इतर तणांचे नाश करून त्यांना कमी जागा मिळेल.
3. प्रकाश सापळे: नागअळी पतंगाला आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे (Light Traps) लावा. रात्री हे पतंग प्रकाशाकडे आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात.
4. फेरोमोन सापळे: नागअळीच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सापळे (Pheromone Traps) वापरा. यामुळे नागअळीच्या प्रजनन चक्रात व्यत्यय आणता येतो.
5. सेंद्रिय कीटकनाशके:
- नीम अर्क: 5% निंबोळी अर्काची फवारणी केल्याने नागअळीचे नियंत्रण होते.
- अग्निस्राव: लसूण, मिरी, आलं आणि हळदीच्या अर्काचा वापर नागअळीला दूर ठेवू शकतो.
6. जैविक नियंत्रण: नागअळीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचा वापर करा. उदा. ट्रायकोग्रामा नावाचा परजीवी कीटक नागअळीच्या अंडांवर उपजीविका करतो.
7. रासायनिक कीटकनाशके (तज्ञांच्या सल्ल्यानुसारच वापर करा):
- स्पिनोसॅड (Spinosad) – 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
- इमामेक्टिन बेंझोएट (Emamectin Benzoate) – 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
- क्लोरेन्ट्रानिलिप्रोल (Chlorantraniliprole) – 0.4 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
8. पीक व्यवस्थापन: पीक खालून आलेली जुनी पाने वेळोवेळी काढून टाका. तसेच, फळे जमिनीवर येऊ नयेत याची काळजी घ्या.
फळ पोखरणाऱ्या किडी -
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी, बॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रतिहेक्टरी 1.25 किलो किंवा ऍझाडीरेक्टीन (1 टक्के) 25 मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मिलि. फवारावे.
फळांतील रस शोषण करणारा पतंग आणि हेलिकोवर्पा आर्मीजेरा या किडी नियंत्रणासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. एन. पी. व्ही. विषाणूचा २०० मि.लि. प्रति एकर फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस
पानावर प्रथम लहान, तांबूसकाळसर चट्टे दिसतात; नंतर देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडावरसुद्धा पसरतो. तसेच संपूर्ण झाड १०-१५ दिवसांत करपून वाळून जाते.
उशिरा रोग झाल्यास, फळावर पिवळसर लाल डाग, तसेच गोलाकार वलये दिसून येतात. फळांची पूर्णपणे वाढ होत नाही. या रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत (थ्रिप्स) होतो. फूलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता 10 लिटर पाण्यात 12 ते 15 मिली मोनोक्रोटोकॉस व 25 ग्रॅम डायथेन एम 45 मिसळून बी उगवल्यानंतर 15 दिवसांनी फवारावे. नंतरच्या दोन फवारण्या 10 दिवसाच्या अंतराने कराव्यात.
कोळीच्या नियंत्रणासाठी, फेनझाक्वीन (10 टक्के प्रवाही) 25 मिलि. फवारावे.
TABLE ADD KARANE...
टोमॅटोच्या दर्जेदार उत्पादनासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना करावी.
(प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी)
"लागवडी अगोदर 4 ते 5 दिवस -अॅन्ट्राकाॅल-400 ग्रॅम+बाॅक्सर-200 मिली शेतात स्प्रे करणे '
लागवडी नंतर 4 ते 5 दिवस -इमीडाक्लोप्रिड-17.8% 150मिली + कर्झेट - 500 ग्रॅम
लागवडी नंतर 7 व्या दिवशी -रि-अगेन एल- 500 मिली+ अजुबा 400 मिली + मॅग्नेशियम सल्फेट-500 ग्रॅम +अॅन्ट्राकाॅल-500 ग्रॅम -फेरस EDTA 100 ग्रॅम + मॅगनिज EDTA 50 ग्रॅम + झिंक EDTA 50 ग्रॅम
लागवडी नंतर 10 व्या दिवशी -बाॅक्सर 200 मिली + नुवान -200 मिली + रोको 200 ग्रॅम
लागवडी नंतर 13 व्या दिवशी - टिल्ट - 40 मिली + कुमान 400 मिली
लागवडी नंतर 17 व्या दिवशी -किंग कोब्रा 200 मिली +झेड 78 - 500 ग्रॅम +नुवान 200 मिली
लागवडी नंतर 20 व्या दिवशी - 0.52.34.- 600 ग्रॅम + स्टार किंग 500 मिली + काॅन्टाफ 200 मिली
लागवडी नंतर 23 व्या दिवशी -स्टार- 250 ग्रॅम + मेटालेक्झील 35% 100 ग्रॅम + स्टेप्टो-18 ग्रॅम
लागवडी नंतर 27 व्या दिवशी डेन्मार्क 200 मिली +नुवान 200 मिली + कॅब्रिओटाॅप 400 ग्रॅम
लागवडी नंतर 30 व्या दिवशी -रि-अगेन -500 मिली +अजुबा -400 मिली + अॅन्ट्राकाॅल 500 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम + फेरस (EDTA) 100 ग्रॅम + मॅगनिज (EDTA) 50 ग्रॅम + झिंक (EDTA) 50 ग्रॅम
लागवडी नंतर 33 व्या दिवशी -हायफ्लाॅवर -500 मिली + रोको 200 ग्रॅम + नुवान -200 मिली + बाॅक्सर-200 मिल
लागवडी नंतर 36 व्या दिवशी
- कुमान - 500 मिली + टिल्ट-50 मिली
लागवडी नंतर 39 व्या दिवशी -स्टार -250 ग्रॅम + मेटालेक्झील 35% 100 ग्रॅम + स्टेप्टो -18 ग्रॅम
लागवडी नंतर 42 व्या दिवशी -बेस्ट-100 मिली + नुवान -200 मिली + फ्लोरीजन -500 मिली
लागवडी नंतर 45 व्या दिवशी - 0. 52 .34.-600 ग्रॅम + स्टार किंग -500 मिली + काॅन्टाफ -250 मिली
लागवडी नंतर 48 व्या दिवशी - स्टार -250 ग्रॅम + मेटालेक्झील 35%- 100 ग्रॅम + स्टप्टो 18 ग्रॅम
लागवडी नंतर 51 व्या दिवशी - स्टारगन 50 मिली + नुवान 200 मिली + कॅब्रिओटाॅप -400 ग्रॅम + फ्लोरीजन -500 मिली
लागवडी नंतर 54 व्या दिवशी -रि-अगेन - 500 मिली +अजुबा - 400 मिली + अॅन्ट्राकाॅल -400 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट -500 ग्रॅम + फेरस (EDTA) 100 ग्रॅम
लागवडी नंतर 57 व्या दिवशी - हायफ्लाॅवर -500मिली + 0.52.34.-500 ग्रॅम + रोको 200 ग्रॅम + बाॅक्सर -200 मिली + नुवान -200 मिली
लागवडी नंतर 60 व्या दिवशी - स्टार -250 ग्रॅम + मेटालेक्झील 35% 100 ग्रॅम + स्टेप्टो, -18 ग्रॅम
लागवडी नंतर 63 व्या दिवशी - बेस्ट 100 मिली + फ्लोरीजन 500 मिली + नुवान 200 मिली + कॅब्रिओटाॅप -400 ग्रॅम
लागवडी नंतर 67 व्या दिवशी - रि-अगेन -500 मिली + अजुबा -400 मिली + अॅन्ट्राकाॅल - 400 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट - 500 ग्रॅम + फेरस (EDTA ) 100 ग्रॅम
लागवडी नंतर 70 व्या दिवशी - हायफ्लाॅवर -500 मिली + 0.52.34.-500 ग्रॅम + रोको -200 ग्रॅम + बाॅक्सर 200 मिली + नुवान -200 मिली
लागवडी नंतर 72 व्या दिवशी - 0.52.34.-600 ग्रॅम + स्टारकिंग -500 मिली + काॅन्टाफ 200 मिली
लागवडी नंतर 75 व्या दिवशी - कोरोजन -40 मिली + कॅब्रिओटाॅप -400 ग्रॅम
लागवडी नंतर 78 व्या दिवशी - रि-अगेन -500मिली + अजुबा -400 मिली + अॅन्ट्राकाॅल 400 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट -500 ग्रॅम + फेरस ( EDTA ) 100 ग्रॅम
लागवडीचे नंतर 81 व्या दिवशी - हायफ्लाॅवर -500 मिली + 0.52.34.-500 ग्रॅम +रोको -200 ग्रॅम + बोरान -100 ग्रॅम
लागवडी नंतर 84 व्या दिवशी - कॅल्शियम क्लोराईड -500 ग्रॅम + काॅन्टाॅफ -200 मिली