Search here..

Wednesday, January 13, 2016

कोकम

जमीन
हलकी / भारी चालते,पाण्याचा निचरा आवश्यक.

लागवड
पूर्व मशागत - 6X6 मीटर अंतरावर 2X2X2 फुटाचे खड्डे करून शेणखत आणि मातीने एकत्रित भरावे. दोन ओळी आणि दोन झाडात १५ फुट अंतर असावे. शेनखत 20 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 1 किलो घेवून खड्डे भरून घ्यावेत. वाळवीपासुन रक्षणासाठी 50 ग्रॅम (2%) फोलिडोल पावडर प्रत्येक खड्यात टाकावी.
लागवड कालावधी - जून / जुलैमध्ये पाऊस मान पाहून 2 रोप किंवा 1 कलम लावावे. 
प्रजाती - अमृता, हतिस (पपई प्रमाणे हे मादी झाड असलेने स्वतंत्र 5 ते 6% नर रोपे बागेत लावावी)

खत व्यवस्थापन 
पहिल्या वर्षी -
शेनखत - 2किलो 
युरिया - 100 ग्रॅम
सिंगल सुपर फॉस्फेट - 150 ग्रॅम
म्यूरेट ऑफ़ पोट्याश - 50 ग्रॅम

दहा वर्षापर्यंत प्रमाण वाढवत जावे. 
शेनखत - 20-30 किलो 
युरिया - 1 किलो 
सिंगल सुपर फॉस्फेट - 1.5 किलो
म्यूरेट ऑफ़ पोट्याश - 500 ग्रॅम

कीड व रोग व्यवस्थापन 
पिंक रोग पांढऱ्या रंगाचे गोलसर ठिपके पडतात व उत्पन्न कमी होते. नियंत्रणासाठी लागन भाग कापून टाकुन त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

No comments:

Post a Comment