Translate (Trial Version)

Thursday, February 4, 2016

शेवगा लागणीपासून काढणीपर्यंत सविस्तर व्यवस्थापन (जैविक आणि रासायनिक)

शेवगा हे पचन सुधारणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, आणि हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असते. त्यात प्रथिने, व्हिटॅमिन्स (A, C), कॅल्शियम, आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

  • जमीन
शेवगा हलक्या ,माळरान तसेच डोंगराळउताराच्या जमिनीत करता लागवड  येतो. काळ्या भारी जमिनीत शेवग्याचे  झाड जोमाने वाढते पण उत्पादन कमी येते. जमिनीचा सामू 6 - 7.5 इतका  असावा.
  • बियाणे - कोइमतूर-1, कोइमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2 आणि कोकण रुचिरा 
  • सुधारित जाती : १) जाफना, रोहित-१, कोकण रुचिरा, पी. के. एम. १, ओडिसी 3
  • लागणीची पद्धत
पावसाळा सुरू होण्या पूर्वी  60×60×60 सेंमी आकाराचे खड्डे खोदुन त्यात 1 घमीले शेनखत ,250 ग्राम 15:15:15 आणी 50 ग्राम फॉलिदॉल पावडर टाकून भरून घ्यवी .दोन झाडातिल व ओळीतिल अंतर 4×4 मीटर इतके ठेवावे . 
  • पाणी व ख़त व्यवस्थापन
शेवग्याच्या प्रत्येक झाडास दरवर्षी 10 किलो शेनखत, 75 ग्राम नत्र, 75 ग्राम स्फूरद, 75 ग्राम पालाश द्यावे. भारी जमीनीत एकरी 50 किलो    डि ए पी दिल्यास पालवी चांगली फुटते .
लक्षात घ्या, झाडाला पानी नसले तर चालते मात्र पानी कमी पडले तर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही त्यामुळे पानी उपलब्ध करावे लागते. 
  • रोग  नियंत्रण
शेवगा पिकावर जास्त  प्रमाणात रोग आढळून येत नाही.काही वेळा खोडवर कँकर या रोगाचा  प्रादूर्भाव आढळून येतो त्यावर 1%बोर्डो मिश्रण किंवा 10लिटर पाण्यात 10 ग्राम बाविस्टिन बुरशीनाशक फवरावे .        
  • किड नियंत्रण 
शेवगा पिकावर आढळून येणारी महत्वाची किड म्हणजे खोड आणी फांदी पोखरनारी अळी. नियंत्रना करीता डायमेथोयेट किंवा ट्रायजोफॉस या किटकनाशकात किंवा पेट्रोल मध्ये बुडवलेला बोळा टाकून  छिद्र बंद करावे . त्याच प्रमाणे पाने गुंडाळनारी आळी आढळून आल्यास  20 मिली प्रॉफेनॉफॉस किंवा फॉस्फिमिडोन 10 लिटर पाण्यातून फवारावे .
  • महत्वाची घ्यावयाची काळजी 
दर वर्षी 1 झाडा पासून 30 ते 35 किलो शेंगा  मिळतात .खत ,पानी ,आंतरिक मशागत याचे योग्य नियोजन केल्यास उत्पादन वाढून सातत्याने मिळते अन्यथा उत्पादनात घट होते .त्यामु़ळे नियमित काळजी घेणे आवश्यक आहे .
  • काढणी आणि उत्पादन 
शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो.

जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासूनपुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात.

प्रक्रिया उद्योग

शेवग्यापासून पावडर, तेल, औषधी आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन केले जाते. यामुळे उत्पादकांना अधिक मूल्यवर्धनाचा लाभ होतो. पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून वापरतात, तसेच शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात. मोबाईल, घडय़ाळे,टीव्ही इत्यादी दर लिटरला 25 हजार रुपयांनी ते जाते. तसेच वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरली जाते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.