अ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
आ. मधुमाशांच्या प्रजाती
इ. मधाच्या पोळ्यांची स्थापना
ई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे
उ. वसाहतींचे व्यवस्थापन
ऊ. मधाची काढणी
आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे
मधमाशी पालनासाठी वेळ, पैसे आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटगटानं मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
महाबळेश्वर येथे मधमाशी पालन व्यवसायाचे 15 दिवस प्रशिक्षण मिळते. 45 हजार रुपयांना मधमाशांच्या 10 पेट्या मिळतात. या एका पेटीत 10 फे्रम तयार होतात. फे्रममध्ये एक एक करून मधमाशा शिरतात व मध जमा करतात. एका पेटीत 30 ते 40 हजार मधमाशा राहतात. खादी ग्रामोद्योग तर्फे अर्थसहाय्यित कर्ज मिळते. यामध्ये जवळपास 80 टक्के अनुदान असते, तर 20 टक्के रक्कम परतफेड करायची असते. सरासरी 100 रुपये किलो दराने मधाची विक्री होते.
थंडीपासून बचाव
दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो.
मधुमक्षिका पालनामधील धोके -
पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवळजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे.
उत्पादन प्रक्रिया
मधमाशांचं संगोपन शेतावर किंवा घरी पेट्यांमध्ये करता येते.
अ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
पोळे ही एक साधी लांब पेटी असते आणि तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा अंदाजे आकार १०० सेंमी लांब, ४५ सेंमी रुंद आणि २४ सेंमी उंच असा असावा. ही पेटी २ सेंमी जाड असावी आणि पोळे १ सेंमी रुंदीच्या प्रवेश छिद्रांसहित एकत्र चिटकवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. वरील पट्ट्या पोळ्याच्या रुंदीइतक्याच लांबीच्या असाव्यात जेणेकरुन त्या आडव्या बरोबर बसतील आणि त्यांची जाडी १.५ सेंमी असावी म्हणजे एक वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा होतील. प्रत्येक स्वतंत्र वरील पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाशांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याकरता ३.३ सेंमीची रुंदी ठेवणं गरजेचं आहे.धुराडं हे दुसरं महत्वाचं साधन आहे. ते लहान पत्र्याच्या डब्यापासून तयार करता येतं. मधमाशा आपल्याला चावू नयेत आणि त्यांना नियंत्रित करता येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कापड - मधमाशा पालन क्षेत्रात काम करताना माशांच्या दंशापासून आपले डोळे आणि नाकाचा बचाव करण्यासाठी. सुरी वरील पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी. पिस मधमाशांना पोळ्यापासून दूर करण्यासाठी. राणीमाशीविलगक Queen Excluder
आ. मधुमाशांच्या प्रजाती
भारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. त्या खालीलप्रमाणेः
दगडी माशी अपीस डोरसाटा या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असतं. लहान माशी अपीस फ्लोरिआ या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असतं. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असतं.
डंखरहित मधमाशी त्रिगोना इरीडीपेन्नीस वर उल्लेख केलेल्या प्रजातींच्या शिवाय, केरळमध्ये आणखी एक प्रजाती अस्तित्वात आहे तिला डंखरहित मधमाशी म्हणतात. त्या ख-या अर्थानं डंखरहित नसतात, परंतु त्यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३००-४०० ग्रॅम मध उत्पादन मिळतं.
इ. मधाच्या पोळ्यांची स्थापना
मध उत्पादन केंद्र पाण्याचा चांगला निचरा असलेल्या खुल्या जागेत उभारावं, शक्यतो फळांच्या बागांच्या जवळ, मकरंद, परागकण आणि पाणी भरपूर असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्यामधलं तापमान आवश्यक तितकं राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणं महत्वाचं आहे. पोळ्याच्या स्टँडच्या भोवती मुंग्या शिरु नयेत यासाठी पाणी भरलेले खंदक (अँट वेल्स) ठेवाव्यात. वसाहतींचे तोंड पूर्वेच्या दिशेला असावं, पाऊस आणि सूर्यापासून पेटीचं रक्षण होण्यासाठी दिशेमध्ये थोडेफार बदल करावेत. या वसाहतींना पाळीव जनावरं, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते आणि रस्त्याकडील दिव्याच्या खांबांपासून दूर ठेवावं.
ई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे
मधमाशांची वसाहत स्थापन करण्यासाठी, जंगलात वसलेली वसाहत एखाद्या पोळ्याकडे स्थानांतरित करुन किंवा मधमाशांचा जत्था जवळून जात असताना त्यांना तिथे वसण्यासाठी आकृष्ट करुन मधमाशा मिळवता येतात. तयार केलेल्या पोळ्यामध्ये एक जत्था किंवा एक वसाहत वसवण्याच्या पूर्वी, जुन्या पोळ्याचे करड्या रंगाचे तुकडे किंवा पोळ्यातील मेण नव्या पोळ्याला चोळून त्याचा वास मधमाशांसाठी ओळखीचा करणं फायद्याचं ठरतं. शक्य झाल्यास, राणी मधमाशीला एका नैसर्गिक जत्थ्यातून पकडून एखाद्या पोळ्याखाली ठेवावं आणि अन्य मधमाशांना आकृष्ट करावं. पोळ्यामध्ये वसवलेल्या जत्थ्याला काही आठवडे अर्धा कप गरम पाण्यात अर्धा कप पांढरी साखर विरघळवून अन्न द्यावं म्हणजे पट्ट्यांच्या लगत पोळं जलदगतीनं तयार करण्यात मदत होईल. अधिक गर्दी होऊ देऊ नये.
उ. वसाहतींचे व्यवस्थापन
मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळच्या तासांमध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून एकदा करावी. पोळ्याची स्वच्छता पुढील क्रमाने करावी, छप्पर, सुपर /सुपर्स, ब्रूड चेंबर्स आणि फ्लोअर बोर्ड. सुदृढ राणी माशी, अळ्यांची वाढ, मध आणि परागकणांची साठवणूक, राणी चौकटींची उपस्थिती, माशांच्या संख्या आणि नर मधमाश्यांच्या वाढ पाहण्यासाठी वसाहतींवर नियमितपणे देखरेख ठेवा.
मधमाश्यांच्या खालीलपैकी कोणत्याही शत्रूंद्वारे त्रास होत असल्यास त्याचा शोध घ्या. मेण पतंग (गॅलेरिया मेल्लोनेला) - मधमाशांच्या पेटीतील पोळं, कोपरे आणि पोकळीतून सर्व अळ्या आणि रेशीमयुक्त जाळ्या काढून टाका.
मेण कीडे (प्लॅटीबोलियम स्प.) - प्रौढ कीडे गोळा करुन नष्ट करा.
तुडतुडे - Mites: पोळ्याची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमँग्नेटमध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्यांनी स्वच्छ करा. तळाच्या बोर्डवरील सर्व तुडतुडे निघून जाईतोवर ही प्रक्रिया वारंवार करा.
अनुत्पादन काळातील व्यवस्थापन ज्येष्ठ माशांना काढा आणि उपलब्ध सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेम्बरमध्ये नीट बसवा. आवश्यक असल्यास, विभाजन बोर्ड बसवा. राणीच्या चौकटी आणि नर मधमाशांची चौकटी, दिसल्यास नष्ट करा.
भारतीय मधमाश्यांसाठी प्रति आठवडा प्रति वसाहत २०० ग्रॅम साखर या दराने साखर सीरप (१:१) द्या. पळवापळवी टाळण्यासाठी सर्व वसाहतींना एकाचवेळी अन्न द्या. मधाची उपलब्धता असण्याच्या काळातील व्यवस्थापन मध उपलब्ध असण्याच्या हंगामापूर्वी वसाहतीत पुरेशा संख्येनं माशा ठेवा. पहिले सुपर आणि ब्रूड चेम्बर यांच्यामध्ये जास्तीत जास्त जागा द्या आणि पहिल्या सुपरच्या वर नको. राणीमाशीला ब्रूड चेम्बरमध्येच ठेवण्यासाठी ब्रूड आणि सुपर चेम्बर यांच्या दरम्यान राणीला वेगळी करण्याच्या शीट्स ठेवा. वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा करा आणि मधानं भरलेल्या फ्रेम्स सुपरच्या बाजून काढून घ्याव्यात. तीन-चतुर्थांश भाग मधानं किंवा परागकणांनी भरलेल्या आणि एक-चतुर्थांश बंदीस्त अळ्यांनी भरलेल्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घ्याव्यात आणि त्यांच्या जागी रिकामी पोळी किंवा फ्रेम्स आधारीसहित ठेवण्यात याव्यात. पूर्णतः बंदीस्त, किंवा दोन-तृतियांश आवरणयुक्त पोळी मध काढण्यासाठी बाहेर काढण्यात यावीत आणि मध काढून घेतल्यानंतर सुपर्समध्ये परत ठेवावीत.
ऊ. मधाची काढणी
मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत.
मधमाशीचे जीवनचक्र
समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे-
१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वत:भोवती कोश तयार करते.
२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत.
३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लँग्वेज” च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता.
४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.
५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही.
६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.
मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.
No comments:
Post a Comment