Search here..

Saturday, January 16, 2016

दोडका / तुराई

दोडके (तुराई ) लागवड

जमीन:
मध्यम भारी,पोयट्याची,पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. 
तापमान २० ते ३५ सेल्सियस दरम्यान हवामान – समशीतोष्ण मानवते.

लागवड
कालावधी जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान चालते.
पूर्व मशागत करताना नांगरणी,दोन वेळा वखरणी करावी.
पुसा नसदार,देशी,चैताली,को-१,कोकण हरिता,फुले-सुचेता इत्यादि शिफारसीत वाणचे एकरी २ किलो बियाणे वापरावे. 

लागवड पद्धत -
दोन ओळीत २ अंतर,दीड मीटर अंतरावर २ बाय २ फुटाचे खड्डे करून माती शेणखताने भरावे. एका ठिकाणी २/३ बिया पेराव्या. मांडव उभारणे आवश्यक आहे. 

खत व्यवस्थापन:
शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ टन शेणखत टाकून पाळी द्यावी.लागवड करताना एकरी २५ किलो नत्र,३० किलो स्फुरद ,५० किलो पालश एक महिन्याने २५ किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
या सोबतच लागवड केल्यास २ दिवसांनी १२:६१:० खत १.५ किलो + युरिया २ किलो  ड्रेंचिंग करा.
हिरवी वाढ व्यवस्थित झाल्यास १९:१९:१९ खताची २ किलो + युरिया २ किलो  ड्रेंचिंग करा.
फूल लागवड कालावधीत व पहिल्या तोडणी अगोदर १२:६१:० ची २.५ किलो + १३:०:४५ ची २ किलो + कॅल्शियम नायट्रेट ०.५ किलो ड्रेंचिंग करा.
दुसर्‍या किंवा त्या पुढील तोडणीच्या वेळी १३:०:४५ ची ३ किलो ड्रेंचिंग करा.

पाणी व्यवस्थापन :
५०% वापसा अवस्था राहील असे ठिबकद्वारे दर ४ ते ५ दिवसांनी पाणी पाळी द्यावी.

कीड व रोग नियंत्रण -
नाग अळी
नियंत्रणासाठी अबामेक्टिन ४ मिली १० लीटर पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन  १८ मिली  किंवा अ‍ॅसिफेट +इमीडाक्लोप्रिड  ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.

अंकुर आणि मुळे खाणारी अळी
पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान ३जी १२ किलो प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल ५%एस सी ५०० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० ई सी ड्रेंचिंग करा किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड ८० डब्ल्यू जी १५० मिली प्रति २५० लीटर पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.

फळ माशी
नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ एस सी ५ मिली + स्प्रेडिंग एजेंट ६मिली  १० लीटर पाण्यातून फवारा किंवा फिप्रोनिल ५ एस सी ३० मिली प्रति १५ लीटर पानी किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन ५ मिली प्रति १० लीटर पानी ची फवारणी करा.

पांढरी माशी
पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन ५० डब्ल्यू पी २०ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अ‍ॅसिफेट ५०%+इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.

डाऊनी/केवडा -
नियंत्रणासाठी बिटरटेनोल २५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल २५ मिली प्रती १५ लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम १२%+ मॅनकोझेब  ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.

भूरी रोग
पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर १० किलो प्रति एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम+ मॅनकोझेब २ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.

* पाना फळांवरील ठिपके रोगात सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी भूरी प्रमाणे नियंत्रण करा.

तण नियंत्रण करण्यासाठी पेंडीमेथलीन १.२५ लीटर प्रती २०० लीटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ४८ तासांच्या आत जमीन ओलसर असताना ऐका एकरात फवारा. तसेच बियाणांची उगवण झाल्यावर १० ते १५ दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी १-२ वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.
* ६० दिवसानंतर फळे काढणीस येतात. उत्पादन एकरी ४ ते ५ टन मिळू शकते.

पडवळ

पडवळ
पडवळ लागवडीस अर्धा ते एक मीटर खोलीची जमीन निवडावी .

लागणीची पद्धत 
पडवळ लागवडीस सरी वरंबा चांगली मानली जाते .पङवळच्या जाती नुसार 200×120 सेंमी  दोन वेलीतील अंतर  ठेवावे. खुरप्या सहायाने 3ते 4 बीयाची लागवड करावी.

बियाणे:-
5ते 6लागवडीस वापरावे 

बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बियायान्यास प्रती किलो प्रमाणे 20 ग्रॅ म बविस्टिन  याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति हे. 25 ते 30 टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 50 किलो प्रमाणे नत्र , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी परत 30 दिवसानी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी .

किड नियंत्रण 
1) लाल भुंगेरे - पिकाचि पाने कुरतडुन खाते नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात  40  ग्राम कर्बारील किंवा  मॅलॅथिऑन 10 मिली ची फवारनी करावी .

2) फळ माशी - मॅलेथियॉन 10- मिली 10 लिटर पाण्यात फुले  येण्यापूर्वी  1ते 2 वेळा  फवारावेत .            

रोग नियंत्रण 
1)भुरी - फळावर पांढरे डाग पडतात ,वाढ खुंटते 
नियंत्रण - बाव्हिस्टीन किंवा कॅरेथेन 10 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

2) केवडा -नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन - एम -45 हे बुरशी नाशक फवारावे .

3)करपा -पानावर लाल रंगाचे दाग पडून पाने  सुकतात नियंत्रण करीता डायथेन एम- 45    10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम प्रमाणे  मिसळून फवारावे

महत्वाची घ्यावयाची काळजी 
पडवळची काढनी फळे  कोवळी असतांनच  करने आवश्यक आहे कारण फळे जास्त जुने झाल्यास   साल  व बी टनक होते त्यामूळे  फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडणार .करीता काळजी घेणे आवश्यक आहे.

काकडी

जमीन

जमिनीची नांगरट करून एकरी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो देवून जमीन तयार करावी.
1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.

लागणीची पद्धत 
काकडीच्या लागवडीस सरी वरंबा चांगली मानली जाते .काकडीच्या जाती नुसार 90 सेंमी वर लागवड करून दोन वेलीतील अंतर 45सेंमी ठेवावे. खुरप्या सहायाने 3ते 4 बीयाची लागवड करावी .
बियाणे
हिमांगी, फुले शुभांगी, पूना खिरा, पुसा संयोग, शीतल या जाती जास्त वापरल्या जातात.
बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
काकडी पिका करीता पेरणी पूर्वी 25 टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 50 किलो प्रमाणे नत्र , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी परत 30 दिवसानी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी .

किड नियंत्रण 
1) लाल भुंगेरे - नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात  40  ग्राम कर्बारील किंवा डायमेथोयेट 10 मिली ची फवारनी करावी .

2) फळ माशी - मॅलेथियॉन 10- मिली 10 लिटर पाण्यात 1ते 2 वेळा  फवारावेत . 
काकडी                 

रोग नियंत्रण 
1)भुरी - फळावर पांढरे डाग पडतात ,वाढ खुंटते 
नियंत्रण - बाव्हिस्टीन किंवा कॅरेथेन 10 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

2) केवडा -नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन - एम -45 हे बुरशी नाशक फवारावे .

महत्वाची घ्यावयाची काळजी 
काकडी वर येणारे रोग व किडिचे नियंत्रण वेळीच   करने आवश्यक आहे जेणेकरून फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडणार नाही

उन्हाळी काकडी लागवड तंत्र

उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानतील तीव्र झळांच्या काळात काकड़ी जवळपास सर्वांना आवडते. उन्हाळी काकड़ी लागवड तंत्रज्ञान देत आहे.
* या पिकासाठी जमीन सर्व प्रकारची चालते पण तिचा पी एच ५.५ ते ६.५ दरम्यान असल्यास अधिक योग्य.
* यासाठी हवामान कोरडे अधिक मानवते. तापमान १८ ते २८ सेल्सियस उत्तम.
* पेरणी पूर्वी खोल नांगरणी करावी त्यानंतर दोन उभ्या-आडव्या वखर पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ ते ३ टन चांगले कुंजलेले शेणखत व्यवस्थित मिक्स करावे सोबतच फळमाशी नियंत्रणसाठी निंबोळी खत वापरावे.
* लागवड कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी योग्य.
* बाजारात अनेक नवीन वाण उपलब्ध आहेत. वाण निवड करताना अधिक उत्पन्न,रोग प्रतिकारक क्षमता, इत्यादि बाबी तपासून घ्या.प्रामुख्याने बलम खिरा, पुसा संजोग, संकरित हिमांगी, फुले शुभांगी, प्राची, शीतल, चंपा हे वाण शिफरशीत आहेत.
* बियाणे एकरी एक किलो वापरावे.
* लागवड पद्धत - दोन ओळीतील अंतर १.५ ते २.५ मीटर, दोन रोपात ९० सेमी ठेवावे.  
* प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकूनही ठिबक वर लागवड केल्यास पाण्याची बचत होते व उत्पन्नही अधिक मिळते. 
* ठिबकने विद्राव्य खते द्यावी.
* जमिनीच्या मगदुरा नुसार ६५ टक्के आर्द्रता टिकवून ठेवावी. तापमानानुसार किंवा दर आठवड्याला एक पानी द्यावे.
* डाऊणी आल्यास मेंकोझेब फवारावे किंवा कॉपर किंवा सल्फरची धुरळणी चालते. 
* फळमाशीचा प्रादुर्भाव दिसन्याची शक्यता असल्यास निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* साधारणपणे ४५ दिवसांनी तोडणी सुरु होते यात ८ ते १० तोडण्या मधे गावरान एकरी ३० क्विंटल तर संकरित एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळू शकते.
* बियाणे वांझ निघण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे, योग्य ती खबरदारी घ्यावी.
* खरेदी केलेल्या बियान्याची पावती, लेबल, थोड़े सैंपल बीयाने सांभाळून ठेवा.
* दुष्काळजन्य परिस्थितीत लागवड जर योग्य राहिली तर नक्की फायदा होवू शकेल.

भेंडी

जमीन
लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून हेक्‍टरी 20 टन शेणखत मिसळावे.

लागवड
खरीप हंगामात जुलैच्या पहिला आठवड्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड करावी. शक्यतो २२ ते ३० सें. तापमान असलेल्या भागात केंव्हाही लागण केलेली चालते. 

बियाणे / वाण
लागवडीसाठी फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय या जातींची निवड करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी 15 किलो बियाणे लागते. लागण 30 X 15 सें.मी. अंतराने करावी.

बीज :
BRO 6 : ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे. २८ ते ४० दिवसात चार ते पाच फुटव्यावर फुले लागतात.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 130 क्विंटल आणि पावसाळ्यात 160 क्विंटल

BRO 5 : ही बुटकी जात आहे. याचे फुटवे जास्त वाढत नाहीत. वाढ ६० ते ८० CM होते. ४० दिवसात चौथ्या फुटव्यावर फुले लागतात. ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 120 क्विंटल आणि पावसाळ्यात 150 क्विंटल

परभणी क्रांती : ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे. ५० ते ५५ दिवसात तोडा चालु होतो. ही पाच कडांची भिंडी आहे. कुस नसते.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 80 क्विंटल आणि पावसाळ्यात 110 क्विंटल


IIVR-10 : ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे. ४० ते ४५ दिवसात फुटव्यावर फुले लागतात. ही सात कडांची भिंडी आहे. कुस नसते.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 130 क्विंटल आणि पावसाळ्यात 150 क्विंटल
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

ख़त व्यवस्थापन
या पिकाला माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. पिक तणमुक्त ठेवावे.

भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती
भेंडीचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो. भेंडीची साल नरम असते आणि दमट हवामानात घेतले जाते ज्यामुळे कीडकीटकांचा हल्ला जास्त प्रमाणात होतो.  35-40% पर्यंत नुकसान होते.

कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न
किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी भेंडीवर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे
कमी मुदतीत तयार होणार्याम भेंडीमध्ये ह्या औषधांचे अंश शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्याच्या प्रकृतीवर होतात.
•रासायनिक कीडनाशके सतत वापरल्याने किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे तेच रोग पुन्हा उद्भवतात शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.

मुख्य किडी
तुडतुडे / लीफ हॉपर:
लीफ हॉपर व त्यांच्या अळ्या हिरव्या रंगाच्या असतात.ते पानावर तिरक्या रेषेत हल्ला करतात व पाने पिवळी पडून दुमडली जातात. रोग गंभीर बनल्यास पाने विटकरी रंगाची होऊन चुरगळतात.

खोड व फळे पोखरणारे किडे:
ह्यांच्या अळ्या रोपट्यांच्या फुटव्यांत वरून खाली भोके पाडून ठेवतात व झाड मरतुकडे बनते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती वेडीवाकडी होतात.

लाल कोळी:
ह्यांच्या अळ्या हिरवट लाल तर मोठे कोळी लंबगोलाकार व विटकरी रंगाचे असतात. लाल कोळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात.

पिवळ्या शिरांच्या नक्षीचा रोग:
पानावर पिवळ्या शिरांचे जाळे तयार होते व त्यात मधेमधे पानाचा हिरवा रंग दिसतो. नंतर मात्र पूर्ण पानच पिवळे पडते. हा रोग पांढऱ्या माशीमार्फत पसरतो.

मुळावर गाठी आणणारा किडा:
मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची वाढ खुंटते. ही कीड सूक्ष्म असते व जमिनीत राहून वनस्पतिजन्य पदार्थांवर जगते.

एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धती
• YVMV (Yellow Vein Mosaic Virus) रोधक हायब्रीड जाती लागण करणे, लागण खरीप हंगामात करणे. उदा. मखमली, तुलसी, अनुपमा-१ किंवा सन-४० इ.
•खोड व फळ पोखरणारी कीड दूर ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर मका किंवा ज्वारीसारखे तटरक्षक पीक घ्यावे.
•पांढऱ्या माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी डेल्टा व पिवळे चिकट सापळे ठेवा.
•किडे खाणाऱ्या पक्ष्यांसाठी एकरी १० पक्षीथांबे उभारा.
•लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी ५% Neem Seed Kernal Extract च्या दोन-तीन फवारण्या, आळीपाळीने, कीटकनाशकांसोबत द्या. AESA based IPM & ETL पातळी (प्रत्येक झाडावर जास्तीतजास्त 5 हॉपर) ओलांडली गेल्यास इमिडाक्रोपिल १७.८ एसएलची फवारणी १५० मिली/हेक्टरप्रमाणे करा. ह्याने इतर शोषक किडीही दूर राहतील.
•इरियास व्हायटेला ही माशी दूर ठेवण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे एकरी 2 या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
•खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणाऱ्या (एग पॅरासॉइट) ट्रायकोडर्मा चिलोनिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात, पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी, दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा. किडींचे प्रमाण ईटीएल पातळीच्या (५.३ % संसर्ग) वर राहिल्यास सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i /हे या प्रमाणात वापरा.
YVMV ने ग्रस्त झाडे आढळल्यास ती नष्ट करा.
•खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे वारंवार वेचून नष्ट करा
•लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी कडुनिंबावर आधारित रासायनिक खतांचा वापर करा – उदा. इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हेक्टर, सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i/हे (०.००५%), क्विनॉलफॉस २५ ईसी, ०.०५% अथवा प्रोपर्गाइट. ५७ ईसी, ०.१% इ.

स्रोत:  एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल, नवी दिल्ली 110 012

टोमॅटो

नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो  पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो  पिक घेता येते.
जमिन
रोपे तयार करण्यासाठी - 
रोपे तयार करण्‍यासाठी - गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा.
गादी वाफयात 1 घमेले शेणखत 50 ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा.

रोपे लागनीसाठी -
टोमॅटो  पिकासाठी मध्‍यम ते भारी जमिन लागवडी योग्‍य असते. हलक्‍या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्‍याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्‍याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्‍यम प्रतिचा म्‍हणजे 6 ते 8 असावा.
शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी. जमिनीत एकरी 12-15 गाडया शेणखत मिसळावे. लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेमी व दोन रोपातील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे.

लागवड
खरीप – जून, जूलै 
रब्‍बी ( हिवाळी हंगाम) सप्‍टेबर, ऑक्‍टोबर 
उन्‍हाळी हंगाम – डिसेंबर, जानेवारी

बियाण्‍याचे प्रमाण – हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम 
पुसा रूबी, पुसा गौरव, पुसा शितल, अर्का गौरव, रोमा, रूपाली, वैशाली, भाग्‍यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते. पेरणीपूर्वी बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे.

बियांची पेरणी ही वाफयाच्‍या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्‍यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफयास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्‍यानंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफयास 10 ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणविरहीत ठेवावेत. बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्‍यावर रोपांची सरी वरंब्‍यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्‍यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्‍ध होतात.  रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्‍याकाळी किंवा उन कमी झाल्‍यावर करावी.
बागेला वळण आणि आधार देणे
टोमॅटोच्‍या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो. 
1. प्रत्‍येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडिच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्‍या वाढीप्रमाणे काठीला बांधले जाते. 
2. या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून मांडव करून झाडे वाढविली जातात.

रासायनिक खते
सरळ वाणांसाठी 200-100-100 व संकरीत वाणांसाठी 300-150-150 किलो नत्र, स्‍फूरद पालाश या प्रमाणात खत द्यावे. अर्धा नत्र लागवडीच्‍या वेळी व उरलेला लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे.
पाणी व्‍यवस्‍थापन
रोपांच्‍या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. आणि त्‍यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पावसाळयात टोमॅटो  पिकास 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्‍या अंतरानी व उन्‍हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्‍या अंतरानी रोपांना पाणी द्यावे. भारी काळया जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पिक फूलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्‍वाचे आहे.

किड व रोग नियंत्रण
पर्णगुच्छ किंवा बोकड्या 
टोबॅको लीफकर्ल व्हायरसमुळे पर्णगुच्छ किंवा बोकड्या या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पांढरी माशी पानांतील रस शोषते. पाने पिवळी पडून वाळतात. या किडीने सोडलेल्या चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते. 
प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास रोगग्रस्त झाडे नष्ट करावित. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि.किंवा मिथाईल डेमेटॉन (25 टक्के प्रवाही) 15 मिलि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ८ -१० दिवसांच्या अंतराने फवारावे.

टोमॅटोवरील नागअळी 
किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाय करता येतील:
1. पीक फेरपालट: दरवर्षी एकाच ठिकाणी टोमॅटोचे पिक न घेता पिकांची अदलाबदल करा. त्यामुळे नागअळीच्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
2. रात्री फुलणाऱ्या पिकांचे नाश: नागअळीच्या पतंगांचा अंडी घालण्याचा काळ रात्रीचा असतो. त्यामुळे रात्री फुलणारे गवत आणि इतर तणांचे नाश करून त्यांना कमी जागा मिळेल.
3. प्रकाश सापळे: नागअळी पतंगाला आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे (Light Traps) लावा. रात्री हे पतंग प्रकाशाकडे आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात.
4. फेरोमोन सापळे: नागअळीच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सापळे (Pheromone Traps) वापरा. यामुळे नागअळीच्या प्रजनन चक्रात व्यत्यय आणता येतो.
5. सेंद्रिय कीटकनाशके:
  • नीम अर्क: 5% निंबोळी अर्काची फवारणी केल्याने नागअळीचे नियंत्रण होते.
  • अग्निस्राव: लसूण, मिरी, आलं आणि हळदीच्या अर्काचा वापर नागअळीला दूर ठेवू शकतो.
6. जैविक नियंत्रण: नागअळीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचा वापर करा. उदा. ट्रायकोग्रामा नावाचा परजीवी कीटक नागअळीच्या अंडांवर उपजीविका करतो.
7. रासायनिक कीटकनाशके (तज्ञांच्या सल्ल्यानुसारच वापर करा):
  • स्पिनोसॅड (Spinosad) – 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
  • इमामेक्टिन बेंझोएट (Emamectin Benzoate) – 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
  • क्लोरेन्ट्रानिलिप्रोल (Chlorantraniliprole) – 0.4 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
8. पीक व्यवस्थापन: पीक खालून आलेली जुनी पाने वेळोवेळी काढून टाका. तसेच, फळे जमिनीवर येऊ नयेत याची काळजी घ्या.

फळ पोखरणाऱ्या किडी - 
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी, बॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रतिहेक्‍टरी 1.25 किलो किंवा ऍझाडीरेक्‍टीन (1 टक्के) 25 मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मिलि. फवारावे.

फळांतील रस शोषण करणारा पतंग आणि हेलिकोवर्पा आर्मीजेरा या किडी नियंत्रणासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. एन. पी. व्ही. विषाणूचा २०० मि.लि. प्रति एकर फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस 
पानावर प्रथम लहान, तांबूसकाळसर चट्टे दिसतात; नंतर देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडावरसुद्धा पसरतो. तसेच संपूर्ण झाड १०-१५ दिवसांत करपून वाळून जाते. 
उशिरा रोग झाल्यास, फळावर पिवळसर लाल डाग, तसेच गोलाकार वलये दिसून येतात. फळांची पूर्णपणे वाढ होत नाही. या रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत (थ्रिप्स) होतो. फूलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणाकरिता 10 लिटर पाण्‍यात 12 ते 15 मिली मोनोक्रोटोकॉस व 25 ग्रॅम डायथेन एम 45 मिसळून बी उगवल्‍यानंतर 15 दिवसांनी फवारावे. नंतरच्‍या दोन फवारण्‍या 10 दिवसाच्‍या अंतराने कराव्‍यात.

कोळीच्या नियंत्रणासाठी, फेनझाक्वीन (10 टक्के प्रवाही) 25 मिलि. फवारावे.
TABLE ADD KARANE...
टोमॅटोच्या दर्जेदार उत्पादनासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना करावी.
(प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी)

"लागवडी अगोदर 4 ते 5 दिवस -अॅन्ट्राकाॅल-400 ग्रॅम+बाॅक्सर-200 मिली शेतात स्प्रे करणे '
लागवडी नंतर 4 ते 5 दिवस -इमीडाक्लोप्रिड-17.8% 150मिली + कर्झेट - 500 ग्रॅम
लागवडी नंतर 7 व्या दिवशी -रि-अगेन एल- 500 मिली+ अजुबा 400 मिली + मॅग्नेशियम सल्फेट-500 ग्रॅम +अॅन्ट्राकाॅल-500 ग्रॅम -फेरस  EDTA  100 ग्रॅम + मॅगनिज EDTA 50 ग्रॅम + झिंक EDTA  50  ग्रॅम
लागवडी नंतर 10 व्या दिवशी -बाॅक्सर 200 मिली + नुवान -200 मिली + रोको 200 ग्रॅम
लागवडी नंतर 13 व्या दिवशी - टिल्ट - 40 मिली + कुमान 400 मिली 
लागवडी नंतर 17 व्या दिवशी -किंग कोब्रा 200 मिली +झेड 78 - 500 ग्रॅम +नुवान 200 मिली
लागवडी नंतर 20 व्या दिवशी - 0.52.34.- 600 ग्रॅम + स्टार किंग 500 मिली + काॅन्टाफ 200 मिली
लागवडी नंतर 23 व्या दिवशी -स्टार- 250 ग्रॅम + मेटालेक्झील 35% 100 ग्रॅम + स्टेप्टो-18 ग्रॅम 
लागवडी नंतर 27 व्या दिवशी डेन्मार्क 200 मिली +नुवान 200 मिली + कॅब्रिओटाॅप 400 ग्रॅम 
लागवडी नंतर 30 व्या दिवशी -रि-अगेन -500 मिली +अजुबा -400 मिली + अॅन्ट्राकाॅल 500 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम + फेरस (EDTA) 100 ग्रॅम + मॅगनिज (EDTA) 50 ग्रॅम + झिंक (EDTA) 50 ग्रॅम
लागवडी नंतर 33 व्या दिवशी -हायफ्लाॅवर -500 मिली + रोको 200 ग्रॅम + नुवान -200 मिली + बाॅक्सर-200 मिल
लागवडी नंतर 36 व्या दिवशी
- कुमान - 500 मिली + टिल्ट-50 मिली 
लागवडी नंतर 39 व्या दिवशी -स्टार -250 ग्रॅम + मेटालेक्झील 35% 100 ग्रॅम + स्टेप्टो -18 ग्रॅम 
लागवडी नंतर 42 व्या दिवशी -बेस्ट-100 मिली + नुवान -200 मिली + फ्लोरीजन -500 मिली 
लागवडी नंतर 45 व्या दिवशी - 0. 52 .34.-600 ग्रॅम + स्टार किंग -500 मिली + काॅन्टाफ -250 मिली 
लागवडी नंतर 48 व्या दिवशी - स्टार -250 ग्रॅम + मेटालेक्झील 35%- 100 ग्रॅम + स्टप्टो 18 ग्रॅम
लागवडी नंतर 51 व्या दिवशी - स्टारगन 50 मिली + नुवान 200 मिली + कॅब्रिओटाॅप -400 ग्रॅम + फ्लोरीजन -500 मिली 
लागवडी नंतर 54 व्या दिवशी -रि-अगेन - 500 मिली +अजुबा - 400 मिली + अॅन्ट्राकाॅल -400 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट -500 ग्रॅम + फेरस (EDTA) 100 ग्रॅम
लागवडी नंतर 57 व्या दिवशी - हायफ्लाॅवर -500मिली + 0.52.34.-500 ग्रॅम + रोको 200 ग्रॅम + बाॅक्सर -200 मिली + नुवान -200 मिली 
लागवडी नंतर 60 व्या दिवशी - स्टार -250 ग्रॅम + मेटालेक्झील 35% 100 ग्रॅम + स्टेप्टो, -18 ग्रॅम
लागवडी नंतर 63 व्या दिवशी - बेस्ट 100 मिली + फ्लोरीजन 500 मिली + नुवान 200 मिली  + कॅब्रिओटाॅप -400 ग्रॅम
लागवडी नंतर 67 व्या दिवशी - रि-अगेन -500 मिली + अजुबा -400 मिली + अॅन्ट्राकाॅल - 400 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट - 500 ग्रॅम + फेरस (EDTA  ) 100 ग्रॅम
लागवडी नंतर 70 व्या दिवशी - हायफ्लाॅवर -500 मिली + 0.52.34.-500 ग्रॅम + रोको -200 ग्रॅम + बाॅक्सर 200 मिली + नुवान -200 मिली
लागवडी नंतर 72 व्या दिवशी - 0.52.34.-600 ग्रॅम + स्टारकिंग -500 मिली + काॅन्टाफ 200 मिली
लागवडी नंतर 75 व्या दिवशी - कोरोजन -40 मिली + कॅब्रिओटाॅप -400 ग्रॅम
लागवडी नंतर 78 व्या दिवशी - रि-अगेन -500मिली + अजुबा -400 मिली + अॅन्ट्राकाॅल 400 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट -500 ग्रॅम + फेरस ( EDTA  ) 100 ग्रॅम 
लागवडीचे नंतर 81 व्या दिवशी - हायफ्लाॅवर -500 मिली + 0.52.34.-500 ग्रॅम +रोको -200 ग्रॅम + बोरान -100 ग्रॅम
लागवडी नंतर 84 व्या दिवशी - कॅल्शियम क्लोराईड -500 ग्रॅम + काॅन्टाॅफ -200 मिली

नवलकोल *

माहिती अद्ययावत करणे चालू आहे.

कोबी

कोबी
हवामान आणि जमीन - 
कोबीच्या लवकर येणार्या जातींसाठी हलकी ते मध्यम उशीरा येणार्या जातींसाठी सुपीक, भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ -६.५ अस मात्र आम्लयुक्त जमिनीत कोबीच्या पिकास बोरॉन मॉलिब्डेनम  या सूक्ष्म अन्नद्रव्यांची  कमतरता पडून रोपे रोगट दिसू लागतात आणि उत्पादन  घटते.

बीजप्रक्रिया - 
५० ते १०० ग्रॅम बियासाठी २० ते ३० मिली जर्मिनेटर आणि १५ ते २० ग्रॅम प्रोटेक्टंटची पेस्ट बनवून बीजप्रक्रिया करावी.
गादीवाफ्याच्या रुंदीशी समांतर ५ ते ६ सेंमी अंतरावर  पेरावे. साधारणपणे एका चौरस मीटरला १ ग्रॅम बियाणे पडेल अशा तर्हेने बियाणे विरळ पेरावे. साधारणपणे ३ ते ५ आठवड्यांत कोबीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.

हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचे अंतर
खरीप हंगामासाठी रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी मे - जूनमध्ये करावी. रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करावीत.
- ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत रोपांची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते आणि मालाचा दर्जा उत्तम मिळतो.

एक हेक्टर लागवडीसाठी बियाणे - 
हळवे वाण 500 gm
गरवे वाण 300-400 gm
संकरित वाण 200-250 gm

बियाण्यांच्या पेरणीनंतर हंगामानुसार ३ -४ आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. गादीवाफ्यावरून रोपे उपटून शेतात लावताना आदल्या दिवशी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे. त्यामुळे रपे उपटतान मुळांना इजा होणार नाही.
रोपांची आटोपशीर  वाढ मध्यम आकाराचा गड्डा आणि लवकर काढणीला येणार्या जातींसाठी ४५ x ४५ cm किंवा ३० x ३० cm अंतर ठेवावे. 
मोठा गड्डा, रोपांची पसरट वाढ आणि अशिरा तयार होणार्या जातींची लागवड ६० x ६० cm किंवा ७० x ७० cm अंतरावर करवी. रोपांची पुनर्लागवड करताना १० लि. पाण्यामध्ये १००मिली जर्मिनेटर घेऊन त्ये द्रावणात रोपे पुर्ण बुडवून लावावीत. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तर्हेन रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर दुसर्या किंवा तिसरया दिवशी आंबवणी द्यावी.

लागवड पद्धती - 
पावसाळयाच्या सुरुवातीला ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीच्या खताचे पीक घेऊन ते जमिनीत गाडावे. हिरवळीचे पीक घेणे शक्य नसल्यास हेक्टरी १५ ते २० टन शेणखत, लेंडीखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत जमिनीत मिसळून द्यावे. नंतर २ मीटर रुंद आणि ३ मीटर किंवा सोयीस्कर लांबीचे वाफे तयार करावेत. खरीप हंगामात ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सरी- वरंबे पाडून वरील आकराचे वाफे बांधून घ्यावेत. पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन पद्धत वापरावी.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण - 
१) मावा : (अॅफिड्स ) - किडीची पिल्ले हिरव्या रंगाची असतात, तर कीड काळसर रंगाची असते. कीड कोवळ्या पानांतून अन्नरस शोषून घेतात. पानाच्या बेचक्यात, पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस ही कीड asate. पाने पिवळी होऊन गळून पडतात. रोपाची वाढ खुंटते, पाने आकसल्यासारखी रोगट, पिवळी दिसतात. 
उपाय : ढगाळ हवामानात या किडीची झपाट्याने वाढ होते. यासाठी १० लिटर पाण्यात २५ मिली लिटर मॅलाथिऑन आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट मिसळून १० ते २५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२) चौकोनी ठिपक्याचा पतंग -(डायमंड बॅक मॉथ) - या किडीचा पतंग पानकोबी तसेच सर्व कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. सप्टेंबर ते मार्च या काळात  ही कीड सर्वत्र आढळते.
उपाय - १० लिटर पाण्यात २० मिली क्विनॉलफॉस किंवा ४ % निंबोळी अर्काच्या प्रोटेक्टंट २० ग्रॅमसह (रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर) १० -१२ दिवसांच्या अंतराने २ -३ फवारण्या कराव्यात.

३) मोहरीवरील काळी माशी -(मस्टर्ड सॉ फ्लाय )- ही बारीक, जाडसर काळपट पिवळसर रंगाची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. Tyapasun nighalelyaकाळसर रंगाच्या अळ्या पिकाची कोवळी पाने खातात. या अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपांवरील पाने खातात. पानकोबी, फुलकोबी या पिकांशिवाय नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते.

4) कोबीवरील फुलपाखरू (कॅबेज बटरफ्लाय) - कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पांढर्या रंगाचे मोठे फुलपाखरू अंडी घालते. त्यातून निघणाऱ्या हिरव्या अळ्या पाने खातात. पानांवर असंख्य छिद्रे दिसतात.

५) पानावर जाळी विणणार्या अळ्या (लीफ वेबर ) - या किडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या आह्या पानाचा पृष्ठभाग खातात पाने गुंडाळून स्वत: भोवती जाळी तयार करतात. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.

६) गड्डा पोखरणारी अळी (ग्रॅम कॅटरपिलर ) - फिकर पिवळसर विटकरी रंगाचे हे पतंग कोबीच्या पानांवर अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या तांबूस करड्या रंगाच्या असतात. या अळ्या पाने खातात आणि पानांमागे लपून बसतात. तसेच गड्डे पोखरून आत शिरतात. त्यामुळे गड्ड्यांची प्रत खराब होते.

उपाय : वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिली मॅलथिऑन आणि २० मिली क्विनॉलफॉस (इकॅलक्स) किंवा ४ % निंबोळी अर्क + २५ ग्रॅम प्रोटेक्टंट एकत्र मिसळून लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या दिल्यास कोबीवरील पाने कुरतडणार्या तसेच गड्डा पोखरणार्या सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारण्या प्रोटेक्टंटचा नियमित वापर केल्यास किडीस प्रतिबंध होतो.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण - 
१) रोपे कोलमडणे (डॅपिन ऑफ) - हा रोग जमिनीत वाढणार्या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात, पाण्याचा योग्य निचर न होणार्या जमिनीत होतो. रोपे निस्तेज पिवळसर दिसतात. रोपांचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे पडतात.
उपाय : रोपे नेहमी पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या ठिकाणी गादीवाफ्यावर तयार करावीत. पेरणीपूर्वी १३ ग्रॅम कॅपटॉंन किंवा फायटेलॉन १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर झारीने शिंपडावे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास व पुनर्लागवडीत रोपांना जर्मिनेटरची प्रक्रिया करा.

२) काळी कूज (ब्लॅक लेग) - बियाण्यात वाढणार्या बुरशीपासून या रोगाचा प्रसार होतो. रोगाचे प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजतात.
उपाय : बियाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी १ ग्रॅम कॅपटॉंन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पानकोबी, फुलकोबी किंवा नवलकोल बियाणे prakriya karun पेरणीसाठी वापरावे.

३) केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) - रोगग्रस्त पानांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर भुरकट केवड्याच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. गड्ड्यांची काढणी लांबल्यास गड्ड्यांवर काळपट चट्टे दिसतात आणि असे गड्डे सडू लागतात.

४) करपा (ब्लॅक स्पॉट) - या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकर किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. नंतर हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग करपल्यासारख्या काळपट रंगाचा दिसतो.
उपाय : केवडा व करपा दोन्ही रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पिकावर १% बोर्डो मिश्रण फवारावे किंवा १० लिटर पाण्यात २५ मिली थ्राईवर + २५ मिली क्रॉंपशाईनर+ २५ ग्रॅम डायथेन एम - ४५ हे औषध मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या करा.

५) भुरी (पावडरी मिल्ड्यू ) - कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य रोग क्वचित प्रसंगी आढळतो. सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला पांढर्या रागाचे ठिपके दिसतात. काही काळाने संपूर्ण पानावर करड्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच १० लिटर पाण्यात थ्राईवर २५ मिली + २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून फवारणी करवी.

६) मुळकुजव्या (फ्लबरूट ) - या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा  सामू ७ पेक्षा कमी आहे अशा जमिनीत  या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.
उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल - विम्ल निर्देशांक वाढवावा. रोपांच्या लागवडीपूर्वी रोपे जर्मिनेटर १० मिली आणि २ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.

पिकांची काळजी :
वरील कीड, रोग, विकृतींवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात. 
फवारणी :
१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.