Search here..

Friday, January 22, 2016

बाजरी लागवड

मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा. 

संकरित वाण - 
श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्‍यतो संकरित वाण पेरावेत.

पेरणी व बीजप्रक्रिया -
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 x 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्‍झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन -
शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्‍या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत -
पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे. 

हंगाम ----माध्यान्ह---- उपाययोजना -
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्‌बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो. 

पाणी व्यवस्थापन -
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे. 

आंतरपीक -
अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात. 
हलक्‍या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा. 

तणनाशकाचा वापर -
गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्‍टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्‍चात तणनाशक हेक्‍टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्‍य घ्यावा. 

बीट लागवड

जमीन 
बीटची लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा परंतु सामु १० पर्यत असेल तरी उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. कृष्णेच्या खारवट क्षारयुक्त जमिनीत बीट हा उत्तम पर्याय आहे. 

हवामान 
बीट वाढीसाठी १५ ते ३५ से. तापमान योग्य आहे. कमी तापमानात साखर उतरत नाही तर जास्त तापमानात कंदाचा आकार बिघडतो. महाराष्ट्रात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बीट पीक घेता येते. 

वाण 
डेट्राईट डार्क रेड
आकार - गोल आणि मुलायम 
रंग - गर्द लाल (रक्तासारखा) 
पाने - गर्द हिरव्या रंगाची व तपकिरी 
कालावधी - ८० ते १०० दिवस 

क्रीमसन ग्लोब
आकार - निमुळता गोल आणि चपटा 
रंग - मध्यम व फिकट लाल 
पाने - आकाराने मोठी आणि गर्द हिरव्या रंगाची व तपकिरी 
कालावधी - ८० ते १०० दिवस 

इतर वाण - क्रॉसब्रॉय इजिप्शीयन आणि अर्ली वन्डर 

लागवड 
एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे ७ ते १० किलो बियाणे लागते. बीटचे बी लागण करण्यापुर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा.  पाभरीने बीटची पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर करतात नंतर विरळणी करून एका ठीकाणी एकच रोप ठेवावे.  बी टोकून बीटची लागवड करण्यासाठी ४५ सेंटीमिटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर १५ - २० सेंटीमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. बीटची लागवड ३०-४५ बाय १५-२० सेंटीमीटर अंतरावर करावी.

विरळणी 
बीटच्या बियाण्याची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे. बिटच्या एका बीजामध्ये २ ते ६ बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते. म्हणून बीटमध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. विरळणी करतांना एका ठीकाणी फक्त एकच रोप ठेवावे. आणि बाकीची रोपे हातांनी काढून टाकावीत. 


खते व्यवस्थापन 
जमिनीच्या मशागतीची वेळी १५- २० गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. बीटच्या पिकाला ६०-७० किलो नत्र, १०० ते १२० किलो स्फुरद आणि ६०-७० किलो पलाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पलाशची पुर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी.

पाणी व्यवस्थापन 
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

काढणी आणि उत्पादन -
बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ सेंमी झाल्यावर काढणी करावी. काढणीनंतर कंदाची प्रतवारी करावी. कंद विक्रीला पाठविण्यापुर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. बीटचे उत्पादन हेक्टरी २५ टन इतके मिळते.

मेथी

मेथी लागवड.

वर्षभर चवीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथी. याची मागणीपण वर्षभर असते आणि समशीतोष्ण हवामानात लागवडही वर्षभर करता येते.
* यासाठी जमीन मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा होणारी असावी.  
* हि भाजी ४०ते ६० दिवसांनी काढता येते त्यामुळे  टप्प्या टप्प्याने वाफे लावल्यास वर्षभर उत्पन्न घेता येते.
* लागवड करण्यापूर्वी दोन वखर पाळ्या देवुन जमीन भुसभूषित करावी.
* त्यानंतर  ३ बाय २ मीटरचे सपाट वाफे करुण भाजीसाठी फेकून लागवड करता येते. 
* वाण: मेथी-१, राजस्थान मेथी-१. मेथी नं.४७, प्रभा,पुसा अर्ली बंचिंग, कसुरी इत्यादि सुधारित वाण निवडावेत.

* पाणी व्यवस्थापन करताना जमिनीच्या मगदुरा नुसार मध्यम जमिनीस दर ७-८ दिवसांनी एक पाणी पाळी द्यावी.
* यात मर हाच प्रमुख रोग आहे. बियाणे  संस्कार  करुण तो टाळता येतो. इतर विशेष रोग येत नाही. 
* किडी मधे नागअळी हा मोठा धोका आहे. यासाठी लागवडी नंतर ७ दिवसांनी १००० पी पी एम निंबोळी अर्काची ३ मिली प्रति लीटर प्रमाणे एक फवारनी घ्या.ु
* ४० ते ६० दिवसांनी उपटून जुड्या बांधाव्या व भाजीची माती तिथेच शेतात झटकुन घ्यावी. हिरवी भाजी उत्पादन एकरी ३ टन मिळू शकते.

मेथी बीजोत्पादन करण्यासाठी:
* मेथी बिया उत्पादनासाठी थंडी आवश्यक म्हणून लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधे करावी.
*  दोन रोपात १० सेमी.अंतर काही राज्यात रोप तयार करून सरी वरंबालागवड करतात
* बिया काढणीसाठी १५० दिवसांनी काढनी करुण खळ्यावर वाळवाव्या नंतर मळणी करावी याचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्विंटल मिळते.

कलिंगड

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची, पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.
१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.
४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :
१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे.दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य आहे.

लागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो.

पाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.

पीक संरक्षण : (कीड व रोग)

कीड : नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो.
१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.
३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात होते.

रोग :
१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.
२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.
३) मर : बुरशीजन्य रोग असून वेली संपूर्ण जळून जातात. 

फळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे ?

१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.
२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.
३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.
उत्पादन : साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.

भोपळा लागवड करण्यापूर्वी एकदा वाचलेच पाहिजे..

हवामान
हे उबदार हवामानातील फळभाजीचे पीक आहे. थंडीचा कडाका या पिकाला अपायकारक असतो. भरपूर आर्द्रता व सौम्य तापमान असलेल्या प्रदेशात हे पीक चांगले येते. मक्यासारख्या पिकात थोड्याफार सावलीतही ते वाढते. उन्हाळ्यातील कोरड्या हवामानापेक्षा पावसाळ्यातील आर्द्र हवामान या पिकाला जास्त मानवते. बी लावल्यापासून ११० ते १२० दिवसांत फळे तयार होतात.

जमीन : या पिकाला कोणतीही चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. वेलाची मुळे जमिनीच्या वरच्या भागात वाढणारी व पसरणारी असतात. धुळे जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत भोपळ्याची लागवड करतात.

प्रकार : काळा भोपळा भारतात सर्वत्र लागवडीत आहे. यात आकार, आकारमान आणि मगजाचा रंग या बाबतींत भिन्नता असलेले अनेक प्रकार आढळून येतात. मोठा लाल, मोठा हिरवा, मोठा गोल, पिवळा मगज व लाल मगज हे लागवडीतील सामान्य प्रकार आहेत. अर्का चंदन, आय. एच. आर ८३-१-१-१ आणि सी. ओ. १ हे सुधारित प्रकार उपलब्ध आहेत. अर्का चंदन या हळव्या प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२.५ ते ३.५ किग्रॅ. वजनाची) व गोल आकाराची असून वरच्या व खालच्या टोकाला काहीशी चपटी असतात. मगज घट्ट असून फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा असतो. बी लावल्यापासून १२५ दिवसांत फळे तयार होतात. दर वेलाला ४-५ फळे धरतात. वाहतुकीत फळे चांगली टिकतात. फळांत कॅरोटिनाचे प्रमाण पुष्कळ असते. आय. एच. आर ८३-१-१-१ प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२ ते ३ किग्रॅ. वजनाची) व गोल असून वरच्या व खालच्या बाजूला जास्त चपटी असतात. सालीचा रंग फिकट तपकिरी ते पिवळा असून खोवणी उथळ असतात. सी. ओ. १ ची फळे गोलाकार व ७ ते ८ किग्रॅ. वजनाची असून बी लावल्यापासून १७५ दिवसांत फळे तयार होतात.

लागवड
उन्हाळी पिकासाठी बी लावणी जानेवारी ते मार्च व पावसाळी पिकासाठी जून-जुलै महिन्यांत करतात. नांगरून चांगल्या भुसभुशीत केलेल्या जमिनीत ८० सेंमी. व्यासाची गोल आळी खणून व त्यात भरपूर शेणखत घालून प्रत्येक आळ्यात ३-४ बिया २.५ ते ५ सेमी. खोलीवर लावतात. उहाळी पिकासाठी दोन ओळींत १.५ मी. व दोन वेलांत ७६ सेंमी. व पावसाळी पिकासाठी अनुक्रमे १.५ मी. व. ०.९ ते १.२ मी. अंतर ठेवतात.

पाणी
पावसाळी पिकास पाणी देण्याची गरज नसते. उन्हाळी पिकास गरजेप्रमाणे ४-५ अथवा ८-१० दिवसांनी पाणी देतात

वरखत
हेक्टरी ८० किग्रॅ, नायट्रोजन (दोन हप्त्यांत), ५० किग्रॅ. फॉस्फरस व तितकेच पोटॅश देतात. नायट्रोजनाचा निम्मा भाग, सर्व फॉस्फरस व पोटॅश जमिनीच्या मशागतीच्या वेळी व राहिलेला नायट्रोजन पीक फुलावर येण्याच्या सुमारास देतात.

रोग व किडी
या पिकावरील भुरी, तंतुभुरी, मर व व्हायरसजन्य रोग महत्त्वाचे आहेत. भुरीसाठी गंधकाचा व तंतुभुरीसाठी ताम्रयुक्त कवकनाशकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या द्रव्याचा) वापर करतात. मर रोग आणि व्हायरसजन्य रोगांसाठी रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हाच खात्रीलायक उपाय आहे. या पिकावर भुंगेरे व फळमाशी या विशेष उपद्रवी कडी आहेत. भुंगेऱ्यांसाठी १% लिंडेनाची भुकटी पिस्कारतात. फळमाशीमुळे किडलेली फळे काढून जाळतात अगर जमिनीत पुरतात. वेलांवर मॅलॅथिऑन फवारतात.

फळांची काढणी व उत्पादन
बी लावल्यापासून ३ ते ४ महिन्यांनी भोपळे तयार होण्यास सुरुवात होते व त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत फळे मिळत राहतात. फळे तोडताना देठाचा काही भाग ठेवून तोडतात. वेलावरच पिकलेली फळे पुष्कळ दिवस टिकतात. फळे काढल्यावर ती काही दिवस साठवून मग विक्रीला पाठवितात. हे फळ ४-६ महिन्यांपर्यंत टिकते.
पावसाळी पिकाचे हेक्टरी उत्पादन १३,७०० ते १८,८०० किग्रॅ. व उन्हाळी पिकाचे ६,५०० ते ७,५०० किग्रॅ. असते.


संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.
2. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.
3. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
क्षीरसागर, ब. ग.; परांडेकर, शं. आ.; गोखले, वा. पु.
स्त्रोत: मराठी विश्वकोश, दौलतगिरी गोसावी

काकडी

जमीन

जमिनीची नांगरट करून एकरी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो देवून जमीन तयार करावी.
1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.

लागणीची पद्धत 
काकडीच्या लागवडीस सरी वरंबा चांगली मानली जाते .काकडीच्या जाती नुसार 90 सेंमी वर लागवड करून दोन वेलीतील अंतर 45सेंमी ठेवावे. खुरप्या सहायाने 3ते 4 बीयाची लागवड करावी .
बियाणे
हिमांगी, फुले शुभांगी, पूना खिरा, पुसा संयोग, शीतल या जाती जास्त वापरल्या जातात.
बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
काकडी पिका करीता पेरणी पूर्वी 25 टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 50 किलो प्रमाणे नत्र , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी परत 30 दिवसानी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी .

किड नियंत्रण 
1) लाल भुंगेरे - नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात  40  ग्राम कर्बारील किंवा डायमेथोयेट 10 मिली ची फवारनी करावी .

2) फळ माशी - मॅलेथियॉन 10- मिली 10 लिटर पाण्यात 1ते 2 वेळा  फवारावेत . 
काकडी                 

रोग नियंत्रण 
1)भुरी - फळावर पांढरे डाग पडतात ,वाढ खुंटते 
नियंत्रण - बाव्हिस्टीन किंवा कॅरेथेन 10 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

2) केवडा -नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन - एम -45 हे बुरशी नाशक फवारावे .

महत्वाची घ्यावयाची काळजी 
काकडी वर येणारे रोग व किडिचे नियंत्रण वेळीच   करने आवश्यक आहे जेणेकरून फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडणार नाही

उन्हाळी काकडी लागवड तंत्र

उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानतील तीव्र झळांच्या काळात काकड़ी जवळपास सर्वांना आवडते. उन्हाळी काकड़ी लागवड तंत्रज्ञान देत आहे.
* या पिकासाठी जमीन सर्व प्रकारची चालते पण तिचा पी एच ५.५ ते ६.५ दरम्यान असल्यास अधिक योग्य.
* यासाठी हवामान कोरडे अधिक मानवते. तापमान १८ ते २८ सेल्सियस उत्तम.
* पेरणी पूर्वी खोल नांगरणी करावी त्यानंतर दोन उभ्या-आडव्या वखर पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ ते ३ टन चांगले कुंजलेले शेणखत व्यवस्थित मिक्स करावे सोबतच फळमाशी नियंत्रणसाठी निंबोळी खत वापरावे.
* लागवड कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी योग्य.
* बाजारात अनेक नवीन वाण उपलब्ध आहेत. वाण निवड करताना अधिक उत्पन्न,रोग प्रतिकारक क्षमता, इत्यादि बाबी तपासून घ्या.प्रामुख्याने बलम खिरा, पुसा संजोग, संकरित हिमांगी, फुले शुभांगी, प्राची, शीतल, चंपा हे वाण शिफरशीत आहेत.
* बियाणे एकरी एक किलो वापरावे.
* लागवड पद्धत - दोन ओळीतील अंतर १.५ ते २.५ मीटर, दोन रोपात ९० सेमी ठेवावे.  
* प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकूनही ठिबक वर लागवड केल्यास पाण्याची बचत होते व उत्पन्नही अधिक मिळते. 
* ठिबकने विद्राव्य खते द्यावी.
* जमिनीच्या मगदुरा नुसार ६५ टक्के आर्द्रता टिकवून ठेवावी. तापमानानुसार किंवा दर आठवड्याला एक पानी द्यावे.
* डाऊणी आल्यास मेंकोझेब फवारावे किंवा कॉपर किंवा सल्फरची धुरळणी चालते. 
* फळमाशीचा प्रादुर्भाव दिसन्याची शक्यता असल्यास निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* साधारणपणे ४५ दिवसांनी तोडणी सुरु होते यात ८ ते १० तोडण्या मधे गावरान एकरी ३० क्विंटल तर संकरित एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळू शकते.
* बियाणे वांझ निघण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे, योग्य ती खबरदारी घ्यावी.
* खरेदी केलेल्या बियान्याची पावती, लेबल, थोड़े सैंपल बीयाने सांभाळून ठेवा.
* दुष्काळजन्य परिस्थितीत लागवड जर योग्य राहिली तर नक्की फायदा होवू शकेल.

टरबूज उत्पादन

७० ते ८० दिवसात लखपती होण्यासाठी
टरबूज उत्पादन उत्तम पर्याय आहे. सविस्तर
"Seed to Seed Program"
पुस्तक मागणीनुसार घरपोच पाठवले जाते.
जमिनीची तयारी
चांगल्या वाढीसाठी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या.खोल नांगरट व सपाट करा.1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.
ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत 
पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

जाती
चांगल्या उत्पादनासाठी नन-8674, मधुबाला (ननहेम्स), एन एस-252, 701 (नामधारी सीड्स), एफ1 बॉक्सर, एफ1 मिडनाइट (महिको). या जातींची निवड करा.

बीजप्रक्रिया
बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी व बियाणे नरम होण्यासाठी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा.ज्यामुळे बियाणातील सुप्तावस्था दूर होईल.
सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.

पेरणी आणि लागवड पद्धती
चांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी.लागवडीचे अंतर 1.5 X 1 मी. किंवा 2.0 X 0.5 मी. ठेवावे.लागवडीसाठी 800gm ते 1 किलो बियाणे प्रती एकर लागते.
उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करावी.
चांगल्या वाढीसाठी उगवण झाल्यावर 8-10 दिवसांनी कमजोर आणि रोगट रोपे काढून 1 जागी एकच निरोगी रोप ठेवा.

तण व्यवस्थापन
तण नियंत्रण. पेंडीमेथलीन(पेंडालिन/स्टॉंप)@1.3Ltr/acre प्रती 200Ltr पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 48 तासांच्या आत जमीन ओलसर असताना फवारा.

आंतर मशागत
बियाणांची उगवण झाल्यावर 10-12 दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी 2-3 वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.

जैविक खते
लागवडीपूर्वी 15 टन शेणखत किंवा 500 किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.

रासायनिक खते
चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया)+20 किलो फॉस्फरस (125 किलो एसएसपी) + 20 किलो पोटॅशियम (33 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.
चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया किंवा 97किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्या.

पाण्यात विरघळणारी खते
  • फुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून फवारा.
  • फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा.
  • चांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .
  • चांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10 Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा.
सिंचन
  • पाणी व्यवस्थापन रबी हंगामात 10-20 दिवसाच्या अंतराने पाणी द्या.उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू देवू नका.
  • चांगले उत्पादन व वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या.
  • ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा 40% पाण्याची बचत होते.
कीड नियंत्रण
  • फळ माशी
हे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते. वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा. पिकाच्या काढणी नंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा .मुख्य पिकाबरोबर लसूण घास,मुळा,कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.
  • पांढरी माशी
पांढरी माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा.
पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.
  • अंकुर आणि मुळे खाणारी अळी
अळी पिकाचे मातीपासून मुळे व खोड नष्ट करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान 3G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) 12 kg प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5%SC (रीजेंट, सॅल्वो)500 ml किंवा क्लोरपायरीफॉस 20EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) 2 Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड 80WG (लेसेंटा) 150 ml 250 Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.
  • पान पायांचा ढेकूण
गर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते. अंकुर वाळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात. तीव्रता कमी असल्यास घायपात (केतकी)चा अर्क 350 ml/15 Ltr पाण्यातून फवारा. तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.
  • नाग अळी
नाग अळीमुळे पानांवर सफेद रंगाच्या रेषा दिसतात. नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अ‍ॅग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.
  • गाठी करणारे कीटक
हे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.

रोग नियंत्रण
  • डाऊनी
डाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.
  • भूरी
या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर 10 किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.
  • पाना फळांवरील ठिपके
सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC (टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

काढणी योग्य अवस्था आणि तंत्रज्ञान
देठाजवळील बाळी सुकल्यास तसेच जमिनीलगतचा पांढरट रंग बदलून पिवळसर झाल्यास फळे काढणीस तयार आहेत असा समजा.
तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास "बद बद" असा आवाज येतो. अपरिपक्व फळावर मारल्यास धातूची वस्तू ठोकल्यासारखा आवाज येतो.