Search here..

Friday, December 2, 2016

माझीशेती : शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहताना घ्यावयाची काळजी (१६१२०२)

माझीशेती : शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहताना घ्यावयाची काळजी (१६१२०२)
प्रशिक्षण रचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मार्गदर्शक सुचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

  • उत्पादकता वाढविणे
    याकरिता अंगीकृत कलागुणांना प्रशिक्षणांच्या माध्यमातुन वाव देऊन स्थानिक संसाधने वापरून योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. संपुर्ण महाराष्ट्र स्तरावर काम करताना कृषि महाविद्यालय, MSW कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा कॉलेजच्या सहयोगाने सेवेचे जाळे निर्माण केले आहे.

  • तांत्रिक मार्गदर्शन -
    या काळात समाजातील घटकांच्या गरजांचे प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय गरज असे वर्गीकरण केले जाते. समान गरजा असणाऱ्या गटांचे एकत्रितपणे निराकरण करणेसाठी कृतीगट स्थापन केला जातो.




  • प्रशिक्षण -
    देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सामाजिक संस्थांची नेमणूक केली आहे. या संस्थाना आवश्यक मनुष्यबलास प्रशिक्षित करून स्थानिक सामाजिक घटकांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठविले जाते. 




  • सेवापुरवठादार -
    यापद्दतीमधून मागणी होणाऱ्या आवश्यक सेवा पुरवण्यासाठी सेवापुरवठादार यांची नियुक्ती केली जाते. सहभागी सर्व घटकांचे कोडच्या माध्यमातुन ओळख निर्माण केली जाते. वेळ प्रसंगी काम थांबविले जाते मात्र कोणत्याही घटकाची ओळख प्रसिद्ध केली जात नाही.





Thursday, December 1, 2016

दुग्धविकास - दुधापासून प्रक्रिया केलेले पदार्थ

प्रस्तावना

सध्या बाजारपेठेत प्रामुख्याने तूप, लोणी, दूध पावडर, दही, लस्सी, पनीर, खवा हे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत. केवळ दूध विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून अधिक नफा मिळतो. घरगुती स्तरावर दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी लहान क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर निश्‍चितपणे फायदेशीर ठरतो.

दूध शीत करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्र :

दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसतत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची वाढ दुधात लगेच होते. पर्यायाने दूध लवकर नासते किंवा खराब होते म्हणजेच दूध जास्त काळ टिकवायचे असल्यास दुधातील सूक्ष्मजीवांची वाढ आणि संख्या मर्यादित ठेवणे आवश्‍यक असते. त्यासाठी दूध तापवणे, थंड करणे किंवा इतर तत्सम प्रभावी प्रक्रिया करणे क्रमप्राप्त ठरते. यापैकी बहुतांशी प्रक्रियाने दुधाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होण्याची शक्यता असते. त्यासाठी दुधास थंड तापमानास ठेवून दूध अधिक काळापर्यंत टिकवणे सोयीचे व किफायतशीर ठरते. त्यासाठी खालील उपकरणांचा उपयोग करावा.

फ्रिज :



  1. फ्रिजमध्ये एक लिटरपासून ते २० लिटरपर्यंत दूध ५ ते १० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवता येते.
  2. बाजारात १५० लिटर ते ५०० लिटर क्षमतेचे फ्रिज उपलब्ध अाहेत. त्यांची सर्वसाधारण किंमत १०,००० रुपये व त्यापेक्षा जास्तची आहे. फ्रिज वापरण्यास सुरक्षित आहे.

बल्क कुलर : 





  1. ज्या दूध उत्पादकांकडे १०० ते १००० लिटरपर्यंतचे दूध संकलन आहे, अशांसाठी बल्क कुलर फायदेशीर आहे. बल्क कुलर चौकोनी, आयताकृती आणि अंडाकृती आकारात उपलब्ध आहेत. हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असते.
  2. यामध्ये दुधाचे तापमान ५ ते १० अंश सेल्सिअस राखता येत असल्याने दुधाची टिकवण क्षमता वाढते. दोन वेळचे दूध संकलन एकाच वेळी करणे शक्य होते.
  3. बल्क कुलर हे दुहेरी पत्र्याने बनवतात. आतील-बाहेरील पत्र्यांमध्ये थर्माकोल, ग्लासवुल किंवा इतर उष्णतारोधक पदार्थाचा लेप दिलेला असतो, त्यामुळे बल्क कुलरमधील दुधाच्या तापमानावर बाहेरील वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नाही.
  4. बल्क कुलरमधील दूध थंड करण्यासाठी कॉम्प्रेसरची जोडणी केलेली असते. हे विद्युत अथवा जनरेटरवर चालवता येते. या उपकरणाच्या वरील बाजूस एक झाकणी असून, एक ढवळणीसुद्धा जोडलेली असते. या ढवळणीमुळे दुधाचे तापमान सर्व ठिकाणी समान राखले जाते. दुधावर साय येत नाही.
  5. बहुतांश दूध शीतकरण केंद्रावर बल्क कुलर उपलब्ध आहेत. याची किंमत अंदाजे १ ते १० लाखांपर्यंत आहे.
  6. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व काही दूध प्रक्रिया केंद्रामार्फत दूध उत्पादकास किंवा दूध संकलकास बल्क कुलर वितरित करण्यात येते.

डीप फ्रिजर :






  1. याचा वापर आइस्क्रीम, पनीर, श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थ अधिक काळास साठवण्यासाठी केला जातो.
  2. यामध्ये ० अंश सेल्सिअस ते -२८ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान राखले जाते. याची क्षमता १०० ते १००० लिटर किंवा अधिक असते. हे विजेवर चालते.
  3. डीप फ्रिजर हे स्टेनलेस स्टील किंवा फायबरमध्ये तयार केलेले असतात. याचा उपयोग दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी होतो.

दूध तापवण्यासाठीची उपकरणे : 






  1. दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. त्यासाठीची प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्‍चरायझेशन किंवा दूध तापवणे.
  2. या प्रक्रियेत दूध ७२ अंश सेल्सिअस तापमानावर १५ सेकंदांसाठी किंवा ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे तापवून थंड करण्यात येते. असे दूध पिण्यास सुरक्षित असते.
  3. दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्‍चरायझर (एलटीएलटी) किंवा प्लेट पाश्‍चरायझर (एचटीएसटी) चा वापर सर्वत्र होताना दिसून येतो.
  4. बॅच पाश्‍चरायझर हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. या उपकरणात दूध ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते. उपकरणाची क्षमता ५० ते ५०० लिटर असून, यातील दूध गॅस किंवा वाफेच्या ऊर्जेवर तापवले जाते.
  5. बॅच पाश्‍चरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले आहे. दोन पत्र्यादरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची किंवा दूध लागण्याची शक्यता कमी असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते.
  6. उपकरण वापरण्यास सोपे व सुरक्षित असून दही, आइस्क्रीम, पनीर व तत्सम पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उपकरणातील दूध एकसमान तापवण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील पुरवलेली असते.
  7. याची किंमत अंदाजे ८०,००० रुपये आहे. क्षमतेनुसार किंमत वाढत जाते.


डॉ. ज्ञानेश्‍वर पतंगे 
डॉ. डी. के. कांबळे 
(लेखक कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत)

Wednesday, November 30, 2016

उन्हाळी बाजरी लागवड करण्यासाठी शेतीचे नियोजन

*माझीशेती: उन्हाळी बाजरी लागवड करण्यासाठी शेतीचे नियोजन (161130)*

उन्हाळी बाजरी अधिक दर्जेदार, टपोरी, हिरवीगार निघते त्यामुळे चांगला भाव मिळतो. ५/६ पाणी देण्याची सोय असेल तर उन्हाळी बाजरी करायला हरकत नाही. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान उन्हाळी बाजरी पेरता येते. फुलोऱ्यात तापमान ३५ अंश सेल्सियस च्या पुढे गेल्यास उत्पादकता घटते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर बाजरी पेरावी लागते.

पूर्वमशागत, एकरी २ टन शेण खत, २ वेळा कोळपणी, पेरताना एकरी ५० किलो १८:१८:१०, पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया द्यावे.
या काळात पाऊस नसल्याने उत्तम प्रतीचा कडबा/ चारा मिळतो.

उन्हाळी वातावरणात रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. ९० दिवसात बाजरी काढणीस येते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
*महत्वाची सुचना -*
आपले सर्व शेतकरी आपल्या मुलांना शिकायला शहरात पाठवता. तुमचीही मुले शहरात असतील. महानगरे तर आपल्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.....

शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की, तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेत तर तुमच्या जवळच्या शहरातील मार्केट यार्डमध्ये "शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांमार्फत" चालविलेले कृषिमाल विक्री केंद्र चालु करणार आहोत. यातील पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबई येथे ही केंद्रे चालू झालेली आहेत.

प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने महिण्यातुन एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिल्यास शासनाच्या सहाय्याने व माझीशेतीच्या पुढाकाराने विकासाच्या दिशेने टाकलेला पाऊल प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आम्ही शेतकर्यांच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे हजारो हात पसरतो आहोत तुम्ही लाखो हात पुढे करुन प्रगतीचा मार्ग धरावा हि विनंती...

संस्थेचे स्वयंसेवक कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेत. आम्हाला अजुन स्फुरण चढवण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीवर एक हात व हातात एक हात द्यावा ही विनंती.

अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क करा. किंवा 09975740444 वर संपर्क करा.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444