जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी जमीन आवश्यक आहे.
बियाणे निवड
बीज प्रक्रिया
मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी जमीन आवश्यक आहे.
बियाणे निवड
अ.नं.
|
उपयोग
|
वाण
|
१
|
कडबा उत्पादन
|
फुले चित्रा, मालदांडी, फुले यशोदा,
CSV-22, परभणी ज्योती CSV-18, फुले वसुधा,
RSV-1006
|
२.
|
कोरडवाहू, कमी पाणी / दुष्काळग्रस्त भागासाठी
|
फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी, सिलेक्शन-3, फुले अनुराधा
|
३.
|
रोग प्रतिकारशक्ती
|
फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी, फुले यशोदा, परभणी ज्योती, फुले वसुधा,
RSV-1006, सिलेक्शन-3, फुले अनुराधा
|
४.
|
माझीशेती शिफारस
|
फुले चित्रा, मालदांडी
|
बीज प्रक्रिया
गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो आणि पेरणी थायोमेथोक्झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रतिकिलो अशी बीजप्रक्रिया करावी.
पेरणी
१ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत शेवटचा कालावधी (०१ ते १० ऑक्टोबर) सर्व बाजूने फायदेशीर ठरतो.
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
पेरणी
१ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत शेवटचा कालावधी (०१ ते १० ऑक्टोबर) सर्व बाजूने फायदेशीर ठरतो.
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
अ.नं.
|
पिक
|
खत मात्रा
|
१
|
जिरायती ज्वारी
|
४०
किलो नत्र, २०
किलो स्फुरद पेरणी बरोबर
|
२.
|
बागायती ज्वारी
|
८०
किलो नत्र, ४०
किलो स्फुरद व ४० पालाश
|
यापैकी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र ३५ ते ४० दिवसांनी पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे.
पाणी व्यवस्थापन
अ.नं.
|
पाणी
|
पिक स्थिती
|
दिवस
|
१
|
पहिले
|
जोमदार
वाढीच्या अवस्थेत
|
पेरणी
नंतर २५-३० दिवसांनी
|
२.
|
दुसरे
|
ज्वारी
पोटरीत असताना
|
पेरणीनंतर
५० ते ५५ दिवसांनी
|
३.
|
तिसरे
|
ज्वारी
फुलोऱ्यात असताना
|
पेरणीनंतर
७०-७५ दिवसांनी
|
४.
|
चौथे
|
कणसात
दाणे भरताना
|
पेरणीनंतर
९० ते ९५ दिवसांनी
|
कीड-रोग नियंत्रण
कणसावरील चिकटा
वातावरणातील थंडीचे प्रमाण वाढल्यास ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होते.
रोगाची लक्षणे-
कणसाच्या फुलाच्या गुच्छांतुन मधासारखा चिकट द्रव स्त्रवून संपूर्ण कणीस काळे पडते. परागीकरण न केलेले मादी वाण संपूर्णपणे या रोगास बळी पडून दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.
रोगाचे नियंत्रण-
◆ बांधावरील दुय्यम पोशिंदा वनस्पती (उदा. बहुवार्षिक गवत) नष्ट कराव्यात.
◆ पीक ५०% फुलोरावस्था सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलीटर पाण्यातून फवारावे. वरील फवारणी गरजेनुसार करावी.
आंतर / मिश्रपीक
अधिक थंडीमुळे करडई चे चांगले उत्पादन होते. वातावरणातील या संतुलणाचा विचार केला तर रब्बी ज्वारी आणि करडई यांचे ४:४ किंवा ६:३ या प्रमाणात मिश्र पीक घ्यावे.