Search here..

Saturday, February 24, 2018

दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी

उष्माघात -
शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्य्ता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.
उपचार व प्रतिबंध -
उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.

उन्हाळी हगवण -
एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रो लाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.


उपचार व प्रतिबंध -
हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे. तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रोलाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.

आम्लीय अपचन -
उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा असे अपचन होते.
उपचार व प्रतिबंध -
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.

जंतबाधेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम -
खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीची अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्लेष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.
उपचार व प्रतिबंध -
जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्या आहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल.

शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्‌भवणाऱ्या समस्येवर उपाय ठरते.


शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

No comments:

Post a Comment