Search here..

Wednesday, February 21, 2018

महिला सक्षमीकरण : बचत गटांचे योगदान

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमा पुजनाने
 करताना मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळेसो व सहाय्यक
संरक्षण अधिकारी पंचायत समिती, तासगाव.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मा. संरक्षण अधिकारी श्री. रावताळे साहेब यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी सावित्रीबाईनी समाजाशी दिलेला लढा आणि आताच्या जमान्यात महिलांना उपजीविकेसाठी द्यावा लागणारा लढा याचे अलंकारिक भाषेत वर्णन केले.

मा. संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिलांनी सक्षम होण्याकरिता प्रथम महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे हे सांगत रावताळे सरांनी एकीचे महत्व पटवून दिले. शासनाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन समजावून सांगताना त्यांनी महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या २५ वर्षे पुर्ण केलेबद्दल
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यशाळेमध्ये मा. संरक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन 
संरक्षण अधिकारी म्हणुन काम करताना असणाऱ्या जबाबदारीचे विश्लेषण करून महिलांच्या पाठीशी भावासारखे खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागात महिलांनी चिकाटीने आणि जिद्दीने सुरु केलेल्या उद्योगांची यशोगाथा दिल्लीपर्यंत पोहचल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी उद्योजक महिला बचत गट, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर महिला शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा
ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर मार्गदर्शन करताना
श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ व माझीशेती प्रमुख 

महिला बचत गटांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात निर्माण होणारा रोजगार आणि आर्थिक सक्षमता यांचे उदाहरण देत उपस्थित महिलांना बोलते केले. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या उपजिविका विकास कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही महिलांच्या औद्योगिक सद्गुणांना वाव देण्यासाठी गौरव करण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे सांगितले.

शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलून देईल हे सांगताना त्यांनी संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट याबाबत माहिती देत शासकीय, खाजगी, शैक्षणिक, व्यावसायिक वेबसाईट कश्या ओळखायच्या हे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया याचे फायदे –तोटे समजावून सांगताना त्यांनी ‘ब्ल्यु व्हेल’ या ऑनलाईन खेळाचे गंभीर परिणाम सांगितले. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि त्यातुन रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी महिलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. वकील श्री. राजेंद्र माने, यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग २५ वर्षे पुर्ण झालेच्या निमित्ताने
कार्यशाळेमध्ये ग्रामीण विकासामध्ये उपयोग याविषयावर
मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. राजेंद्र माने

न्यायालयातील विकृत मानसिकतेचे अनुभव सांगताना त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच काही अनुभवातून सभागृहात हास्यफवारे उडाले. महिलांनी आणि पुरुषांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील त्यांचे प्रबोधन मोलाचे ठरले.


कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.


गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वाने दिशादर्शकाचे काम करणाऱ्या माय-माऊलींना प्रशस्तीपत्राने सन्मानित करताना मान्यवर...

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजक आणि सक्षम बचत गटांना सन्मानित करणेत आले.

कार्यक्रमातील क्षणचित्रे - 
 

No comments:

Post a Comment