महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी
प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी
महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शहीद कै. शंकरराव मोहिते चरीटेबल
ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पाटील यांचे हस्ते शहीद शंकरराव मोहिते यांच्या
प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये
श्री. प्रदीप फासे यांनी शंकरराव मोहिते यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांनी दिलेला
लढा याविषयी सांगून कार्यक्रम पुढे सुरु ठेवला.
शहीद कै. शंकरराव मोहिते यांच्या प्रतिमा पुजन करताना मा. दत्तात्रय पाटील |
मा. श्री. डी. डी. मंडले,
मुख्याध्यापक वीरभद्र कृषि महाविद्यालय सिद्धेवाडी ता. तासगाव यांच्या मार्गदर्शनापासून
कार्यक्रमाला सुरुवात झाली. विवाह पुर्व आणि पश्चात समुपदेशन आणि संसारात महिलेची
भुमिका एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापकापेक्षा कमी नाही असे सांगितले. ग्रामीण
भागातील शेतकरी महिलांनी सक्षम होण्याकरिता घरापासून सुरुवात करणे आवश्यक असलेचे
सांगितले.
शेतीमध्ये निरीक्षकाची भुमिका अतिशय महत्वाची आहे आणि ते
फक्त महिलाच उत्तमरीत्या सांभाळू शकतात असे मंडले सरांनी सांगितले. लग्नाबाबत
निर्णय घेताना मुलींनी आपले आई-बाबा शेतकरी आहेत आणि पुढे जाऊन नोकरीच्या मागे न
लागता व्यावसायिक शेती करा आणि होणाऱ्या नवऱ्याला सोबत घ्या. अपवाद वगळता लाखो
रुपये कमावून देणारी शेती कधीच धोका देत नाही असे सांगितले.
कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना मा. डी. डी. मंडले सर... |
माझीशेती शेतकरी
प्रतिष्ठाणकडून राबवल्या जाणाऱ्या “विद्यार्थी विकास योजनेचे” आणि अध्यक्ष महेश
बोरगे यांचे सरांनी खास शैलीत कौतुक केले. मुख्याध्यापक म्हणुन काम करताना
असणाऱ्या जबाबदारीचे विश्लेषण करून मुलींना उत्तम गृहिणी, कुशल व्यवस्थापक, योग्य
चिकित्सक बनवून गुरूची भुमिका पार पाडायला कधीही मागे हटणार नाही असे सांगितले.
माझीशेती शेतकरी
प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश बोरगे, यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य
महोत्सवी वर्षानिमित्त माहिती दिली तसेच १९९३ ते २०१८ मधील महिला आयोगाच्या खंबीर
वाटचालीची मुद्देसूद माहिती सांगितली.
लग्नापुर्वी आणि लग्नानंतर
मुलींच्या स्वभाव आणि वागणुक याविषयावर बोलताना श्री. महेश बोरगे |
समाजसंस्था टिकवणे आणि
वृद्धिंगत करणे आजच्या घडीला महत्वाचे आहे. लग्नापुर्वी आणि लग्नानंतर मुलींच्या स्वभाव
आणि वागणुकीमुळे वातावरण बिघडते असा काहीसा समज आणि काहीसा गैरसमज समाजात पसरलेला
आहे. वास्तविक कोणतीही मुलगी माहेर आणि सासरचे वाईट व्हावे असे वाटत नाही.
स्वतःच्या स्वभावामध्ये दुसऱ्यासाठी बदल घडविणे किती अवघड असते हे असते हे एका
संसारिक मुलीलाच माहिती असते, हे सांगताना प्रेरणा समुपदेशन व सहाय्य केंद्रातील
गंभीर आणि हास्यास्पद घटनांची उजळणी केली.
कार्यशाळेमध्ये महिलांसाठीचे
कायदे विषयी मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. विश्वासराव शिंदे |
मा. वकील श्री. विश्वासराव शिंदे यांनी अनैतिक व्यापार
प्रतिबंध कायदा - १९५६,
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक
हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु
वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४,
बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी दत्तात्रय पाटील
यांना जनसेवेच्या प्रीत्यर्थ सन्मानित केले
|
शहीद कै. शंकरराव मोहिते चरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.
दत्तात्रय पाटील यांनी संस्थेच्या इच्छापुर्ती वधु-वर सूचक केंद्रामार्फत ४०
जणांसाठी रोजगार निर्मिती केली व त्यामाध्यमातून शेकडो विवाह जुळविले आहेत. ऑनलाईन
आणि ऑफलाईन असे असणारे एकमेव विवाह सूचक शृंखलेमुळे समाजातील फसवणुकीचे प्रमाण
घटणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचा विश्वास आहे कि आजपर्यंत लावलेल्या
विवाहापैकी एकही विवाह कलंकित झालेला नाही. सर्व जोड्या व्यवस्थितपणे संसारात मग्न
आहेत.
कार्यकमाची सांगता करताना उपस्थित महिलांनी दत्तात्रय पाटील यांच्या जनसेवेच्या प्रीत्यर्थ श्री. दत्तात्रय पाटील यांना सन्मानित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पार पडला.
No comments:
Post a Comment