बांबूची शेती
शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड थांबते, पर्यायाने जमिनीचा पोत सुधारतो.
फायदे
- बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.
- मानवेल ही बांबूची जात लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून साधारणपणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेच्याजवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जातीविषयी देण्यात येत आहे.
- बाबूपासून कागद, चटया, दांडया, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचरआदि उत्पादने तयार होतात . यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते .
जमीन व हवामान
बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तरीही, पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ९ ते ३६ अंश से. तापमान, सरासरी प्रतिवर्षी ७५0 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. बांबूची मुळे ही तंतुमय असल्याने ती जमिनीच्या वरच्या भरात वाढतात. त्यामुळे जमीन उथळ असली तरी चांगली निचरा होणारी भुसभुशीत असावी लागते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, चिबड अथवा पाणथळ जमिनीत बांबूची लागवड करू नये. अशा जमिनीत बांबू जरी होत नाही.
अभिवृद्धी
बांबूची अभिवृद्धी जरी वेगवेगळ्या बियांपासून व कंदापासून करण्यात येते. (Y अ) बियांपासून अभिवृद्धी बियांपासून अभिवृद्धी करताना बांबूची रोपे ही पुढील दोन प्रकारांनी तयार करतात.
- गादी वाफ्यात बी पेरूनबांबूची रोपे बियाणे पेरून करताना ती गादी वाफ्यावर दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी साधारणपणे १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये बियाणे पेरावे. बियाण्याची पेरणी साधारणपणे सप्टेंबरऑक्टोबर महिन्यांत करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. या त-हेने तयार केलेली रोपे जून-जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात.
- पॉलिथिन पिशवीत लावून बांबूच्या रोपांची निर्मिती बियाणे पॉलिथिन पिशवितसुद्धा लावून करता येते. यासाठी २५ सें.मी. × १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून पॉलिथिन पिशवित भरून प्रत्येक पिशवित ३ ते ४ बिया टोकून त्यात पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची चांगली वाढ होते व कमी बियाणे लागते. यामध्ये बियाणे लावलेल्या वाफ्यामध्ये चाळणी एका महिन्याच्या कालावधीने करणे आवश्यक असते.
ब) कंदाद्वारे अभिवृद्धीयासाठी जुन्या बांबूच्या बेटातील कंदमुळयासह पावसाळ्याच्या सुरुवातीस काढून त्याची लागवड करतात . कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते व वाहतुकीचा खर्च कमी येतो. लागवडीसाठी कंदाची निवड करताना कंदावर २ ते ३ डोळे असणे आवश्यक असते.
लागवड
बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबूतोडणीस अडचण होत नाही. सर्वसाधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते. याप्रमाणे लागवड केल्यास एक हेक्टर अंतरावर ४00 बांबूची रोपे बसतात. बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत '५ मीटर अंतरावर ६ox६ox६० सें.मी. आकाराचे खडे खोदावेत. यामुळे उन्हाळ्यात माती तापून त्यामधील किडी , कृमी मरण्यास मदत होते. अशा या खोदलेल्या खडुयात पावसाळ्यापूर्वी माती भरावी. माती भरताना त्यामध्ये एक | घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम | अमोनियम सल्फेट आणि २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी. पेिशव्यांमधील रोपांची लागवड करताना पिशवी फाडून, अलगद मातीच्या गोळ्यासह रोप खडुयात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून द्यावी.घ्यावयाची काळजी
नांगी भरणे
बांबू लावल्यानंतर पुढील कारणांमुळे त्याची मर होऊ शकते.
- लागवड करताना रोपाच्या भोवताली माती व्यवस्थित न दाबल्यामुळे
- कंद काढताना त्यास झालेली इजा
- वाहतूक करताना रोपांना होणारी इजा
- रोपाच्या भोवतालची माती निघाल्यामुळे किंवा रोपे उघडी पडल्यामुळे
- जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास.
बांबू लावताना व वाहतुकीमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास रोपे मरण्याचे प्रमाण फारच अल्प असते. रोपे मेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन रोपे लावावीत.
खुरपणी
बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असल्याने त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरच्या थरातच असतात. तसेच इतर गवतझुडपे यांची मुळे वरच्या थरात असल्यामुळे पाणी व अन्न मिळविण्यासाठी दोन्हींची स्पर्धा होते. यासाठी वेळोवेळी रोपाभोवतालचे तण काढणे आवश्यक असते. तसेच रोपाच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होत असल्याने जमिनीत योग्य ओलावा राहील, यासाठी काळजी घ्यावी. त्यासाठी रोपांच्या जवळ असलेल्या गवताच्या धसकटांचा आच्चादन म्हणून सुद्धा उपयोग होतो.
पाणी
साधारणपणे ७५० ते ८00 मि.मी. पाऊस पडत असलेल्या १ ते २ वर्षे विशेषत: उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्यकता पडते. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. १ ते २ वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही. तरीही पाणी देण्याची सोय असल्यास पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
आंतरपीक
बांबू लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांनी पक्र होण्यास सुरवात होते. तेव्हा सुरवातीच्या २ ते ३ वर्षांच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्या पड्यात आंतरपिके घेण्यास हरकत नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच; शिवाय जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.
शाखा छाटणी
प्रत्येक कळकाच्या पेन्यातून फांद्या फुटत असतात व कधीकधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. नवीन येणा-या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढू नये, म्हणून या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक ठरते. त्यासाठी फांद्यांची छाटणी कळकाच्या अंगालगत धारदार कात्रीने खालपासून जिथपर्यंत करता येईल तिथपर्यत करावी.
काढणी
लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी बांबू काढण्यास सुरवात होते. रोगराईपासून संरक्षण व नवीन फुटीला प्राधान्य यासाठी बांबू दरवर्षी काढणे फायदेशीर ठरते. बांबू तोडताना तो जमिनीलगत न तोडता, दुस-या व तिस-या पेन्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कु-हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळांच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूची खोडमुळेच मरतात. बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत करावी. एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबूची काढणी करू नये, कारण त्या काळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.
रोग व व्यवस्थापन
बांबूच्या रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीपासून निरनिराळे रोग पडतात. उदा. मुळे सडणे, पानावरील ठिपके, खोड सडणे, विचेस बूम या रोगात रोपांची वेडीवाकडी वाढ होते. यामुळे फुले व कोंबावर त्याचा परिणाम होतो. बुरशीमुळे होणा-या ब्लाईट या रोगामुळे फार नुकसान होते. यासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत व त्यानंतर बाविस्टिन (०.१५ टक्के), फ्युरॉडॉन (२५ ग्रॅम) ही बुरशीनाशके फवारावीत. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर ही द्रावणे फवारल्यास रोग आटोक्यात येतो. बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी सेरेशन या बुरशीनाशकाची (५ ग्रॅम/कि.ग्रॅ.) प्रक्रिया केल्यास बुरशीचा नायनाट करता येतो. तसेच या बियांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी प्रतिजैविकांचाही आजकाल उपयोग केला जातो.
किटकांचा प्रादुर्भाव
पाने खाणा-या किटकांमुळे पानावर छिद्रे पडतात. तसेच पाने गळतात. यांच्या बंदोबस्तासाठी पानांवर सायपरमेष्धिन (o.o२ टक्के) किंवा मॅलिथिऑन ५o ई.सी. (o.o२ टक्के) पाण्यामध्ये मिसळून फवारावे. बीजकृमीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३o ई.सी. या औषधाचा पाण्यात मिसळून फवारा गरजेप्रमाणे मारावा.ज्या वेळेस साठविलेल्या बांबूवर बारीक छिद्रे व पिवळी भुकटी आढळून येते, अशावेळी या मुंग्याच्या बंदोबस्तासाठी सायपरमेश्रीन (०.४ टके) डिझेल/ऑईलमध्ये मिसळून फवारावे.वाळवी/उधईच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या ठिकाणी थायमेट आणि तोडलेल्या बांबूवर सी.सी.ए. (कॉपर क्रोमियम अरसेनिक) फवारावे. नवीन कोवळे बांबू,पोखरणा-या कीटकांसाठी डायमेथोएट (०.०१ टक्के) किंवा मोनोक्रोटोफॉस (०.२ टक्के) पाण्यात मिसळून फवारावे. बांबू हा पानझडी वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे आगीपासून संरक्षण करावे.
उत्पादन
लागवड पद्धती व रोपांची देखभाल यांवर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी २,००० रुपये मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिनग १५ रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये उत्पन्न हेक्टरी मिळण्यास सुरवात होते.बांबूची लागवड केल्यानंतर सलग ४o वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलीही मशागत करावी लागत नाही. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.बांबू प्रक्रिया
बांबूवर रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचे आयुष्य अर्धे चिरलेले बांबू६ ते ८ टक्के सी.सी.ए. किंवा सी.सी.बी.चे द्रावण असलेल्या हौदात बांबूचा ३० ते ४० सें.मी. भाग बुडेल अशा त-हेने २४ तास ठेवावेत. नंतर पुन्हा उलट्या बाजूने त्याच द्रावणात २४ तास बुडवून ठेवावते. त्यानंतर असे प्रक्रिया केलेले बांबू वापरण्यापूर्वी २ ते ३ आठवडे एकत्र साठवून ठेवावेत. अशा त-हेने प्रक्रिया केलेल्या बांबूचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढल्याचे आढळून आले आहे व त्यासाठी खर्चसुद्धा फारसा येत नाही.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
No comments:
Post a Comment