बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना मिळणार उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव :
माझीशेतीच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या सहाय्याने प्रतिवर्षी किमान ५०० व कमाल १००० शेतकरी बांधवांना व्यावसायिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते. एकुण २ (अभ्यासक्रम) + १ (प्रात्यक्षिक) असे ०३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे अतिशय मुलभुत शेती व्यवसायकरिता आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय उत्पादन होण्यापुर्वीच शेतकऱ्यांच्या मालाचा दर ठरत असल्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. एकंदरीत प्रती शेतकरी एक एकर द्राक्षबाग गृहीत धरल्यास १००० एकर द्राक्षबाग आणि त्यापासुन सरासरी ०५ ते ०६ टन प्रती एकर बेदाणा उत्पादन गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट उत्पादन खर्चावर आधारित हंगामी हमीभाव रु. १२० प्रति किलो दिला जातोय.
बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये माझीशेतीची भुमिका :
संस्थेचे वेगवेगळ्या भागातील तज्ञ कार्यरत मनुष्यबळ साधन सुविधा पुरवण्याचे काम करते. प्रशिक्षण देऊन लाभार्थी घटकांना सक्षम करणे हे माझीशेतीचे प्रथम प्राधान्याचे काम आहे. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या 'ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प निधीतून प्रति लाभार्थी अंदाजित रु. ३६५ खर्च करून १००० शेतकरी, २५०० बचत गटाचे सदस्य असे एकूण ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रति वर्ष रुपये १२,७७,५००/- लाख प्रमाणे निधी तरतुद केलेली आहे.