ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प मार्गदर्शक सूचना आणि खरीप हंगाम २०१८ च्या नियोजनामध्ये सोमवार दि. २५/०६/२०१८ ते शनिवार दि.१४/०७/२०१८ या कालावधीमध्ये माझीशेती कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रावर खरीप पिक व्यवस्थापन कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळा शेतकऱ्यांना मोफत आहेत. कार्यशाळा अंमलबजावणी करिता शेतकरी सुविधा केंद्र, स्वयंसेवक यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
- मातीचे प्रकार आणि घ्यावयाची पिके
- बियाणे निवड आणि प्रक्रिया, फायदे
- सापळा पिके निवड आणि रचना
- खत व्यवस्थापन (जैविक, सेंद्रिय व रासायनिक)
- आंतरमशागत (विरळणी, निंदणी, कोळपणी, खुरपणी)
- काढणीपश्चात व्यवस्थापन (शासकीय सहकार्य, माझीशेती नियोजन)
आला पावसाळा, आरोग्य सांभाळा
जसे कि आपण जाणता, मानवाचे ६५% आजार दुषित पाण्यामुळे होतात. पावसाळा सुरु झाला कि पिण्याच्या पाण्याचे साठे एनकेनप्रकारे दुषित होतात व परिणामी मानवाला आजारास सामोरे जावे लागते. पावसाळी हंगाम २०१८ च्या आरोग्य, आहार आणि पाणी नियोजनाद्वारे आपण आजारांना दूर ठेवु शकतो. या विषयावर सोमवार दि.२५/०६/२०१८ ते शनिवार दि.१४/०७/२०१८ या कालावधीमध्ये वार्डनिहाय, सोसायटीनिहाय (मागणी असेल तर) “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा” कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळा नागरिकांना मोफत आहेत. कार्यशाळा अंमलबजावणी करिता माझीशेती सहयोगी संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
- पर्जन्यामानाची माहिती (पडणारा पाऊस, पाण्याची दिशा, साठे)
- पाणीपुरवठा यंत्रणा माहिती (साठा, सध्याची घेतली जाणारी काळजी)
- पाण्यापासुन पसरणारे रोग माहिती (लक्षणे, प्रतिबंध, प्राथमिक उपचार)