Search here..

Sunday, October 6, 2019

येत्या काळात द्राक्ष बागेतील डाऊणी व्यवस्थापण

*शेतकरी  माझा :  द्राक्ष   बंधूनो  आजून मोडला  नाही कणा ......*

*प्रिय सन्मानीय सदगृहस्थ,.... सदबंधू* 
नमस्कार  द्राक्ष बागाईतदार बंधुनो सध्या होत असलेला पाऊस फारच मनोबल खच्ची करणारा आहे.
पण शांत पणे आपण सर्व निर्णय घेऊन यातून धीराने मार्ग काढू शकतो.

---------------- -------------श्रीहरी घुमरे  9921314560 ( शेतकरी माझा )

*येत्या  काळात डाऊणी व्यवस्थापण*
 द्राक्ष बागाईत दार बंधुनो  चार, पाच तास सलग पाऊस पडतो आहे. किवा रात्र भर पाऊस पडतो  आहे. फार मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही ह्या उलट निवांत शांत झोप घेऊन सकाळी ऊन पडण्याच्या आत फावरणी म्ह्तवाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत सकाळी आपल्या बागेत किवा झाडावर  भरपूर पाणी साचले असेल तर ते पहिले झटकून त्यावरती स्पर्शजन्य बुरशी नाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे. ह्यामध्ये तुम्ही वापरत असलेले  सर्वच स्पर्शजन्य बुरशीनाशक चांगले आहे. पण एम ४५, झेड ७८ किवा अन्टराकॉल ह्या बुरशीनाशकाची  सतत पावसाळी वातावरणात काम करण्याची क्षमता कमी आहे आपण ह्या परीस्थितीत रिवस किवा रॅनमन ह्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार करावा.

*खालील परिस्थिती आपण काय कराल  सतत पाऊस  चालू आहे*

*बाग जिरू नये म्हणून काही हमखास फायदेशीर ठरतील अशा काही फवारण्या*
  1. एकरी इसाबियन ( ६०० एम.एल ) + मग्नेशियम सल्फेट १ किलो (घड सशक्त करण्यासाठी
  2. पॉटाशियम शोनाईट १ किलो +  पोटॅशियम मॉलिब्डेनम एकरी २० ग्रॅम + चि. झिंक १०० ग्रॅम (घड बाळी वरती जात असल्यास)


*पाऊस पडल्या नंतर  बाग ओली असताना  स्पर्शजन्य फवारण्या*

*पोगां अवस्था* 
*हिरवा कापसलेला डोळा*
  1. एम ४५ एकरी ९०० ग्रॅम
  2. कॉपर ( ५०० ) + एम ४५ ( ५०० )

*१०% ते ९०% पर्यंत पोगां अवस्था*

*1.* झेड ७८ ( ५०० ) + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)
*2.* अन्टराकॉल (५०० ) + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)

*तीन पानी ते फेल पर्यंत अवस्था*

*१.* अॅक्रोबॅट ( २०० ) ग्रॅम + एम ४५ ५०० ग्रॅम
 *२.* कर्झेट ६०० ग्रॅम + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)

   *३* .*मेलीडयो (५०० ग्रॅम )+ साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)

 *_आपल्या बागेत  ट्रॅक्टर चालतो आहे असे समजून :-._*

 आपण पाऊस उघडल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी. जर आपण एम ४५, झेड ७८ किवा अन्टराकॉल ह्या बुरशीनाशकाची फवारणी करत असाल आणि पुन्हा पाऊस  येत असेल तर परत फवारणी घेणे  गरजेचे आहे.  पण आपण थोडा अवधी मिळत असेल आणि रिवस किवा रॅनमन ह्या बुरशीनाशकची फवारणी करून ५/६ तास पाऊस आला तरी लगेच भीती मुळे फवारणी करणे गरजचे नाही.

आपल्या बागेत  ट्रॅक्टर चालत नाही असे समजून :- 

आपल्या बागेत पाणी तुंबले आहे किवा ट्रॅक्टर चालत नाही अशा प्रसंगी आपण बुरशी नाशकच्या डस्टिंगचा विचार  करावा पण  भरपूर डस्टिंग होत असेल तर कॉपर आणि एम ४५ सारख्या बुरशी नाशकाचा वापर टाळवा. पण ह्या बागेत फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्याचा वापर राहू द्यावा. ह्या बागेत पाऊस उघडून गेल्यानंतर वाफसा येई पर्यंत डाऊणी व्यवस्थापण ही एक महत्त्वपूर्ण  गोष्ट असेल.

 _*फेल ला प्लॉट आहे किवा फेल होऊन पाऊस चालू झाला*_ 

फेल ला प्लॉट आहे : बऱ्याच शेतकऱ्याचा प्लॉट फेल काढणी साठी आले असतील अशा शेतकऱ्यांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच बागात काही जुनपाट फुटी कुठे तरी असतात. ह्या  प्लॉटमध्ये कुठे तरी डाउनी दिसू शकतो. त्यामुळे आपण डस्टिंग असेल किवा फवारणी असेल कोणत्याही परीस्थितीत टाळू नये. फेल नतर अचानक प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात डाऊणी दिसू शकतो फेल काढल्या नतर आपण अशा प्लॉट मध्ये चांगले वातावरण असताना झाप्रो किवा प्रोफाइलर ह्या बुरशी नाशकची फवारणी करावी.जमिनीत जो पर्यंत वापसा येत नाही आणि कोणतेही फॉस्फेट युक्त खताचा वापर झाल्याशिवाय  खराब वातावरणात जिए देऊ नये.

*_फेल काढून पाऊस झाला फवारणी घेता आली नाही_ :*

 जर आपल्या बागेत अशी परीस्थिती असेल. तर आपण पावसाळी वातावरणात रिवस किवा रॅनमन ह्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार करावा. आणि पाऊस उघडल्या नंतर झाप्रो किवा प्रोफाइलर ह्या बुरशी नाशकची फवारणी करावी. जमिन लवकर वापसा येण्यासाठी प्रयत्न करावे. फवारणी मध्ये फॉस्फेट किवा मॅग्नेशियम अन्नद्रव्यचा वापर करावा.

*१६/१७ ते ३०  दिवसाच्या बागा :*  

ह्या बागांना  विशेष असे पाउस असे पर्यंत डाऊणीची भीती नाही. पण पाऊस त्यामुळे जसे उघडीप मिळेल तसे पाने ओली असताना किवा बागेवर पाणी असताना स्पर्शजन्य बुरशी नाशकाची फवारणी व बाग कोरडी असतना अंतरप्रवाहि बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. बागेत  फेल काढल्यानतर फुटलेल्या फुटी काढून घ्याव्या. त्यांना चांगले अंतर प्रवाही गेलेले नसतात  त्यामुळे त्यावर पटकन डाउणी जाणवेल. वेलीवरती साचणारे पाणी मजुराकढून झटकत राहावे.

*सूचना : शक्यतो मेलीडूयो  रिवस आणि अक्रोबॅट ह्या फवारण्या एका मागोमाग घेऊ नये.*


 *_*ज्या बागा फुलोरा अवस्थेत असतील त्या वाचवण्यासाठी_**

शेतकरी बाधावानो फुलोरा अवस्थेत कमीत कमी नुसकान होण्यासाठी आपल्या बागेत मॅग्नेशियम, फॉसपरस, झिंक, बोरान आणि पालाश ह्यांची लेव्हल चागली आहे.

*ब्रिक्स मीटर वापरून पाऊसात वेलीच न्युट्रीशन चेक करा :*

 द्राक्ष घडा शेजारील पान  चुरघळून त्यातील एक थेब रसाचा ब्रिक्स हा १२/ १३ च्या पुढे असेल तर आपली बाग चागली हेल्थ घेऊन आहे असे जमजावे पण हा ब्रीक्स ७/८ पर्यंत आहे असे असल्यास आपल्या बागेत नत्र लेव्हल जास्त आहे. आणि ही बाग नुसकान ग्रस्त होऊ शकते त्यामुळे अशा 

द्राक्ष बागेत खूप गर्दी होत असले तर जास्तीच्या फुटी काढून घ्या  तिसरा घड ठेवला असेल तर परीस्थिती अवघड  होऊन बसते अशा घडाचा शेंडा ५/६  पानाचा असेल तर तो लगेच काढून टाकावा. शेंडा   घडात किवा वेलीवर पाणी साचत असेल तर बाग झटकुन घ्यावी.

*गरज पडल्यास ह्या  गोष्टी फायदा देऊन जातील*

  1. वेलीला विळा किवा खुरपे ने दोन ओलांडे शेजारी जखमा कराव्या
  2. फुलोरा अवस्थेत वातावरण बघून अमिस्टार + स्कोर ची फवारणी जरूर टाकावी
  3. गळ होऊ नये म्हणून पोटॅशियम शोनाईट १ किलो + पोटॅशियम मॉलिब्डेनम २५ ग्राम अशी फवारणी घ्यावी

Sunday, September 22, 2019

महाराष्ट्र शासन - उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

महाराष्ट्र शासनाच्या विविधांगी योजनांमध्ये छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रसिद्ध माथाडी कामगार नेते मा. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ दिनांक २७/११/१९९८ पासुन कार्यान्वित आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणुन जिल्हास्तरावर कर्मचारी 'जिल्हा समन्वयक' नेमलेले आहेत. तसेच टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० उपलब्ध करून देणेत आला आहे. 

उद्देश : 
  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे.
  • बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
  • स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य देणे. 

महामंडळाच्या पोर्टल वर दिनांक २२ सप्टें २०१९ अखेरच्या महत्वाच्या सूचनांची लिंक 
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (IR-I), गट कर्ज व्याज परतावा (IR-II) या योजनेतून व्याजपरतावा देण्यात येते व गट कर्ज योजना (GL-I) या योजनेअंतर्गत बीन व्याजी कर्ज देण्यात येते.



 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना


लाभार्थी
पात्रता
 कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
 लघु व मध्यम उद्योगांसाठी 
 उत्पादनसेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  वय - १८ ते ४५ वर्षे 
  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  2. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  3. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
लाभार्थी
पात्रता
 कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
 लघु व मध्यम उद्योगांसाठी 
 उत्पादनसेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  वय - १८ ते ४५ वर्षे 
  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
वैयक्तिक योजनेच्या उमेदवारांनी व गट योजनेच्या सदस्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावे. प्रस्ताव सादर केल्यावर उमेदवारास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे LOI बँकेकडे देऊन कर्ज मंजुर करून घ्यावे. बँकेच्या परतावा नियमानुसार वेळेत हप्ते भरल्यास व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यास जमा होईल. 

गट प्रकल्प कर्ज योजना 
महामंडळातर्फे सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक गटांना १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेती उद्योगाकरिता देण्यात येईल.



लाभार्थी
पात्रता
१. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
२. लघु व मध्यम उद्योगांसाठी 
३. उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
४. गटातील किमान एक सदस्य शैक्षणिक अर्हता १० वी पास असावी.

१. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
२. आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
३. वय - १८ ते ४५ वर्षे 
४. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
५. दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा 

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
  1. सदरचे कर्ज मुदत कर्ज असते.
  2. गट पात्र ठरलेनंतर ऑनलाईन मंजुरी पत्र दिले जाते. 
  3. वैधानिक कागदपत्रे तारण पत्रे पुर्ण केल्यावर कर्ज रक्कम गट कर्ज खात्यावर जमा होते. 
  4. बिनव्याजी कर्ज रक्कम परतावा वितरणाच्या खात्यात ७ व्या महिन्यापासुन ८४ व्या महिन्यापर्यंत (७ वर्षे) समान हप्ता देणे अनिवार्य आहे. 
Our vision is to develop innovative agriculture system by technology transfer to farmers, jobseekers and consultants. every year more than 1000 beneficiaries participate in our rural sustainable development program. 

Our expert team guide students and adults to sustain in agri business development. Students participate from more than 19 educational institutions to transfer technology in rurban area of Maharashtra. 

We want physically and mentally strong society to fulfill dreams of worlds fastest growing economy. Every individual deserves right of employment. Every year we are trying deploy skill students in more than 14 business units.

"Know and tell others" is our backbone of development work. we promote success stories on social media platforms. 


We are working here for the medical help to rescue team. our priority is to control Contagious diseases by awareness and prevention measures application in flood effected area. 

आमचे कार्यकर्ते आणि टीम लेप्टो पायरेसिस या विषाणुजन्य आजाराबद्दल जाणीव जागृती करणे तसेच या पुरात बचाव कार्य केलेल्या पथक सदस्यांवर प्राथमिक उपचार करत आहोत.

Monday, June 10, 2019

Mazisheti Launches Sustainable Development Program in Vafgaon Village, Pune


Pune, Vafgaon: In an effort to boost agricultural growth and enhance students' career opportunities, the rural village of Vafgaon, District Pune, has officially launched the MIDAS Project for sustainable development. The program, inaugurated by the village Sarpanch and Grampanchayat leaders, saw the active participation of Mazisheti Director and his team, alongside engaged citizens.

The agenda focused on knowledge dissemination about sustainable practices aimed at improving farmers' income by at least 30%. The program includes farmer onboarding, where participants receive crop-specific and stage-wise training. This initiative emphasizes value addition to farm produce through techniques such as sorting, grading, and the production of by-products, helping farmers to secure better prices at Agricultural Produce Market Committees (APMC).

Apart from agricultural development, the MIDAS Project extends its support to local students. Students from the project area receive an annual stipend of ₹12,000, alongside hands-on training in various career fields. The program also focuses on preparing students for both physical and mental competitions, such as athletic events, as well as government exams like MPSC and UPSC. The professional mentorship initiative ensures that students gain self-confidence, self-reliance, and business acumen. Those who complete the program are given placement opportunities within Mazisheti or other partnering companies.

Impact of the Initiative:

By integrating agricultural training with student development, Mazisheti aims to achieve a dual impact: boosting farmer incomes and ensuring holistic career development for students. The value addition through farm produce processing is expected to streamline farmers' market access, resulting in a minimum 30% increase in their income. Simultaneously, students receiving hands-on training and career mentorship will be better equipped to succeed in both business and competitive sectors, fostering the next generation of rural entrepreneurs and professionals.

This initiative aligns with Mazisheti's broader goal of promoting rural sustainable development through education, technology integration, and community support.

Friday, February 22, 2019

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे नियोजन करून परिसरातील आठवडे बाजारात थेट विक्री करून नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुष्काळी परिस्थितीतही माळी कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजनातून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करीत आर्थिक स्थैर्य जपले आहे.

लातूर जिल्ह्यातील चापोलीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरगा (यल्लादेवी) येथील गोरख माळी यांची तुकड्यात विभागलेली पाच एकर शेती आहे. माळी कुटुंबातील सर्व सदस्य पीक लागवड व व्यवस्थापन करतात, तर निलावती व त्यांची सून यांनी विक्रीची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. माळी कुटुंबीय परिसरातील आठवडी बाजारातील मागणीचा विचार करून हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकाची लागवड करतात. त्यामुळे वर्षभर भाजीपाल्याला मार्केट उपलब्ध होते.  
  सिंचन व्यवस्था 
गोरख माळी यांच्या शेतात दोन विहिरी आहेत. २०१५ मध्ये घेतलेल्या विहिरीला सुदैवाने पाणीही लागले. एक विंधन विहीर असून, त्याचे पाणी विहिरीत साठवले जाते. त्यामुळे मुबलक पाणीसाठा आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून वर्षभर भाजीपाल्याची लागवड केली जाते. पिकाला पाणी देण्यासाठी तुषार आणि ठिबक सिंचनाची सोय केली आहे.  

  थेट विक्रीवर भर 
निलावती माळी भाजीपाल्याची विक्री स्वतः  विविध आठवडी बाजारात करतात. दर सोमवारी अहमदपूर, बुधवारी चापोली, गुरुवारी शिरूर ताजबंद, शुक्रवारी चाकूर व रविवारी हाळी या आठवडे बाजारात भाजीपाल्याची विक्री केली जाते. भाजीपाला ताजा व  योग्य दारात मिळत असल्याने विविध गावांतील  ग्राहक जोडले गेले आहेत. आठवड्यातून पाच  आठवडी बाजार करीत असल्याने वर्षभर ताजा पैसा मिळतो.

शेतीचे नियोजन 
गोरख माळी व निलावती माळी हे पती-पत्नी, तसेच नवनाथ व यशोदा हे मुलगा व सून सर्व जण एकत्र राहतात. शेतातच घर असल्याने पिकांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. भाजीपाला लागवडीपासून ते  तोडणीपर्यंतची सर्व कामे घरीच केली जातात. शेतात मजूर किंवा सालगडी नाही. त्यामुळे मजुरीवरचा मोठा खर्च वाचतो.

शेळीपालनाची जोड 
माळी कुटुंबीयांनी शेतीला दहा वर्षांपासून शेळी पालनाची जोड दिली आहे. दोन शेळ्यांपासून सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे दहा शेळ्या व एक बोकड आहे. आतापर्यंत त्यांनी १९ बोकडांची विक्री केली, त्यातून अतिरिक्त कमाई झाली.

माळी कुटुंबीयांचा दिनक्रम 
गोरख माळी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य पहाटे चार वाजता उठतात. दूध काढणे व साफसफाई करून जनावरांना चारा-पाणी करतात. नंतर विक्रीसाठी ताज्या भाजीपाल्याची तोडणी केली जाते. भाजीपाल्याची प्रतवारी करून सर्व सदस्य भाजीपाला बाजारात घेऊन जातात. निलावती या विक्रीसाठी बाजारात बसतात, तर उर्वरित सदस्य दिवसभर शेतातील इतर कामकाज करतात.

असे आहे पीक नियोजन 
 एकूण क्षेत्र    पाच एकर
 ऊस    एक एकर
 भाजीपाला     साडेतीन एकर
 गलांडा फुले    अर्धा एकर

भाजीपाला लागवड नियोजन 
 जून – वांगे, कांदा, भेंडी, गवार, भोपळा, मिरची, मेथी, शेपू, कोथिंबीर, चवळी, फ्लॉवर.
 ऑक्टोबर – कांदा, गाजर, भोपळा, कोबी, वरणा, वाटाणा, पालक, चुका, कोथिंबीर, मुळा, बीट.
 फेब्रुवारी – पालक, गवार, दोडका, कारले, पडवळ, कोथिंबीर, कोबी, मुळा, चवळी, काकडी.
 गलांडा फुलाची वर्षभर लागवड.

बांधावर फळझाडांची लागवड  
शेतातील बांधावर विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली आहे. त्यात आंब्याची ५० झाडे, चिंच २५, बोर ५, पेरू १०, नारळ १०, जांभूळ ५, शेवगा १५, चंदन ५०, सागवान २५; तर रामफळाची १० झाडे लावली आहेत. फळांची हंगामानुसार विक्री करून त्यातून अतिरिक्त नफा मिळतो. आठवडी बाजारातच या फळांची ते स्वतः विक्री करतात.

अर्थकारण 
प्रत्येक आठवडी बाजारातून किमान एक हजार रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट असते. काही वेळा किंवा सणासुदीला ते दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत जाते. दरही ग्राहकांना परवडेल असेच असतात. महिन्याला १५ ते २५ हजार रुपये मिळतील, असे नियोजन असते. मागील पाच वर्षांपासून एक एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. पाच वर्षांत सरासरी ६० ते ७० टनांचे उत्पादन झाले. यंदा दोन हजार रुपये टनप्रमाणे कारखान्याला ऊस विक्री केली आहे. उसामध्ये गवार, चवळी, कांदा व हरभरा ही आंतरपिके घेतली जातात.

‘ऍग्रोवन’ खरा मार्गदर्शक 
यापूर्वी  ढोबळमानाने भाजीपाल्याची लागवड व विक्री केली जात असे.  गेल्या वर्षापासून माळी अॅग्रोवन वाचतात.  त्यातील भाजीपाला पिकाची माहिती अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे.

   पशुधनापासून सेंद्रिय खताची उपलब्धता
माळी यांच्याकडे दोन बैल, दोन म्हैस व दहा शेळ्या आहेत. त्यामुळे शेतीला घरच्याघरी शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असून, जमिनीची सुपीकता टिकून राहत आहे.

 शेती व्यवस्थापनातील बाबी 
  •  दर वर्षी उन्हाळ्यात शेणखत मिसळले जाते.  
  •  रासायनिक खतांचा कमीत कमी वापर.
  •  उपलब्धतेनुसार गांडूळ खताचा वापर.
  •  शेतातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष.
  •  ताजा व प्रतवारी केलेला भाजीपाला. त्यामुळे मागणी चांगली.
  •  बीजप्रक्रिया करून भाजीपाला बियाण्यांची लागवड 
  •  आठवडी बाजारातील दरांवर लक्ष ठेवून भाजीपाला लागवडीचे नियोजन 

सणांसाठी विशेष नियोजन 
श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते. याकाळात विशिष्ट भाजीपाल्याला मागणी असते. मुळा, काकडी, गवार, भेंडी आदी भाजीपाल्याला मागणी असते. दर वर्षी बाजारात फारशी आवक न होणाऱ्या, परंतु मागणी असलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत चांगला नफा ते कमावतात. गौरी-गणपती, नवरात्र महोत्सव व त्यानंतर दसरा-दिवाळी आदी सणांच्या काळात भाजीपाल्याबरोबरच फुलांनाही चांगली मागणी असते. गलांडा फुलांना किलोला ५० ते ६० रुपये प्रमाणे भाव मिळतो.