Search here..

Sunday, September 22, 2019

महाराष्ट्र शासन - उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

महाराष्ट्र शासनाच्या विविधांगी योजनांमध्ये छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रसिद्ध माथाडी कामगार नेते मा. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ दिनांक २७/११/१९९८ पासुन कार्यान्वित आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणुन जिल्हास्तरावर कर्मचारी 'जिल्हा समन्वयक' नेमलेले आहेत. तसेच टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० उपलब्ध करून देणेत आला आहे. 

उद्देश : 
  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे.
  • बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
  • स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य देणे. 

महामंडळाच्या पोर्टल वर दिनांक २२ सप्टें २०१९ अखेरच्या महत्वाच्या सूचनांची लिंक 
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (IR-I), गट कर्ज व्याज परतावा (IR-II) या योजनेतून व्याजपरतावा देण्यात येते व गट कर्ज योजना (GL-I) या योजनेअंतर्गत बीन व्याजी कर्ज देण्यात येते.



 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना


लाभार्थी
पात्रता
 कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
 लघु व मध्यम उद्योगांसाठी 
 उत्पादनसेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  वय - १८ ते ४५ वर्षे 
  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  2. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  3. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
लाभार्थी
पात्रता
 कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
 लघु व मध्यम उद्योगांसाठी 
 उत्पादनसेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  वय - १८ ते ४५ वर्षे 
  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
वैयक्तिक योजनेच्या उमेदवारांनी व गट योजनेच्या सदस्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावे. प्रस्ताव सादर केल्यावर उमेदवारास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे LOI बँकेकडे देऊन कर्ज मंजुर करून घ्यावे. बँकेच्या परतावा नियमानुसार वेळेत हप्ते भरल्यास व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यास जमा होईल. 

गट प्रकल्प कर्ज योजना 
महामंडळातर्फे सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक गटांना १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेती उद्योगाकरिता देण्यात येईल.



लाभार्थी
पात्रता
१. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
२. लघु व मध्यम उद्योगांसाठी 
३. उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
४. गटातील किमान एक सदस्य शैक्षणिक अर्हता १० वी पास असावी.

१. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
२. आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
३. वय - १८ ते ४५ वर्षे 
४. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
५. दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा 

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
  1. सदरचे कर्ज मुदत कर्ज असते.
  2. गट पात्र ठरलेनंतर ऑनलाईन मंजुरी पत्र दिले जाते. 
  3. वैधानिक कागदपत्रे तारण पत्रे पुर्ण केल्यावर कर्ज रक्कम गट कर्ज खात्यावर जमा होते. 
  4. बिनव्याजी कर्ज रक्कम परतावा वितरणाच्या खात्यात ७ व्या महिन्यापासुन ८४ व्या महिन्यापर्यंत (७ वर्षे) समान हप्ता देणे अनिवार्य आहे. 
Our vision is to develop innovative agriculture system by technology transfer to farmers, jobseekers and consultants. every year more than 1000 beneficiaries participate in our rural sustainable development program. 

Our expert team guide students and adults to sustain in agri business development. Students participate from more than 19 educational institutions to transfer technology in rurban area of Maharashtra. 

We want physically and mentally strong society to fulfill dreams of worlds fastest growing economy. Every individual deserves right of employment. Every year we are trying deploy skill students in more than 14 business units.

"Know and tell others" is our backbone of development work. we promote success stories on social media platforms. 


We are working here for the medical help to rescue team. our priority is to control Contagious diseases by awareness and prevention measures application in flood effected area. 

आमचे कार्यकर्ते आणि टीम लेप्टो पायरेसिस या विषाणुजन्य आजाराबद्दल जाणीव जागृती करणे तसेच या पुरात बचाव कार्य केलेल्या पथक सदस्यांवर प्राथमिक उपचार करत आहोत.

No comments:

Post a Comment