*शेतकरी माझा : द्राक्ष बंधूनो आजून मोडला नाही कणा ......*
*प्रिय सन्मानीय सदगृहस्थ,.... सदबंधू*
नमस्कार द्राक्ष बागाईतदार बंधुनो सध्या होत असलेला पाऊस फारच मनोबल खच्ची करणारा आहे.
पण शांत पणे आपण सर्व निर्णय घेऊन यातून धीराने मार्ग काढू शकतो.
---------------- -------------श्रीहरी घुमरे 9921314560 ( शेतकरी माझा )
*येत्या काळात डाऊणी व्यवस्थापण*
द्राक्ष बागाईत दार बंधुनो चार, पाच तास सलग पाऊस पडतो आहे. किवा रात्र भर पाऊस पडतो आहे. फार मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही ह्या उलट निवांत शांत झोप घेऊन सकाळी ऊन पडण्याच्या आत फावरणी म्ह्तवाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत सकाळी आपल्या बागेत किवा झाडावर भरपूर पाणी साचले असेल तर ते पहिले झटकून त्यावरती स्पर्शजन्य बुरशी नाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे. ह्यामध्ये तुम्ही वापरत असलेले सर्वच स्पर्शजन्य बुरशीनाशक चांगले आहे. पण एम ४५, झेड ७८ किवा अन्टराकॉल ह्या बुरशीनाशकाची सतत पावसाळी वातावरणात काम करण्याची क्षमता कमी आहे आपण ह्या परीस्थितीत रिवस किवा रॅनमन ह्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार करावा.
*खालील परिस्थिती आपण काय कराल सतत पाऊस चालू आहे*
*बाग जिरू नये म्हणून काही हमखास फायदेशीर ठरतील अशा काही फवारण्या*
- एकरी इसाबियन ( ६०० एम.एल ) + मग्नेशियम सल्फेट १ किलो (घड सशक्त करण्यासाठी
- पॉटाशियम शोनाईट १ किलो + पोटॅशियम मॉलिब्डेनम एकरी २० ग्रॅम + चि. झिंक १०० ग्रॅम (घड बाळी वरती जात असल्यास)
*पाऊस पडल्या नंतर बाग ओली असताना स्पर्शजन्य फवारण्या*
*पोगां अवस्था*
*हिरवा कापसलेला डोळा*
- एम ४५ एकरी ९०० ग्रॅम
- कॉपर ( ५०० ) + एम ४५ ( ५०० )
*१०% ते ९०% पर्यंत पोगां अवस्था*
*1.* झेड ७८ ( ५०० ) + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)
*2.* अन्टराकॉल (५०० ) + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)
*तीन पानी ते फेल पर्यंत अवस्था*
*१.* अॅक्रोबॅट ( २०० ) ग्रॅम + एम ४५ ५०० ग्रॅम
*२.* कर्झेट ६०० ग्रॅम + साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)
*३* .*मेलीडयो (५०० ग्रॅम )+ साल्ट ऑफ फॉसपनिक असिड (५००)
*_आपल्या बागेत ट्रॅक्टर चालतो आहे असे समजून :-._*
आपण पाऊस उघडल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी. जर आपण एम ४५, झेड ७८ किवा अन्टराकॉल ह्या बुरशीनाशकाची फवारणी करत असाल आणि पुन्हा पाऊस येत असेल तर परत फवारणी घेणे गरजेचे आहे. पण आपण थोडा अवधी मिळत असेल आणि रिवस किवा रॅनमन ह्या बुरशीनाशकची फवारणी करून ५/६ तास पाऊस आला तरी लगेच भीती मुळे फवारणी करणे गरजचे नाही.
आपल्या बागेत ट्रॅक्टर चालत नाही असे समजून :-
आपल्या बागेत पाणी तुंबले आहे किवा ट्रॅक्टर चालत नाही अशा प्रसंगी आपण बुरशी नाशकच्या डस्टिंगचा विचार करावा पण भरपूर डस्टिंग होत असेल तर कॉपर आणि एम ४५ सारख्या बुरशी नाशकाचा वापर टाळवा. पण ह्या बागेत फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्याचा वापर राहू द्यावा. ह्या बागेत पाऊस उघडून गेल्यानंतर वाफसा येई पर्यंत डाऊणी व्यवस्थापण ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट असेल.
_*फेल ला प्लॉट आहे किवा फेल होऊन पाऊस चालू झाला*_
फेल ला प्लॉट आहे : बऱ्याच शेतकऱ्याचा प्लॉट फेल काढणी साठी आले असतील अशा शेतकऱ्यांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच बागात काही जुनपाट फुटी कुठे तरी असतात. ह्या प्लॉटमध्ये कुठे तरी डाउनी दिसू शकतो. त्यामुळे आपण डस्टिंग असेल किवा फवारणी असेल कोणत्याही परीस्थितीत टाळू नये. फेल नतर अचानक प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात डाऊणी दिसू शकतो फेल काढल्या नतर आपण अशा प्लॉट मध्ये चांगले वातावरण असताना झाप्रो किवा प्रोफाइलर ह्या बुरशी नाशकची फवारणी करावी.जमिनीत जो पर्यंत वापसा येत नाही आणि कोणतेही फॉस्फेट युक्त खताचा वापर झाल्याशिवाय खराब वातावरणात जिए देऊ नये.
*_फेल काढून पाऊस झाला फवारणी घेता आली नाही_ :*
जर आपल्या बागेत अशी परीस्थिती असेल. तर आपण पावसाळी वातावरणात रिवस किवा रॅनमन ह्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार करावा. आणि पाऊस उघडल्या नंतर झाप्रो किवा प्रोफाइलर ह्या बुरशी नाशकची फवारणी करावी. जमिन लवकर वापसा येण्यासाठी प्रयत्न करावे. फवारणी मध्ये फॉस्फेट किवा मॅग्नेशियम अन्नद्रव्यचा वापर करावा.
*१६/१७ ते ३० दिवसाच्या बागा :*
ह्या बागांना विशेष असे पाउस असे पर्यंत डाऊणीची भीती नाही. पण पाऊस त्यामुळे जसे उघडीप मिळेल तसे पाने ओली असताना किवा बागेवर पाणी असताना स्पर्शजन्य बुरशी नाशकाची फवारणी व बाग कोरडी असतना अंतरप्रवाहि बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. बागेत फेल काढल्यानतर फुटलेल्या फुटी काढून घ्याव्या. त्यांना चांगले अंतर प्रवाही गेलेले नसतात त्यामुळे त्यावर पटकन डाउणी जाणवेल. वेलीवरती साचणारे पाणी मजुराकढून झटकत राहावे.
*सूचना : शक्यतो मेलीडूयो रिवस आणि अक्रोबॅट ह्या फवारण्या एका मागोमाग घेऊ नये.*
*_*ज्या बागा फुलोरा अवस्थेत असतील त्या वाचवण्यासाठी_**
शेतकरी बाधावानो फुलोरा अवस्थेत कमीत कमी नुसकान होण्यासाठी आपल्या बागेत मॅग्नेशियम, फॉसपरस, झिंक, बोरान आणि पालाश ह्यांची लेव्हल चागली आहे.
*ब्रिक्स मीटर वापरून पाऊसात वेलीच न्युट्रीशन चेक करा :*
द्राक्ष घडा शेजारील पान चुरघळून त्यातील एक थेब रसाचा ब्रिक्स हा १२/ १३ च्या पुढे असेल तर आपली बाग चागली हेल्थ घेऊन आहे असे जमजावे पण हा ब्रीक्स ७/८ पर्यंत आहे असे असल्यास आपल्या बागेत नत्र लेव्हल जास्त आहे. आणि ही बाग नुसकान ग्रस्त होऊ शकते त्यामुळे अशा
द्राक्ष बागेत खूप गर्दी होत असले तर जास्तीच्या फुटी काढून घ्या तिसरा घड ठेवला असेल तर परीस्थिती अवघड होऊन बसते अशा घडाचा शेंडा ५/६ पानाचा असेल तर तो लगेच काढून टाकावा. शेंडा घडात किवा वेलीवर पाणी साचत असेल तर बाग झटकुन घ्यावी.
*गरज पडल्यास ह्या गोष्टी फायदा देऊन जातील*
- वेलीला विळा किवा खुरपे ने दोन ओलांडे शेजारी जखमा कराव्या
- फुलोरा अवस्थेत वातावरण बघून अमिस्टार + स्कोर ची फवारणी जरूर टाकावी
- गळ होऊ नये म्हणून पोटॅशियम शोनाईट १ किलो + पोटॅशियम मॉलिब्डेनम २५ ग्राम अशी फवारणी घ्यावी
No comments:
Post a Comment