Search here..

Saturday, November 30, 2024

रब्बी ज्वारी (शाळू) लागवड माहिती

जमिनीची निवड: 

  • प्रकार: मध्यम ते भारी, पाणी धरून ठेवणारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी.
  • pH: ६.५ ते ८.५ असलेली जमीन चांगली.
  • तयारी: जमिनीत दोन वेळा नांगरणी करून कुळवाच्या साहाय्याने भुसभुशीत करावी.

हवामान व हंगाम:

  • रब्बी ज्वारीसाठी थंड हवामान पोषक असते.
लागवडीचा योग्य कालावधी:
  • सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड करा.
बियाणे निवड 
अ.नं.
उपयोग
वाण
कडबा उत्पादन
फुले चित्रामालदांडीफुले यशोदा, CSV-22, परभणी ज्योती CSV-18, फुले वसुधा, RSV-1006
२.
कोरडवाहूकमी पाणी / दुष्काळग्रस्त भागासाठी 
फुले चित्राफुले माऊलीमालदांडीसिलेक्शन-3, फुले अनुराधा 
३.
रोग प्रतिकारशक्ती
फुले चित्राफुले माऊलीमालदांडीफुले यशोदापरभणी ज्योतीफुले वसुधा, RSV-1006, सिलेक्शन-3, फुले अनुराधा 
४.
माझीशेती शिफारस 
फुले चित्रामालदांडी 


बियाण्याचे प्रमाण व प्रक्रिया:

  • बियाण्याचे प्रमाण:
    • खरिप: १०-१२ किलो/हेक्टर
    • रब्बी: ८-१० किलो/हेक्टर

बीज प्रक्रिया
गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो आणि पेरणी थायोमेथोक्‍झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रतिकिलो अशी बीजप्रक्रिया करावी. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

पेरणी 
१ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत शेवटचा कालावधी (०१ ते १० ऑक्टोबर) सर्व बाजूने फायदेशीर ठरतो. 

आंतर / मिश्रपीक 
अधिक थंडीमुळे करडई चे चांगले उत्पादन होते. वातावरणातील या संतुलणाचा विचार केला तर रब्बी ज्वारी आणि करडई यांचे ४:४ किंवा ६:३ या प्रमाणात मिश्र पीक घ्यावे.

लागवड पद्धत:

  • आंतर अंतर: ओळींमध्ये ४५ सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर १५ सें.मी. ठेवावे.
  • लागवड पद्धत: पेरणीसाठी सपाट वाफे किंवा सरी-वरंबा पद्धत वापरावी.

खत व्यवस्थापन 
पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. 
अ.नं.
पिक
खत मात्रा
जिरायती ज्वारी
४० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणी बरोबर
२.
बागायती ज्वारी
८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश    

यापैकी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र ३५ ते ४० दिवसांनी पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे.

पाणी व्यवस्थापन 
अ.नं.
पाणी
पिक स्थिती
दिवस
पहिले  
जोमदार वाढीच्या अवस्थेत
पेरणी नंतर २५-३० दिवसांनी
२.
दुसरे
ज्वारी पोटरीत असताना  
पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
३.
तिसरे
ज्वारी फुलोऱ्यात असताना
पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी
४.
चौथे
कणसात दाणे भरताना
पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी

तण व्यवस्थापन:

  • पहिल्या १५-२० दिवसांत तणांची वाढ वेगाने होते.
  • पहिली निंदण: १५ दिवसांनी करा.
  • दुसरी निंदण: ३० दिवसांनी करा.
  • रासायनिक तणनाशके:
    • अॅट्राझीन @ ०.५ किलो/हेक्टर लागवडीच्या ३-४ दिवसांत फवारा.
कीड-रोग नियंत्रण 
  1. पाने खाणारी अळी:
    • उपाय: क्लोरपायरीफॉस @ २० मिली/१० लिटर पाण्यात फवारणी.
  2. कणसावरील माशी:
    • उपाय: थायामेथोक्साम @ ५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात फवारणी.

महत्त्वाचे रोग:

  1. करपा रोग (Leaf Spot):
    • उपाय: मॅन्कोझेब @ २५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात फवारणी.
  2. कवकजन्य रोग:
    • उपाय: कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब यांचे मिश्रण.
कणसावरील चिकटा
वातावरणातील थंडीचे प्रमाण वाढल्यास ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होते.
रोगाची लक्षणे-
कणसाच्या फुलाच्या गुच्छांतुन मधासारखा चिकट द्रव स्त्रवून संपूर्ण कणीस काळे पडते. परागीकरण न केलेले मादी वाण संपूर्णपणे या रोगास बळी पडून दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.

रोगाचे नियंत्रण- 
◆ बांधावरील दुय्यम पोशिंदा वनस्पती (उदा. बहुवार्षिक गवत) नष्ट कराव्यात.
◆ पीक ५०% फुलोरावस्था सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलीटर पाण्यातून फवारावे. वरील फवारणी गरजेनुसार करावी.

काढणी:

  • योग्य वेळ:
    • पीक १२०-१२५ दिवसांत तयार होते.
    • कणसावरील दाणे कडक होऊन चमकदार दिसतात.
  • कापणीची पद्धत:
    • हत्यारांनी कणसे काढून सुकवून मळणी करा.

उत्पादन:

  • सरासरी उत्पादन:
    • धान्य: २०-२५ क्विंटल/हेक्टर
    • चारा: ३०-४० टन/हेक्टर

बिजप्रक्रिया (Seed Treatment) कशी करावी?

  

बियाण्याची प्रक्रिया म्हणजे पीक उगवणीपूर्वी बियाण्यांना विविध रसायने, जैविक घटक किंवा पोषक घटकांमध्ये भिजवून किंवा पावडर लावून त्यांच्या उगवणशक्ती वाढवणे व रोग, कीड यांपासून संरक्षण करणे.

बिजप्रक्रियेचे उद्दिष्टे:

  1. बियाण्याचे उगम क्षमता वाढवणे.
  2. बियाण्याला बुरशी, कीड, जिवाणू व इतर आजारांपासून संरक्षण देणे.
  3. पिकांची सुरुवातीची जोमदार वाढ होण्यास मदत करणे.
  4. मातीतील पोषक तत्त्वांचा प्रभावी वापर होण्यास मदत करणे.

बिजप्रक्रियेचे प्रकार:

1. रासायनिक प्रक्रिया (Chemical Seed Treatment):

  • बुरशी व जिवाणूजन्य रोगांपासून संरक्षणासाठी रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो.
  • उदाहरणे:
    • थायरम / कार्बेन्डाझिम: 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे.
    • कॅप्टन: 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे.
    • क्लोरोपायरीफॉस (कीड नियंत्रणासाठी): 2 मिली प्रति किलो बियाणे.

2. जैविक प्रक्रिया (Biological Seed Treatment):

  • बियाण्यांना जैविक घटकांमध्ये प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे मातीतील पोषकद्रव्ये सुधारण्यास मदत होते.
  • उदाहरणे:
    • त्रायकोडर्मा: 4 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे.
    • रायझोबियम (डाळींच्या पिकांसाठी): 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे.
    • फॉस्फोबॅक्टेरिया: फॉस्फरस उपलब्धतेसाठी वापरले जाते.
    • जैविक जिवाणू संवर्धनासाठी अझोस्पिरिलम किंवा पीएसबी @ ५ ग्रॅम/किलो बियाण्यावर प्रक्रिया करा.

3. मायक्रोन्युट्रिएंट प्रक्रिया (Micronutrient Treatment):

  • बियाण्याला झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनमसारख्या पोषक घटकांमध्ये भिजवून प्रक्रिया करणे.
  • पद्धत:
    • बियाण्यांना 0.1% झिंक सल्फेट किंवा 0.05% मॉलिब्डेनम द्रावणात 12 तास भिजवावे.

4. प्राकृतिक प्रक्रिया (Indigenous Treatment):

  • घरगुती पद्धतीने बियाण्यांना प्रक्रिया केली जाते.
  • उदाहरण: गाईचे शेण व गोमूत्र (50:50 मिश्रण) मध्ये भिजवून वाळवणे.

बिजप्रक्रियेची पद्धत:

  1. बियाण्याची निवड:

    • काडीकचरा, तुटलेली व खराब बियाणे काढून टाकावीत.
  2. मिश्रण तयार करणे:

    • लागणारे रसायन/जैविक घटक व योग्य प्रमाण पाण्यात मिसळून घ्या.
  3. बियाणे प्रक्रिया:

    • बियाण्यांना द्रावणात 30 मिनिटांपासून 12 तासांपर्यंत भिजवावे (प्रकारानुसार).
    • किंवा रसायन/जैविक घटक थेट बियाण्यांवर पसरून नीट मिसळावे.
  4. वाळवणे:

    • प्रक्रिया झालेल्या बियाण्यांना सावलीत वाळवून पेरणीसाठी तयार करावे.

महत्त्वाच्या सूचना:

  • रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर जैविक प्रक्रिया करू नये.
  • बियाणे प्रक्रिया केल्यानंतर लगेच पेरणी करावी.
  • सुरक्षेसाठी ग्लोव्हज, मास्क वापरावे.

उदाहरण:

  • सोयाबीनसाठी:
    1. प्रथम थायरम 3 ग्रॅम प्रति किलोने प्रक्रिया.
    2. नंतर रायझोबियम व फॉस्फोबॅक्टेरिया यांचे मिश्रण लावावे.

निष्कर्ष:

बिजप्रक्रिया केल्याने उगवणशक्ती सुधारते व उत्पादनवाढ होते. शिवाय, रोग व किडींच्या प्रादुर्भावाला आळा घालता येतो.

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके

*माझीशेती कृषिवार्ता : शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके*(20160805)
- संतोष तनपुरे

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत रोग व किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी *५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वाटप* करण्यात येणार आहे.
*कडधान्य* पिकांसह दुय्यम पिकांच्या पीक संरक्षणासाठी *राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून* हा कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. तर विदर्भातील पाच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत भात पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशके देण्यात येणार आहे.
*राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून* भुईमूग, सोयाबीन, करडई, जवस, तीळ या पिकांच्या संरक्षणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशकांसाठी 50% अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
*क्रॉपसॅप* अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांना सर्व कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

*लाभार्थी निवड*
अभियानांतर्गत निवडलेल्या पिकांच्या प्रकल्पाच्या *शेतकरी गट, शेतकरी कंपन्यातील शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा लाभ मिळणार* आहे. त्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया

बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते. बियाण्याचे प्रमाणीकरण खालील अवस्थांमधून पार पाडले जाते.

१) क्षेत्राची निवड -
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते.

२) विलगीकरण (आयसोलेशन) -
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते.

३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी -

  • बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून सोयाबीन पिकाच्या दोन तपासण्या कराव्यात. पहिली तपासणी पीक फुलावर येतेवेळी (३५ ते ४० दिवस) व दुसरी तपासणी पिकाची काढणी/ कापणी अगोदर करावी.
  • भेसळ काढणे - मुख्य पिकातील इतर सोयाबीन जातींची झाडे वेळेवर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी बीजोत्पादकांनी पेरणीपूर्वी अथवा पेरणी केल्यानंतर १५ दिवसांत आपले क्षेत्र फी भरून बीज प्रमाणीकरणासाठी नोंद करून घ्यावे. तसेच पीक फुलावर येण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे भेसळ ओळखणे व ती काढणे याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान संबंधित अधिकारी देऊ शकतील.
  • पीक वाढीच्या काळात बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी करून फुलांचा रंग, खोड व फांद्यांवरील लव, शेंगाचा केसाळपणा वाढीचा प्रकार व फुलोऱ्याचा कालावधी इ. गुणधर्मावर आधारित वेगळी वाटणारी झाडे फुलोऱ्याच्या पूर्वी व फुलोऱ्यावर असताना किमान दोन किंवा तीन वेळा क्षेत्राची तपासणी करावी.

४) प्रक्रिया करणे-

  • बीजप्रक्रिया केंद्रावर बियाणे पाठवून १० x ६४ (४.०० एम.एम.) या आकाराच्या चाळणीतून प्रक्रिया (ग्रेडिंग) करणे अत्यंत आवश्यक आहे. 
  • यापेक्षा छोट्या आकाराची चाळणी वापरू नये. अन्यथा, लहान आकाराचे बियाणेसुद्धा चांगल्या प्रकारच्या बियाण्यामध्ये मिसळले जातील. 
  • बीज प्रक्रिया केंद्रावर तयार झालेले उच्च दर्जाच्या बियाण्याचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. 
  • प्रयोगशाळेत बियाण्याची उगवणशक्ती, बियाण्याची भौतिक व अानुवंशिक शुद्धता, आर्द्रतेचे प्रमाण इ. तपासण्या केल्या जातात. 
  • प्रयोग शाळेतील प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या लॉटनंतरची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा बियाण्याचे ३० किलोग्रॅम प्रति बॅग प्रमाणात पॅकिंग केले जाते.

५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी -

  • बियाणे पिशवीत भरताना व मोहोरबंद करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण त्यांची उगवणशक्ती, इतर काडीकचरा बियाण्याची शुद्धता, तणांचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास बियाणे स्वीकारले जात नाही. 
  • मूलभूत बियाण्यासाठी सोनेरी पिवळे, पायाभूतकरिता पांढरे व प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाचे टॅग (लेबल) वापरतात. जेणे करून बियाणे कुठल्या प्रकारे आहे हे तत्काळ लक्षात येते.

बियाण्याचा प्रकारमूलभूतपायाभूतप्रमाणित
शुद्ध बियाणे (कमीत कमी)१०० टक्के९८ टक्के९८ टक्के
घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त)०.० टक्के२ टक्के२ टक्के
इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त)नाहीनाही१० प्र.कि.ला
तणांचे बियाणे (जास्तीत जास्त)नाही५ प्र.कि.ला१० प्र.कि.ला
इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त)नाही५ प्र.कि.ला१० प्र.कि.ला
उगवणशक्ती (कमीत कमी)७० टक्के७० टक्के७० टक्के
बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त)१२ टक्के१२ टक्के१२ टक्के

सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -

  • पिकाची कापणी करतेवेळी त्यात गवत असता कामा नये. कापणी जमिनीलगत करावी.
  • आंतरपिकामध्ये सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये.
  • पीक तयार होण्याच्या १० दिवस अगोदर, प्रति १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे साठवणीमध्ये बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. बियाण्याची उगवणशक्ती वाढण्यास मदत होते. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
  • बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १५-१७ टक्के असताना मळणी करावी.
  • बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.
  • स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) संवर्धन कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत समप्रमाणात देऊन स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्यास बियाण्याची प्रत सुधारते व दाणे वजनदार होतात.
  • पिकाची अनुत्पादक कायिक वाढ रोखण्यासाठी पीक कळी अवस्थेत असताना ---- पोटॅशियम आर्थोफॉस्फेट ५०० ग्रॅम अधिक २० मि.ली. ---- लिव्होसीन १०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
  • फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा दीर्घकाळ ताण पडल्यास ओलित देण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक फुलोऱ्यात असताना कोळपणी करू नये.
  • सोयाबीनची झाडे मुळासकट उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाण्यात मातीचे खडे येण्याची शक्यता असते.
  • मळणी शेतातच ताडपत्रीवर किंवा मातीच्या खळ्यावर सोयाबीनचा जाड थर पसरून करावी.
  • तयार झालेले बियाणे सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खालील आल्यास वाळवणे थांबवावे.
  • पोत्यांची साठवण करताना जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त थप्पी लावल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

------------- 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करून संपर्क साधावा