Search here..

Friday, January 3, 2025

कलिंगड

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची, पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.
१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.
४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :
१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे.दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य आहे.

लागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो.

पाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.

पीक संरक्षण : (कीड व रोग)
कीडलक्षणेनियंत्रण (जैविक उपाय)नियंत्रण (रासायनिक उपाय)
नागअळी (लीफ मायनर)पानांवर नागमोडी, पिवळट रेषा, पाने गळतात.पिवळ्या चिकट सापळे (10-12 सापळे/एकर), निंबोळी अर्क (5%)स्पायनोसॅड @ 0.3 मिली/लिटर फवारणी.
लाल भुंगेरेलालसर किडे पाने व फुले कुरतडतात.निंबोळी अर्क (5%), किडे हाताने गोळा करून नष्ट करणेकार्बारिल @ 2 ग्रॅम/लिटर फवारणी.
फळमाशीफळाच्या सालीवर छिद्र, फळे आतून सडतात.मिथाइल युजेनॉल सापळे (4-5 सापळे/एकर).डेल्टामेथ्रिन @ 1 मिली/लिटर फवारणी.

रोग :
रोगलक्षणेनियंत्रण (जैविक उपाय)नियंत्रण (रासायनिक उपाय)
करपा (डाऊनी मिल्ड्यू)पानांवर पिवळसर ठिपके, राखाडी बुरशी, पानगळ.ट्रायकोडर्मा विरिडीचा वापर.मॅन्कोझेब @ 2 ग्रॅम/लिटर फवारणी.
भुरी (पावडरी मिल्ड्यू)पानांवर पांढऱ्या बुरशीचे थर, पाने भुरकट होऊन गळतात.कडुनिंब अर्क फवारणी.सल्फर पावडर @ 2 ग्रॅम/लिटर फवारणी.
मर रोगवेली अचानक मरतात, जमिनीत बुरशीजन्य संसर्ग.ट्रायकोडर्मा विरिडी किंवा पॅसिलॉमायसेसचा वापर.कॅप्टन @ 2 ग्रॅम/लिटर फवारणी.

फळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे ?

१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.
२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.
३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.
उत्पादन : साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.

अस्टर (Aster) लागवड व व्यवस्थापन

1. जमीन / माती

  • प्रकार: सुपीक, चांगल्या निचऱ्याची जमीन.
  • pH: 6.0 ते 7.5.
  • तयारी: जमीन नांगरून सेंद्रिय खत मिसळा. शेवटच्या नांगरणीवेळी शेणखत किंवा कंपोस्ट मिसळा.

2. बियाणे

  • नाव: 'ओस्टर ब्लू', 'पिंक स्टार', 'व्हाइट क्वीन' इत्यादी जाती लोकप्रिय.
  • एकरी उत्पन्न: 8-12 टन (योग्य व्यवस्थापनावर अवलंबून).
  • विशेष बाब: बियाण्यांची उगवणक्षमता 80-90% असावी.
  • विशेष काळजी:
    • बियाण्यांना लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा पावडरने प्रक्रिया करा.
    • उष्ण व दमट हवामानात रोपवाटिकेची काळजी घ्या.
वाढीचा टप्पाबियाण्यांचे प्रमाणलागवडीचे अंतर
रोपवाटिका तयार करणे80-100 ग्रॅम/एकर30x30 सेमी

3. खत व्यवस्थापन

रासायनिक खत व्यवस्थापन:

वाढीचा टप्पा N (नायट्रोजन)    P (फॉस्फरस)    K (पोटॅशियम)
लागवडीपूर्वी    40 किग्र30 किग्र20 किग्र
30 दिवसांनी    30 किग्र20 किग्र20 किग्र
60 दिवसांनी    20 किग्र10 किग्र10 किग्र

जैविक खत व्यवस्थापन:

  • लागवडीपूर्वी: 10-15 टन शेणखत किंवा कंपोस्ट.
  • वाढीच्या टप्प्यावर:
    • जिवामृत: 200 लिटर/एकर दराने 15 दिवसांच्या अंतराने फवारणी.
    • वर्मी कंपोस्ट: 2-3 टन/एकर दराने.

4. मागील पिकाचे बेवड

  • अस्टर लागवडीसाठी डाळिंब, मका, भुईमूग, किंवा भाजीपाला पिके (टोमॅटो, कोबी) घेतल्यानंतर जमीन तयार करणे फायदेशीर आहे.
  • नत्रयुक्त पिके घेतल्यानंतर अस्टर चांगली वाढते.

5. कीड व रोग नियंत्रणासाठी सापळे

  • फेरोमोन सापळे: पाने खाणाऱ्या अळ्यांसाठी प्रति एकर 4-5 सापळे लावा.
  • पीत चिकट सापळे: फुलकिड्यांसाठी प्रति एकर 10 सापळे.

6. कीड व रोग नियंत्रण

जैविक उपाय:

  • कीडनाशक: निंबोळी अर्क (5%) दराने फवारणी.
  • बुरशीनाशक: ट्रायकोडर्मा विरिडी 5 ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

रासायनिक उपाय:

  • कीडनाशक:
    • इमिडाक्लोप्रिड @ 0.5 मिली/लिटर.
    • क्लोरपायरीफॉस @ 2 मिली/लिटर.
  • बुरशीनाशक:
    • कार्बेन्डाझिम @ 1 ग्रॅम/लिटर.
    • मॅन्कोझेब @ 2 ग्रॅम/लिटर.

7. काढणी व्यवस्थापन

  • फुले अर्धवट उमललेल्या अवस्थेत काढणी करा.
  • कापलेल्या फुलांना थंड पाण्यात ठेवा.
  • बाजारपेठेपर्यंत पोहोचवताना फुलांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

8. प्रक्रिया उद्योग

  • अस्टर फुलांचा उपयोग पुष्पगुच्छ, सजावट, आणि सुगंधी उत्पादनांसाठी होतो.
  • प्रक्रिया उद्योगांसाठी थेट विक्रीची संधी निर्माण करा.

9. शासकीय योजना

  • राष्ट्रीय बागायती अभियान (NHM): फुलशेतीसाठी अनुदान.
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना: ठिबक सिंचनासाठी आर्थिक मदत.
  • राष्ट्रीय जैविक शेती योजना: जैविक शेतीसाठी प्रोत्साहन.
  • महिला व शेतकरी गट अनुदान: फुलशेतीसाठी सामूहिक प्रकल्पांना मदत.

Tuesday, December 31, 2024

शेवंती लागवड

शेवंती लागवडीस हलकी ते मध्यम प्रतीची  जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5  ते  7 दरम्यान असावा. 

लागणीची पद्धत 
शेवंतीची  लागवडीस  10 ते  15 सेंमी लांबीच्या  सकर्सच्या तुकड्यांचा वापर करावा .जाती नुसार 60 सेंमी  अंतर सऱ्या पाडाव्या किंवा 3×2 आकाराचे सपाट वाफे तयार करून 30×20 सेंटीमीटर ठेवुण लागवड करावी .

बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बोर्डो मिश्रण किंवा बविस्टिनच्या द्रावनात बुडुन बीज प्रक्रिया करा.जर लागवडीस शेंडा कलम किंवा खोड कलम अवलंबल्या स बेने 2-3 पाने असलेले कलम कांडी बुरशीनाशकात बुडविले नंतर IBA 1000  ppm या संजीवकात बुडुन लागवड करावी.

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति हे. 40 टन शेनखत द्यावे. लागवड करताना प्रति हे. 200 किलो प्रमाणे, स्फूरद, पालाश द्यावे. आणी नत्र पहिला हप्ता 15 दिवसानी 100 किलो व दुसरा नत्राचा हप्ता 45 दिवसांनी 100 -किलो मात्रा द्यावी. जमिनीच्या मगदुराने 4-5 दिवसाच्या अंतराने पाणी  द्यावे.

वळन आणी छाटनी - लागवडी नंतर 3-4 आठवड्यानी 10 सेंमी शेंडा  खुडावा यालाच पिचिंग असे म्हणतात

लागवडीस उपयुक्त जाती - झिप्री ,राजा ,पांढरी रेवडी ,पिवळी रेवडी ,सोनाली तारा ,आय .आय . एच .आर . सीलेक्शन -4, बग्गी ,शरद माला जाती वापरावि.

किड नियंत्रण 
1) मावा - पिकाच्या कोवळ्या पानातून रस शोषून घेते  खाते नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात   किंवा  मॅलॅथिऑन 15 मिली ची फवारनी करावी.

2) फुलकिडे  - कळी आणी पानातीला रस शोषून घेते मॅलेथियॉन (50%प्रवाहि)10- मिली 10 लिटर पाण्यात फुले  येण्यापूर्वी  1ते 2 वेळा  फवारावेत.
        
3) पाने खाणारी आळी -पिकावरील सर्व पाने खाऊन  टाकते नियंत्रण करीता 12 मिली इकॅलकस (35%प्रवाहि)किंवा थायोडॉन (35%प्रवाहि) ची फवारनी करावी .

4) लाल कोळी - पानांच्या खालून रस शोषण करतात. नियंत्रण -30ग्रॅम पाण्यात विरघळणारे  गंधक अथवा 10 मिली केलथेन 10 लिटर पाण्यात मिसळून फवरावे .

रोग नियंत्रण 
1) खोड कुज - खोड काळे पडून पाने  सुकतात 
नियंत्रण - बाव्हिस्टीन 20 ग्रॅम  किंवा कॅप्टन 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

2) पानावरील ठिबके - पानावर गोल ठिबके पडतात नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन - एम -45 डायथेन झेड -78 हे बुरशी नाशक फवारावे .

3) रोपांची मर - रोप तपकिरी रंगाचे पडून पाने  सुकतात व कालांतराने रोप मरते  नियंत्रण करीता डायथेन एम- 45   0.2% द्रावणात रोप बुडून लागवड करावी. 

4) मूळकुज - अतिरिक्त पानी साचल्याणे रोप मरते नियंत्रणा करीता रोपाच्य मुळाजवळ 25 ग्रॅम थायरम (80%)10 लिटर पाण्यात मिसळून फवारवे .

5) भूरि - रोपावर पांढऱ्या रंगाचे डाग पडतात नियंत्रण -10 लिटर पाण्यात 6ग्रॅम कॅरथेन किंवा 10 ग्रॅम बविस्टिन फवारवे .

6) तांबेरा - पानावर  वीटकरी रंगाचे ठिबके पडतात व फुले कमी येतात नियंत्रणकरीता 30 ग्रॅम डायथेन एम -45    10 लिटर पाण्यातून फवारवे.

महत्वाची घ्यावयाची काळजी 
फुलांची काढनी  कोवळी असतांनच  सकाळच्या वेळी करावी. काढनि नंतर फुले थंड ठिकाणी ठेऊन लवकरात लवकर प्रतवारी करून पॅकिंग करून बाजारपेठेत विक्रीस पाठवावे.