डाऊनी मिल्ड्यु कारणे
|
डाऊनी मिल्ड्यु उपाय
|
1) प्लाझमोपॅरा विटीअोकोला (plasmopara
viticola) या बुरशीमुळे हा रोग होतो.
2) 20 अंश से. ते 30 अंश से. तापमाण व 60% पेक्षा जास्त आद्रतेला या
बुरशीची सुप्त अवस्था संपुन प्रचंड वेगात बुररशीची वाढ होते
3) पाऊस, चुकीचे पाणी नियोजन, दव इत्यादी कारणांमुळे 2
तासापेक्षा जास्त वेळ पोंगा, पाने ,घड यामध्ये आेलावा
राहिल्यामुळे बुरशीची वाढ होते.
4) पानांची कमकुवत पेशी,
फिजीकल डॅमेज (वारा,पाऊस,गारा),
बायोलॉजीकल डॅमेज (किडी,सुत्रकृमी), केमीकल डॅमेज (बुरशीनाशके, किटकनाशके, खते -कोवळ्या पानावर 2 किलो s o p चे स्कोर्चिंग) या सारख्या डोळ्यांनी सहज न दिसणार्या कारणाने वेलीमध्ये
रोगाची लागण होते.
5) अवैज्ञानीक, अतिरेकी रासायनिक बुरशीनाशके फवारणीमुळे वेल अशक्त होउन रोगाला सहजच बळी
पडते. ऑक्टोबर छाटणी अगोदर मोठ्या प्रमाणात लागण झालेल्या डाऊनीमुळे रोग वाढतो.
|
1) एकात्मिक रोग नियंत्रण (IDM)
तंत्रज्ञान वापरावे.
2) द्राक्ष बागेत
पानांमध्ये आद्रता ,दव राहणार नाही याची काळजी घ्यावी.
3) अंतरप्रवाही बुरशीनाशके, स्पर्शजन्य बुरशीनाशके , ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलसचा
वापर वैज्ञानिक द्रुष्ठीनेच करावा.
4) डाऊनी च्या बुरशीमध्ये
रासायनिक बुरशीनाशकांविरोधी प्रतिकारक्षमता तैयार होऊ नये म्हणून
बुरशीनाशकांच्या QOI, MSA, DMI, गटांचा अभ्यास करून
फवारणीचे शेड्युल्ड ठरवावे.
|
आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या...
No comments:
Post a Comment