MIDAS प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती हा विषय प्राधान्याने घेतला जातो. आर्थिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत मिडास प्रकल्पातील समूह विकास परियोजनेत खालीलप्रमाणे निवडप्रक्रिया सुरू आहे.
कामाचा तपशील
- शेतकऱ्यांची दैनंदिनी बनवणे, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेणे.
- शेतकऱ्यांची वैयक्तिक, शेती, आणि सामाजिक प्रोफाइल बनवणे.
- गावस्तरावर शेतीमाल उत्पन्नाचे अंदाज बांधणे. शेतमाल काढणीचे वेळापत्रक बनवणे.
- शेतकऱ्यांचे शेतमाल काढणी पासून शेतमालचे विक्री किंमत शेतकऱ्यांचे खातेवर येईपर्यंत पाठपुरावा करणे.
- मिडास प्रकल्पाची लोकवर्गणी जमा करून घेणे.
- ऐनवेळी उपस्थित प्रश्न सोडवणे.
प्राधान्यक्रम
- उमेदवार शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील असावा.
- उमेदवाराचे वय १८ ते ३० वयोगटाचे असावेत.
- दिव्यांग उमेदवार - ३०% राखीव
- महिला - ३०% राखीव
- एकल पालक कुटुंबातील उमेदवार ३०% राखीव
- कृषि, अभियांत्रिकी, समाज सेवा, कॉमर्स पदवीधर
कामाचे ठिकाण आणि उपलब्ध जागा
- नाशिक - ४
- अहमदनगर - ४
- पुणे - ४
- मुंबई - ४
- सातारा - २
- कोल्हापुर - २
- सांगली - ४
इतर नियम, अटी व शर्ती
- कोणत्याही प्रकारचा कागद वापरू नये. अपवादात्मक परिस्थितीत पुर्वमंजुरी घेवून वापरता येतात.
- शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकास हा प्राधान्याचा विषय असलेने संस्थेमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही अधिकृत कर्मचारी यांना सुट्टी लागू नाही.
- मासिक ४ सुट्टी लागू आहेत.
- मिळणारे भत्ते हे उमेदवारांनी भविष्याच्या नियोजनानुसार वापरावेत, संस्था कोणाचीही जबाबदारी घेत नाहीत. उदा. वैद्यकीय भत्ता हा इन्शुरन्स साठी वापरावा. अपघात परिस्थितीत संस्था मदत करत नाही.
- अपेक्षित उमेदवार प्राप्त न झालेस वरील प्राधान्यक्रम बदलनेचे अधिकार संस्थेकडे आहेत.