Search here..

द्राक्षे : खत व्यवस्थापन

द्राक्षाला खते देण्याची योग्य वेळ :
स्फुरद खरड छाटणीनंतर फळधारणेच्या वेळेस द्यावे. नत्राची गरज असेल तर गरजे एवढीच नत्राची मात्रा द्यावी.
पोटॅशियमचा वापर काडी पक्क होतानाच करावा. सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची नव्या पानांवरती फवारणी करावी.
मायक्रो न्यूट्रिएंट्स जमिनीतुन देणे फायदेशिर ठरते. कारण ती एक ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी उपल्बध होत नाही. द्राक्षाला अंदाजे दिलेल्या खताचा उपयोग होत नाही.

मुलद्रव्यांची कार्यक्षमता 
नत्र
नत्रयुक्त खते गरजेनुसार वापरुन कार्यक्षमता वाढवावी. अतिरिक्त नत्र वाया जाते.
जेणेकरून त्याची कार्यक्षमता वाढेल. आम्लयुक्त नत्र खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट ऑक्टोबर छाटणीनंतर द्यावेत. तण आणि पाणी व्यवस्थापन बरेच प्रमाणात खताची बचत करते. नत्रयुक्त खत दिल्यानंतर पाणी देवु नये किंवा पाणी दिल्यानंतर ख़त देवु नये. नत्राची पानांवरती फवारणी १- २ ग्रॅम युरिया प्रति लिटर या प्रमाणात ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस करावी. नत्र द्राक्षाला सेंद्रिय खातांद्वारेच द्यावे. कारण सेंद्रिय नत्रयुक्त खतातील नत्र द्राक्षाला हळूहळू प्रमाणात उपलब्ध होते.

स्फुरद
द्राक्षपिकास स्फुरादाचे कार्य घड निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हरीतद्रव्यांची निर्मिती, न्युक्लिक आम्लांचे संश्लेषण यासाठी स्फुरदाची गरज असते. स्फुरदयुक्त खते मातीमध्ये मिसळू नयेत. मातीमध्ये स्फुरद सेंद्रिय खताबरोबर जेथे द्राक्षवेलीची कार्यक्षम मुले असतील तेथे टाकावे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते व ते द्राक्षवेलीला योग्य प्रमाणात उपलब्ध होते. स्फुरदयुक्त खते जसे की डी. ए. पी १०० - २०० ग्रॅम प्रति १०० लिटर व फोस्फोरीक आम्ल ७० मिली/ १०० लि. या प्रमाणात पानांवरती फवारणी करावी. फोस्फोरीक आम्ल फर्टीगेशनद्वारे २ लिटर प्रति एकर या प्रमाणात आठवड्यातून दोन वेळा द्यावे.

पालाश
कांड्यांच्या पक्वतेसाठी व साखरेच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी पालाश आवश्यक असते. ज्या जमिनीची कॅटआयन विनिमय क्षमता जास्त असते, त्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी देऊन पाण्याचा निचरा करावा. पालाश मातीमध्ये मिसळून किंवा  फर्टीगेशनद्वारे देता येते. तसेच पालाशची पानांवरती फवारणी करून पालाशची कमतरता दूर करता येते. पालाशचा वापर करताना सल्फेट ऑफ पोटॅश
वापरावे. क्लोराईड असणारी मिश्र खते वापरू नये.

कॅल्शियम
कॅल्शियम या अन्नद्रव्याचा वपर फुलोऱ्याचे वेळी पानांवरती फवारणी करून किंवा डिपींगद्वारे द्यावित. कॅल्शियम हे मुलद्र्व्य द्राक्षवेलीत वहनीय नाही. द्राक्षवेळीमध्ये जी (व्हाईट रूटस) पांढरी मुळे असतात तीच फक्त केल्शियम शोषून घेऊ शकतात. मर्यादित पाणी, मर्यादित तापमान नसेल तर पांढरी मुळे कार्यक्षम राहत नाहीत. त्यामुळे जेव्हा जी. ए.ची फवारणी किंवा डिपींग करतो. त्यानंतर लगेच कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईडची पानांवरती फवारणी करावी. त्यामुळे घडकुज रोखता येते. अविद्राव्य स्थितीतील कैल्शियम द्राक्षास उपयोगी होत नाही. परंतु हे फक्त ऑक्टोबर छाटणीनंतरच करावे.

बोरॉन
हलक्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता दिसून येते. बोरॉन कमतरतेमुळे द्राक्षमणी लहान होतात. द्रक्षामण्यांची गोडी कमी होते. देठ तपासणी करून बोरॉनची कमतरता असेल तरच बोरॉनचा वापर करावा. बोरॉनचे जमिनीमध्ये स्थिरीकरण होत नाही त्यामुळे बोरॉनचा जास्त वापर टाळावा. बोरॉन गरम पाण्यामध्ये मिसळून पानांवरती फवारणी करावी.

मॉलीब्डेनम
हलक्या जमिनीमध्ये मॉलीब्डेनमची कमतरता दिसून येते. देठ परीक्षणाच्या आधारे मॉलीब्डेनमची कमतरता असेल तरच त्याचा वापर करावा.

क्लोराईड
क्लोराईड हे इतर अन्नद्रव्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्लोराईडचे विपरीत परिणाम पानांवरती दिसून येतात. त्यामुळे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी क्लोराईडयुक्त खते वापरू नयेत.


आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या... 

No comments:

Post a Comment