छाटणीनंतर सुरवातीच्या काळात डाऊनी येतो, त्यापासून बाग वाचविण्यासाठी छाटणीचे नियोजन योग्य वेळी व्हावे. 15 ऑक्टोबरनंतर शक्यतो पाऊस पडत नाही. त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. रोग नियंत्रणावरही ताबा राहतो.
महत्त्वाचे मुद्दे -
- ज्या बागांची छाटणी लवकर होते, त्या बागांशेजारच्या न छाटलेल्या बागेत रोग येणार नाही याची काळजी घ्यावी.
- काडीवरील डाऊनीच्या बीजाणूंचा नायनाट करण्यासाठी पेस्टिंग करावे. यात तीन ते पाच ग्रॅम मॅन्कोझेब आणि दोन ग्रॅम सल्फर यांचे मिश्रण करावे. याद्वारे भुरीचेही नियंत्रण होण्यास मदत होईल.
- छाटणीनंतर फुटलेल्या अनेक फुटी पुढे जातात. त्या हाताने काढून टाकाव्यात. त्यामुळे रोगाचे बीजाणू वाढणार नाहीत.
ऑक्टोबर छाटणी अगोदर दहा ते बारा दिवस शेनखत कूजलेले चार टन किवा अॅगर बायो ऊर्जा एक टन जमीनीतून देने दोन्ही बाजू देने . त्या नंतर चार पाच दिवसांनी डि ए पी 100 किलो +एस ओ पी 25 ते 50 किलो +यूरिया 25 किलो{गरजेनुसार }-एक बाजू देने, दूय्यम अन्नद्रव्य 100 किलो +सूक्ष्म अन्नद्रव्य 20 किलो +सूपर बि टि एम गोल्ड -6 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो -दूसरी बाजूला देने.
पोंगा अवस्थेतील काळजी
पोंगा अवस्थेत रोगाचा धोका जास्त असतो. पोंगा अवस्थेत पोंगा हाताने दाबून पाहावा. पोंग्यात सकाळी पडणाऱ्या दवाचे पाणी शिरले असेल तरच फवारणी करावी.
अशावेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांऐवजी डायथायोकार्बामेट गटातील (मॅन्कोझेब किंवा मेटीराम सारखी) बाह्यस्पर्शी बुरशीनाशक फवारले तर धोका टाळता येतो.
कमी खर्चाच्या नियोजनासाठी -
- डाऊनी, भुरी व करपा रोगांचे बीजाणू हवेद्वारे पसरतात. सप्टें.-ऑक्टो.मध्ये वारे पश्चिमेकडे वाहतात. त्यामुळे छाटनी पूर्वेकडून पच्छिमेकडे छाटनी करावी.
- जास्त रोग असलेली वा पानगळ झालेली बाग लवकर छाटल्यास रोगांच्या प्रसाराला आळा बसेल.
- फवारणीपूर्वी चांगले हवामान पाहूनच फवारणीचा निर्णय घ्यावा.
- शक्यतो बुरशीनाशक हे दुसरे कोणतेही रसायन न मिसळता फवारावे.
द्राक्ष फवारणी व्यवस्थापनातील काही नियमः-
1. रोग दिसन्या अगोदर फवारणी गरजेचे आहे.
2. रोग दिसल्यानतंर आंतरप्रवाही फवारणी टाळावी.
3. बुरशी सारख्या रागाचे इनाकुलाम किति हि दुरवर जाऊ शकते. (उदा. डाऊणि ५० मिटर) त्यामुळे रोगग्रस्त बागेकडे दुर्लक्ष करून फक्त चागंल्या बागेवरच लक्ष केन्द्रित करण्याचि मानसिकता टाळावी.
४. सर्व साधारण बोर्डोमिश्रन वगळता बुरशिनाशकांच्या द्रावणाचा सामु ६ ते ६.५ आम्लधर्मी ठेवावा. उदाः कार्बेन्डिझमसारखे औषधांची ७.५ pH ला विघटन होते.
५. एकावेळी एकच बुरशीनाशक फवारावे.
६. पावसाळी वातावरणात स्प्रेडर किंवा स्टिकर वापरणे.
७. बागेत सुर्यप्रकाश व वारा खेळता रहावा यासाठी प्रयत्न करावा.
प्रत्येक वर्षी छाटनीपूर्वी ठिबंक सिंचनाची डिस्चार्ज, प्रेशर साठी देखभाल - दुरुस्ती करून घ्यावी.
अमोनियम स्लफेट आणी 13:0:45 एकत्र देवु नये.
नायट्रेट खते ठिबक देताना शेवटी द्यावी.
फॉस्फेरिक गटातील अन्नद्रव्या बरोबर फेरस, झिक,कॅलशियम या गटातील अन्नद्रव्य देऊ नयेत. दोन्हिचे परिणाम मिळणार नाही. (12:61:0, 0:52:34, फॉस्फरिक असिड बरोबर फेरस झिंक ,कॅलशियम सोडु नये)
आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या...
आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या...
No comments:
Post a Comment