Search here..

संजीवकांचा वापर व छाटणी नंतरचे वेळापत्रक

संजीवकाचा वापर

इथ्रेल(इथिलीन), जिब्रेलिक अॅसिड, लिहोसीन, 6 बीए ,ब्रासोनो (पोषक ) सीपीपीयु
१) ईथ्रेल (इथिलीन) : ऑक्टोबर छाटणी पूर्वी साधारणता दोन आठवडे या संजीवकाचा वापर पानगळ करण्यासाठी केला जातो.१००० ते २५०० ppm तीव्रतेचे द्रावण फवारले असता छाटणी पर्यत पाने ९० % पर्यत पानगळ होते.तसेच छाटणी योग्य डोळावर करणे सोपे जाते.तसेच छाटणीनंतर डोळे लवकर फुटण्यास मदत होते.

प्रमाण -
ईथ्रेल 100 मिली 100 लिटर पाणी -1000 ppm
ईथ्रेल  250 मिली 100लिटर पाणी -2500 ppm
ईथ्रेल ५०० मिली 100  लिटर पाणी -5000  ppm
ईथ्रेल ६२५ मिली 100 लिटर पाणी -6250 ppm

पानगळीसाठी आठ ते दहा दिवस अगोदर इथ्रेल 600मिली+पि एच मास्टर एक्स 200मिली+13:0:45-1किलो+सा अलवा 100मिली= 200लिटर पाणी चिंब फवारणी करणे,  पानगळीचे चांगले रिझल्ट यावेत म्हणून इथ्रेल मारण्या अगोदर दोन तीन दिवस आधी व नंतर पानगळ होईपर्यंत प्लॉटला पाणी देऊ नये. परंतू कूज गळीचा ज्या क्षेत्रात प्रादूभ्राव असेल तर तेथे इथ्रेलचा वापर करू नये, हाताने दोन तीन दिवस आधी पाने काढून टाकावी त्यामुळे काडी तापून एक सारखा फूटवा होन्यास मदत होईल.

छाटणी नंतर घ्यावयाची काळजी

दिवस
घ्यावयाची काळजी
0 ते ३५ दिवस ( धोकादायक अवस्था)
०१
१% बोर्डो मिश्रणाची गच्च फवारणी करावी.
७ ते ८
डोळे कापसणे अवस्था उडद्या किडीसाठी फवारणी घेणे.
१०
करपा नियंत्रण व घड बळकटीसाठी फवारणी करणे
१२
घड जिरू नये म्हणुन फवारणी करणे
१३
डावणी व उडद्या नियंत्रणासाठी फवारणी करावी
१५
करपा व डावणी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
१७
फेल नंतर १० पी.पी.एम जी ए फवारणी ६०० लि.पाणी प्रतिएकर
१८
डावणी नियंत्रणासाठी फवारणी करावी
२०
करपा व किटकनाशक एकत्र फवारणी करावी.
२२
घड पोपटी रंगाचा असतांना १० पी.पी.एम. जी.ए+१ग्रम युरियाची फवारणी (पावसाचा अंदाज घेउन) करावी.
२४
डावणी नियंत्रणासाठी फवारणी करावी
२५
जी.ए.१५ पी.पी.एम.+ डावणी नियंत्रणासाठी (घडांची व पाकळ्यांची लांबी मिळवण्यासाठी) फवारणी घ्यावी.
२६
करपा व डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी
२८
थ्रिप्स (फुलकिडे) नियंत्रण + डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
३०
पाऊस असेल तरच डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.(फ्लॉवरिंग सुरु असतांना)
३२
भुरी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
३४
पाउस असेल तरच डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
३५
मिलीबग ( पिठया ढेकुण) नियंत्रण करिता जमिनीतुन
३७
करपा व थ्रीप्स नियंत्रणासाठी फवारणी करावी.
३८
डावणी व हिरवी अळी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
४०
१००% कॅपफॉल ते १ ते २ एम. एम.अवस्था जी.ए.१० पी.पी.एम.+ ६ बीए १० पी.पी.एम.+ कॉम्बी एफ.१/२ ग्रम फवारणी करावी. हि फवारणी शक्यतो दुस-या डिप पुर्वी ५ दिवस अगोदर करावी.
४२
भुरी व थ्रीप्स करिता फवारणी करावी.
४५
मणी सेंटिंग नंतर डिप ४० पी.पी.एम.जी.ए.+डावणी नियंत्रक+सि.पि.पी.यु.
४७
थ्रीप्स + भुरी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
४९
तिस-य़ा डिपच्या आगोदर ५ दिवस जी.ए.१० पी.पी.एम.+ ६ बीए.१० पी.पी.एम.+१९.१९.१९ २ग्रम यांची एकत्र फवारणी एकरी ६०० लि. पाणी घेउन फवारणी करावी.
५१
डावणी नियंत्रक + थ्रीप्स नियंत्रक यांची एक फवारणी करावी.
५३
भुरी + मिलीबग करिता फवारणी करावी.
५५
मणीसेटिंग नंतर दुसरा डिप जी.ए.५०पी.पी.एम.+सि.पि.पी.यु+भुरीनाशक.
५७
झिंक बोर्डो ०.३% पी.एच.७.५ ते ८ घेणे.
६०
तिस-या डिप नंतर ५ दिवसांनी जी.ए.१० पी.पी.एम.+६ बी.ए.१० पी.पी.एम.+१३.०४५ . ३ ग्रम प्रमाणे फवारणी करावी.
६५
भुरी नियंत्रण + थ्रीप्स नियंत्रणासाठी फवारणीघ्यावी.
७०
लालकोळी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
७५
भुरी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
८०
भुरी नियंत्रणासाठी फवारणी करावी.


आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या... 

No comments:

Post a Comment