माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ही एक धर्मादाय आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत पब्लिक ट्रस्ट आहे. महाराष्ट्रात 400 पेक्षा अधिक गावात शेतकऱ्यांना गेली 12 वर्षे माहिती
देण्याचे काम करत आहे. यामध्ये खालील कामे होतात.
- शेती,शेतकरी आणि ग्रामीण विकास अंतर्गत माहिती उपलब्ध करणे.
- शासन निर्णय, जनहितार्थ माहितीचे विश्लेषण करून साध्या भाषेत समजावणे.
- उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून शेती व शेती पुरक व्यवसाय विकसित करणे.
- एक गाव एक गट संकल्पना राबवून गाव स्तरावर वॅल्यू चैन बनवणे.
- भुमीहीन, अल्प आणि अत्यल्प भुधारक तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.
- डिजिटल लिटरसी आणि फायनान्सशिअल लिटरसी बाबत प्रबोधन करणे.
- RKVY- RAFTAAR अंतर्गत तयार झालेला शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करणे.
- दैनंदिन जीवनात शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी सोडवणे.
- शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत (क्लिक करा.) करणे.
- शेतकरी कुटुंबातील कामासाठी विस्थापित झालेल्या सदस्यांना कामाच्या ठिकाणी ताणतणाव पासून दूर ठेवणे, घरी पिकलेले धान्य पोहचवणे, व्यस्त जीवनशैलीमुळे तयार झालेले अथवा होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे (क्लिक करा.).
वरीलप्रमाणे कामे करताना तज्ञ मनुष्यबळ, सहकारी आणि स्वयंसेवक यांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी आम्ही स्थानिक स्तरावर कार्यरत शैक्षणिक संस्था, कृषि विज्ञान केंद्रे, शासकीय विभाग, समाजसेवी संस्था आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे स्वयंसेवक यांच्या मदतीने शेतकरी विकासाचे प्रकल्प राबविले जातात. प्रत्येक वर्षी केलेल्या कामाचा आढावा घेवून विकासाच्या टप्प्यातील पुढील वर्षाचे धोरण ठरवले जाते. ग्रामीण शाश्वत विकास या नावाने सुरू झालेल्या या प्रकल्पाची सध्या 10 वी आवृत्ती राबवली जाते. प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्प लाभार्थी वर्गणी रु. 730 (प्रती लाभार्थी होणाऱ्या एकूण खर्चाच्या 10%) रक्कम भरावी लागते.
याकरिता राबविले जाणारे उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.
- MIDAS मोबाइल इंटीग्रेटेड डेवलपमेंट असिस्टंस सिस्टम - ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांना एकत्र करणे आणि योग्य समन्वय साधून योग्य वेळेला योग्य सल्ला, माहिती, व्यक्ति, शेतमाल आदि योग्य ठिकाणी पोहचवण्यासाठी ही यंत्रणा कामाला येते.
- शेती सल्ला व मार्गदर्शन - शेतकऱ्यांची प्रकल्पांतर्गत नोंदणी झाल्यानंतर त्यांची आणि त्यांच्या शेताची प्रोफाइल बनवली जाते. प्रोफाइल नुसार पुढील 8 दिवस ते 1 महिना कालावधीचे नियोजन केले जाते.
- कृषि वॅल्यू चैन अंतर्गत व्यवसाय निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
- व्यवसाय निर्मितीसाठी आवश्यक संसाधणे उपलब्ध करण्यासाठी हँडहोल्डिंग करणे.
- आवश्यकता भासेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने वकिली करणे.
- क्षेत्र - प्रकल्प समन्वयक, तज्ञ सल्लागार, गाव समिती
- समन्वय - कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलेकॉलर,
- तज्ञ - डेटा अॅनालिस्ट, संशोधक, विषय विशेषज्ञ, वेबसाइट आणि तांत्रिक सिस्टम डेवलपर, वैद्य (मानव आणि पशू)
- व्यवस्थापन - प्रकल्प व्यवस्थापक, मीडिया मॅनेजर, यंत्रणा व्यवस्थापक
- व्यवस्था - एनजीओ, कृषि विज्ञान केंद्र, शैक्षणिक इंस्टीट्यूट, लॉजिस्टिक कंपनी, कॉल सेंटर, आयटी कंपनी
आतापर्यंत केलेल्या विकास कामांमुळे हजारो कुटुंबे सुखी झाली आहेत. यामध्ये भुमीहीन, SC/ST, महिला, अल्प आणि अत्यल्प भूधारक लाभार्थी सहभागी आहेत. मोठे शेतकरी स्वतःच्या खर्चाने नवनवीन प्रयोग करतात, अश्या दात्या शेतकऱ्यांनी मिडास प्रकल्पास चालना दिली आहे. यांच्या अश्या स्टोरी आहेत, ज्यामधून आम्ही शिकलो आणि प्रेरणा घेतली आहेत.
सहभागी होण्यासाठी प्रकल्प लाभार्थी वर्गणी भरणे आवश्यक आहे.
लाभार्थी सोडून इतर घटकांना सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. सहभागी होण्यासाठी अनामत रक्कम ठेव ठेवणे अनिवार्य आहे.
कार्यक्रम गॅलरी (प्रशिक्षण) -
सर मी यामध्ये काम करायला इच्छुक आहे
ReplyDeleteSir mala pn ya projects madhye ustukta aahe
ReplyDeleteSir me suhas gawai at post Mera khurd tq chikhli dist buldana yethun ahe tr me amchya bhagat kam krnyasathi interested ahe
Deleteसर मला या संस्था मध्ये काम करायची इच्छा आहे
Deleteमी इच्छुक आहे
ReplyDeleteमी इच्छुक आहे
ReplyDeleteमी इच्छुक आहे
ReplyDeleteYes I am entrest
ReplyDeleteI am interested
ReplyDelete8668840336
ReplyDeleteकमेंट करताना, त्यासोबत तुम्हाला संपर्क साधण्यासाठी माहिती द्यावी किंवा संस्थेच्या 9975740444 या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्यांना काम करायचे आहे त्यांनी recruitment किंवा पार्टनर या पेजवरून संपर्क करावा.
ReplyDelete