Search here..

Showing posts with label पिके. Show all posts
Showing posts with label पिके. Show all posts

Monday, October 28, 2024

रब्बी हंगामात गहु लागण करायचा आहे? मग एकदा हे वाचा..

हवामान गहू पिकास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान मानवते. थंडीचे कमीत कमी 100 दिवस मिळणे गरजेचे आहे.

जमीन
गहू पिकासाठी भारी खोल काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पूर्व मशागतपेरणीपूर्वी जमिनीची 15 ते 20 सें.मी पर्यंत खोल नांगरणी करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुषीत करावी. ह्याच वेळी शेतात प्रती हेक्टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकुन कुळवाची पाळी द्यावी. 

लागवड
पेरणीची योग्य वेळ
  • कोरडवाहू गहू पेरणी ऑक्टोंबर महिन्याच्या दुस-या पंधरवडा
  • बागायती गहू पेरणी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ते 15 डिसेंबर पर्यंत

बागायती वेळेवर पेरणीकरीता शिफारशीतवाण
बागायती उशिरा पेरणीकरीता शिफारशीतवाण
1) AKAW 3722 (विमल)
2) AKW 1071 (पूर्णा)
3) MACS 6222
4) MACS 2846
5) NIAW 301 (त्र्यंबक)
6) HD 2189
7) NIAWnWWQ 917 (तपोवन) 
1) AKW 381
2) AKAW 4627 (नविन वाण)
3) HD-2501
4) NIAW 34
5) HI 977


पेरणी
  • कोरडवाहू आणि बागायत - दोन ओळीतील अंतर 23 सें.मी ठेवावे.
  • उशिरा बागायत - दोन ओळीतील अंतर १६ सें.मी ठेवावे.
  • पेरणी करतांना बियाणे हे जमीनीत 5 ते 6 सें.मी पेक्षा जास्त खोलवर पाडू नये.
  • कोरडवाहू पेरणी - प्रती एकरी ३० किलो बियाणे
  • बागायती वेळेवर पेरणी - प्रती एकरी ४० ते ५० किलो बियाणे
  • (HD 2189 किंवा AKW 1071 या वाणाचे बियाणे ठसठसीत किंवा जाडसर असल्यामुळे अषा वाणाकरीता प्रती एकरी 60 किलो बियाणे वापरावे.)
  • प्रती हेक्टरी रोपांची संख्या 22.5 ते 25 लाख ठेवा.

बीज प्रक्रिया 
  • पेरणीपूर्वी थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
  • त्यानंतर झोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे. जिवाणू संवर्धन लावून पेरणी केल्यास उत्पन्नात निष्चितच वाढ होते.
  • अॅझोटोबॅक्टर बीज प्रक्रिया केल्यानंतर लावावे व बियाण्यास घट्ट चिटकले पाहिजे याची काळजी घ्यावी.
  • त्यासाठी अॅझोटोबॅक्टर पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावून बियाणे सावलीत वाळवावे.
पाणी व्यवस्थापन
  • एका ओलीताची सोय असल्यास- 42 दिवसांनी
  • दोन ओलीताची सोय असल्यास- 21 व 65 दिवसांनी
  • तीन ओलीताची सोय असल्यास - 21, 42 व 65 दिवसांनी
खत व्यवस्थापन
माती परीक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरविणे.
म्हणून पेरणीपूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. गहू पिकास रासायनिक खताचा
  • पहिली मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्याची तिफण वापरून बियाण्यासोबतच द्यावी.
  • बागायती वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
  • बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.
  • बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबतच द्यावी.
  • नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी ओलीत करतांना द्यावी.
  • कोरडवाहू गहू पेरणी करतांना नत्र व स्फुरदाची पुर्ण मात्रा म्हणजेच 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी.
कीड व रोग नियंत्रण
  • मावा किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिले/प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा दिसल्यानंतर उपाययोजना त्वरित हाती घ्याव्यात.
  • शेतामध्ये पिवळे चिकट कार्ड(स्टिकी ट्रॅप)चा वापर करावा, की ज्यामुळे शेतात पंख असलेली मावा कीड या कार्डला चिकटलेली दिसून येतात.
  • जैविक पद्धतीने नियंत्रण करताना व्हर्टीसिलिअम लेकॅनी किंवा मेटारायझियम ऍनिसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा (गरजेनुसार) फवारणी करावी.
  • रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी थायामिथोक्‍झाम (२५%) १ ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड (५ ग्रॅम) प्रति १० लिटर पाण्यातून एक फवारणी करावी.