Search here..

Showing posts with label वांगी. Show all posts
Showing posts with label वांगी. Show all posts

Thursday, February 5, 2015

वांगी

हवामान 

वांगे हे कोरड्या आणि उष्ण हवामानात येणारे पीक आहे. ते 13 ° से पासून 21 ° से तापमानात घेतले जाते. वांगी पिकाला ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस मानवत नाही. 

जमीन
जमिनीची तयारी चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी पाण्याचा निचरा होणारीसुपीक व मध्यम काळी जमीन निवडावी. 

मशागत
प्रथम जमिनीची आडवी-उभी नांगरट व कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 

बियाणे 
रुचिराप्रगतीपुसा पर्पल लॉगअरुणापुसा पर्पल राउंडपुसा पर्पल क्लस्टरपुसा क्रांतीमांजरी गोटाकृष्णाफुले हरितफुले अर्जुनको-1,को-व पी.के.एम. 1.
हरित कृष्णा, MH१०

सुधारित जातीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम तर संकरित जातीसाठी हेक्‍टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे असते. 

बिज प्रक्रिया 
पेरणीपूर्वी बियाण्यास 10%फॉरेट 20 gm / थायरम 3gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन,सहारा) 1gm/kg ची प्रक्रिया करा. रासायनिक प्रक्रीये नंतर ट्रायकोडर्माची@5gm/kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा. लागवडी आधी रोपांची VAM + नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचत होते. 

लागण कालावधी 
हंगाम
बियाणे पेरणी  
रोपे लागण
उन्हाळी
जानेवारी २रा आठवडा
फेब्रुवारी
पावसाळी
जुन २रा आठवडा
जुलै-ऑगस्ट
रब्बी किंवा हिवाळी
सप्टेंबर अखेरपर्यंत
ऑक्टोबर-नोव्हेंबर 

लागण पद्धत 
वांग्याची रोपे तयार करणेसाठी गादीवाफे साधारणतः 3 x 2 मीटर आकाराचे तयार करूनवाफा 1 मीटर रुंद व 15 सें.मी. उंच करावा. 
लागवड
अंतर CM
लागवड
अंतर CM
हलक्‍या जमिनसाठी
75 x 75
कमी वाढणाऱ्या जातीसाठी
90 x 75 
मध्यम जमिनीसाठी
90 x 75
संकरित जातीसाठी
90 x 90
भारी जमिनीसाठी
120 x 90
जास्त वाणाऱ्या जमिनीसाठी
120 x 90
वांग्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचा काळा व सोनेरी रंगाचा मल्चिंग पेपर वापरला जातो. काळा रंग आतील बाजूला व चंदेरी/सोनेरी रंग वरच्या बाजूला ठेवून दोन्ही बाजूने पेपर जमिनीत गाडून लागवड केली जाते. 

खतव्यवस्थापन
प्रत्येक वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन घमेले टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत टाकावे. 
रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (एकरी 3 ते 4 टन) शेणखत मिसळून द्यावे. 
रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे. 

वांगी पिकासाठी मध्यम काळ्या जमिनीसाठी एकरी 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश आवश्‍यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे आणि अर्धे उरलेले नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्यानेदुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा. 

रासायनिक खते चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया),20 किलो स्पुरद (125 किलो एसएसपी) व 20 किलो पालाश (34 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकावे. 

लागवडीनंतर 10-15 दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया) प्रती एकर लागवडीनंतर 20 आणि 45 दिवसांनी द्यावे.

पाण्यात विरघळणारी खते चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 5gm/Ltr पाण्यातून फवारा. 

चांगल्या फुलधारणा व फळांचा विकास होण्यासाठी फुलो-यापूर्वी 19:19:19 5gm/Ltr आणि 0:52:34 5gm/Ltr पाण्यातून फळे तयार होताना फवारा. 

सुक्ष्म अन्नद्रव्ये  लागवडीनंतर 40-45 दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ धारणा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + बोरान 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ पोसत असतांना 13:0:45 4 ते 5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अन्नद्रव्यांची कमतरता लोह कमतरता. खालची पाने हिरवीनवी पाने पांढरट दिसतात. नियंत्रण- चिलेटेड आयर्न एकरी 125-150 ग्रॅम 130 लिटर पाण्यातून फवारा संप्रेरके पिकाच्या प्राथमिक वाढीच्या काळात 1Ltr/acre ह्युमिक असिड किंवा 5 kg/acre ग्रॅन्युअल्स वापरल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी ट्रायकोन्टनल होर्मोन 500 ppm हे 200Ltr पाण्यातून 100ml इतक्या प्रमाणात 15दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा फवारा. 

पाणी व्यवस्थापन 
हलके पाणी द्यावे. रोप 5 ते 6 आठवड्यात रोपे 12 ते 15 सें.मी. उंचीची झाल्यावर लागवड करावी. 
उन्हाळी हंगामात पिकाला 5-6 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्या. पावसाळ्यामध्ये पिकाची पाण्याची गरज पाहून पाणी द्यावे. 
ठिबक सिंचन आराखडा - 
प्रथमतः 120 सें.मी. रुंदीचे गादीवाफे व दोन गादीवाफ्यातील अंतर 30 सें.मी. असे गादीवाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक गादीवाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून घ्याव्यात. 
नंतर या लॅटरल लाइनवर 60 सें.मी. अंतरावर 4 लिटर प्रतितास ड्रीपर व दोन ट्रिपरमधील अंतर 50 सें.मी. असेल तर 3.5 लिटर प्रतितास क्षमतेचे ड्रीपर बसवावे. 
दोन लॅटरलमधील अंतर 1.5 मी. ठेवावे. 
लागवड करताना जोड ओळ पद्धतीने करावी. दोन ओळींमधील अंतर 90 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 75 किंवा 60 सें.मी. ठेवून लागवड करावी. 

तण व्यवस्थापन 
लागवडी/पेरणीनंतर लगेच परंतु पिक उगवण्यापूर्वी पेंडीमिथालीन 30 EC (स्टॉंम्प,धानुटॉप)150ml/15Ltr पाण्यातून फवारा. उभ्या पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी एकदा कोळपणी करावी. 

कीड नियंत्रण 
फुलकिडे आणि मावा 
इमीडाक्लोप्रिड70WG(अॅडमायर,अॅडफायर) 5gm किंवा इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) 10 gm/15 Ltr पाण्यातून 12 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा. 

कोळी 
या किडीमुळे उत्पादनात 35% घट होवू शकते.नियंत्रणासाठी स्पीरोमेसिफेन 22.9SC (ओबेरोन,वोल्टेज) 20ml किंवा प्रोपारगाईट 57EC (ओमाइट,सिंबा) 40ml/15Ltr पाण्यातून फवारा 

खोड आणि फळे पोखरणा-या अळ्या 
खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 40% + सायपर मेथ्रिन 4% (रॉकेटप्रोफेक्स सूपर) 350ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC400ml /200Ltr पाण्यातून प्रती एकर फवारा. किंवा खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम EM-1) 5% SG 7gm किंवा क्लोरॅंट्रॅनीलिप्रोल 18.5%SC (कोरॅजन) 6ml किंवा फ्लूबेनडामाइड 39.9SC (फेम) 5ml किंवा फ्लूबेनडामाइड 20WG(फ्लूटॉन टाकूमी)@10gm/15Ltr पाण्यातून फवारा. 

पांढरी माशी 
पांढ-या माशीमुळे उत्पादनात 40% घट होते व विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.नियंत्रणासाठी अ‍ॅसीटामिप्रिड 20SP (धनप्रितरेकॉर्ड) 5gm किंवा डायफेनथीरॉन 50WP(पेगासास,पोलो) 20gm/15Ltr पाण्यातून फवारा 

रोग नियंत्रण 
भुरी 
या रोगामध्ये पानांवर पांढरी भुकटी दिसून येते नियंत्रणासाठी गंधक 500gm प्रती एकर 200Ltr पाण्यातून फवारा. 

रोप मर
थंड,ढगाळ हवानाम,उच्च आर्द्रता ओली माती व रोपांची गर्दी यामुळे मर रोग येण्याची शक्यता आहे. मर रोगामध्ये पिक पूर्णपणे मरून जाते. मेटालेक्सील 8%+ मॅनकोझेब 64%WP (रीडोमीन MZ,कॉरोमील) 2gm/Ltr पाणी याप्रमाणे पेरणीपूर्वी भिजवणी करा. 

बोकड्या रोग 
मावाच्या प्रादुर्भावामुळे पसरतो. 25%WG थायामेथोक्सॅम(क्रूसर,अक्टारा) @ 5gm/15 Ltr ची फवारणी करा. 

करपा
टेब्युकोनॅझोल 25ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारा. पानावरील ठिपके क्लोरोथॅलोनील (कवचजटायु) @ 15gm/10Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल 25% EC (रडारटिल्ट) 10 ml/Ltr ची फवारणी. 

इतर समस्या 
पिवळेपणा 
पिवळेपणा कमी करण्यासाठी प्रोपिनेब 70WP 35gm+19:19:19 75gm/15 Ltr पाण्यातून फवारा. 

सुत्रकृमी 
सुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ थांबते व उत्पादनावर परिणाम होतो. सुत्रकृमी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 3G (फ्युराडन,डाइफ्युरान फ्युरी)@10-15kg/एकर प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार वापरा. 

कापणी आणि काढणी पश्चात तंत्र 
योग्य अवस्था आणि तंत्र 
रोप लावणीनंतर 10-12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घात होते व जुन फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही. 4-5 दिवसांच्या अंतराने 10-12 वेळा वांग्याचे तोडे करावेत.साधारणपणे 3-3.5 महिने वांग्याची काढणी चालू असते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन - 
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या जमिनीत टोमॅटोमिरची भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या ही पिके घेतली असल्यास तिथे वांग्याची लागवड करू नये.

रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम टाकावे. तसेच रोपावर डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडॅक्‍लोप्रीड (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) च्या द्रावणामध्ये बुडवून नंतर लागवड करावी. 
कामगंध सापळे 10 (दहा) प्रतिहेक्‍टर वापरावेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी. 
लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडेमावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे. 

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर 2 आठवड्यांनी 20 मिली मॅलेथीऑन 50% किंवा 2.5 मिली फॉस्फोमीडॉन 85% किंवा डायमेथोएट 30% 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारा. 
लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. या किडीसाठी सायपरमेथ्रीन (25 टक्के प्रवाही) 5 मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 3 मि.लि. 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
वांग्यामधील बोकड्या/ पर्णगुच्छ याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. यासाठी तुडतुड्यांचे वरीलप्रमाणे नियंत्रण करावे.

30 ते 40 टन प्रति हेक्‍टर उत्पादन मिळू शकते.