Search here..

Showing posts with label Farmer. Show all posts
Showing posts with label Farmer. Show all posts

Wednesday, October 30, 2024

पेपर आणि पल्प उद्योग

पेपर आणि पल्प उद्योग हा कृषी आधारित उद्योगाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे जो लाकूड, बांबू आणि इतर तंतुमय वनस्पतींचा वापर करून कागद उत्पादनासाठी पल्पमध्ये रूपांतरित करतो. या उद्योगात पॅकेजिंग, प्रिंटिंग, स्वच्छता उत्पादने आणि विविध औद्योगिक वापरासाठी आवश्यक कच्चा माल तयार केला जातो.

कच्चा माल

  1. लाकूड: मुख्यत्वे सॉफ्टवुड (पाइन, स्प्रूस) आणि हार्डवुड (ओक, युकॅलिप्टस) यांचा वापर केला जातो कारण त्यांचे तंतू कागद उत्पादनासाठी योग्य असतात.
  2. बांबू: बांबूच्या मुबलक संसाधनांचा वापर करण्यासाठी हे एक शाश्वत पर्याय आहे.
  3. कृषी अवशेष: कागद उत्पादनासाठी स्ट्रॉ, बगॅस (साखर कारखान्यातील अवशेष) यांसारख्या पर्यावरणपूरक कच्च्या मालाचा वापर करण्यात येतो.

उत्पादन प्रक्रिया

  1. पल्पिंग: कच्चा माल यांत्रिक किंवा रासायनिक प्रक्रियेतून पल्पमध्ये रूपांतरित केला जातो.
    • यांत्रिक पल्पिंग: तंतू वेगळे केले जातात, ज्याचा वापर न्यूजप्रिंट आणि कमी दर्जाच्या कागदासाठी केला जातो.
    • रासायनिक पल्पिंग: रसायनांचा वापर करून लिग्निन काढले जाते, ज्यामुळे उच्च गुणवत्तेचा मजबूत कागद तयार होतो.
  2. ब्लीचिंग: पल्पला रंग काढण्यासाठी ब्लीच केले जाते, ज्यामुळे पांढरा किंवा हलका रंगाचा कागद तयार होतो.
  3. पेपर बनविणे: पल्पला कागदाच्या शीटमध्ये बदलले जाते, सुकवले जाते आणि दाबून विविध प्रकारचे कागद तयार केले जातात.

पर्यावरणीय आव्हाने

  • वनतोड: लाकडाच्या वापरामुळे वनतोड होते, त्यामुळे शाश्वत साधनांचा वापर आणि पुनर्वापरावर भर दिला जातो.
  • पाण्याचे प्रदूषण: या उद्योगातून निर्माण होणारे सांडपाणी रासायनिक असते, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य प्रक्रिया आवश्यक आहे.
  • कचरा व्यवस्थापन: कागद कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे किंवा पुनर्वापर करणे गरजेचे आहे.

शाश्वतता प्रयत्न

अनेक पेपर आणि पल्प कंपन्या शाश्वत साधनांच्या वापरावर भर देत आहेत, जसे:

  • पुनर्वापरित तंतू वापरणे: यामुळे लाकडावर अवलंबित्व कमी होते.
  • प्रमाणित साधनांचा वापर: वन व्यवस्थापनात शाश्वत साधनांचा वापर केला जातो.
  • पर्यायी कच्चा माल: तंतूसाठी कृषी अवशेष आणि बांबू वापरण्यावर भर दिला जात आहे.

पेपर आणि पल्प उद्योग आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, परंतु पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि दीर्घकालीन टिकाऊपणासाठी इको-फ्रेंडली पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.



The Paper and Pulp Industry is a key segment of agro-based industries that converts plant materials like wood, bamboo, and other fibrous plants into pulp, which is then processed to produce a wide variety of paper products. This industry is fundamental for producing materials used in packaging, printing, hygiene products, and numerous industrial applications.

Key Raw Materials

  1. Wood: Primarily softwoods (pine, spruce) and hardwoods (oak, eucalyptus) are used due to their fibrous qualities.
  2. Bamboo: Especially important in countries with abundant bamboo resources, providing a sustainable alternative to wood.
  3. Agricultural Residues: Materials like straw, bagasse (sugarcane by-product), and other plant residues serve as eco-friendly alternatives.

Production Process

  1. Pulping: Raw materials are converted to pulp through mechanical or chemical processes.
    • Mechanical Pulping: Fibers are physically separated, producing pulp used in newsprint and lower-quality papers.
    • Chemical Pulping: Uses chemicals (e.g., Kraft process) to remove lignin, resulting in stronger paper suitable for high-quality products.
  2. Bleaching: Pulp is bleached to remove color, producing white or light-colored paper.
  3. Paper Making: The pulp is then processed into sheets, dried, and pressed to create different types of paper.

Environmental Concerns

  • Deforestation: Wood sourcing for pulp has been a cause of deforestation; sustainable practices and recycled paper use are increasingly emphasized.
  • Water Pollution: The industry generates wastewater with chemicals, requiring efficient treatment to prevent pollution.
  • Waste Management: Proper disposal or recycling of paper waste is essential to reduce landfill burden.

Sustainability Efforts

Many paper and pulp companies are shifting towards sustainable practices, like:

  • Using Recycled Fiber: Reduces reliance on raw wood.
  • Certified Sourcing: Ensures raw materials are from sustainably managed forests.
  • Alternative Materials: Increasing use of agricultural residues and bamboo for fiber.

The paper and pulp industry plays a crucial role in various economic sectors but faces pressure to adopt eco-friendly practices to ensure long-term environmental balance. 

Thursday, November 27, 2014

अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल

माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल:

ठळक नोंद घेणे योग्य -
१. सर्व शेतकरी बंधुना संस्थेच्या वाटचालीवर विश्वास आहे.
२. कोणत्याही राजकीय विचाराने प्रेरित नसलेली, प्रशासनाच्या सहाय्याने शेतकरी सेवेसाठी वाहुन घेतलेली संस्था पाहुन आश्चर्य वाटले.
३. समाजातील सर्व भेदाभेद बाजुला ठेवुन सर्व शेतकरी समान मानले जातात, हे सर्वांना आवडले.
४. कोणताही स्वार्थ न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन जुडलेले शेतकरी पाहुन सर्वांचे मन भरुन आले.
५. महेश बोरगे आणि भेटलेले शेतकरी व प्रतिनीधी यांच्यातील चर्चा व त्यातुन होणारे भविष्यातील वाटचाल यांमुळे सर्वच शेतकर्यांचे भविष्य उज्वल होईल, असे सर्वांना वाटते.
६. सर्वसमावेशक धोरण व निर्णयप्रक्रिया पाहुन सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य व पाठींब्यावर मर्यादीत न राहता सक्रीय राहण्याचे आश्वासन दिले.
७. भविष्यातील २ ते ३ वर्षांचे नियोजन सांगितले. आतापर्यंत संस्थास्तरावर केलेले कामांची माहिती दिली.
८. नियोजीत शेतकरी विकासाची दिशा कशी असेल, कोणत्या ठिकाणी काय रोख ठेवायचा याबाबत चर्चा झाली.
९. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी देखील शेतकर्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेस सर्व स्तरावरुन मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. १०. एकंदरीत चर्चा केली असता समजले की शेतकर्यांमध्ये संस्थेबद्दल प्रेम आणि आस्था आहे. प्रेम, त्याग आणि आस्था असलेशिवाय कोणतेही कार्य तडीस जात नाही.

सर्व विभागातील शेतकर्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या कळवळ्या त्याबद्द्ल संस्थेच्यावतीने मी आपला आभारी आहे.

”शेतकरी आत्महत्येवर” चर्चा केली असता असे कळाले की
१. आत्महत्या केलेले शेतकरी अगोदर खुप निराश होते.
२. आत्महत्येपुर्वी काही काळ (३ ते ४ महिणे) ते खुपच एकलकोंडे झालेले होते.
३. यांना माहितीची कमतरता दिसुन आली.
४. नैसर्गीक आपत्तीपासुन सावरता येत नसल्याने हळुहळु खचत होते.
५. सावकारी कर्ज वाढले होते व संबंधीत सावकर पैश्याचे जोरावर माणसिक ञास देत होते.
६. काही जणांचे तर कौटुंबिक स्तरावरील वाद टोकावर गेलेले जे कोणाशी व्यक्त करता येत नव्हते.
७. ज्यांच्याकडे मदत मागितली त्यांनी वेळीच मदत न करता मजाक उडवला.
८. राजकीय पार्श्वभुमी समाजाला विघातक वळणावर घेवुन जात आहे.
९. शासकीय अधिकारी जाणुनभुजून ठराविक लोकांनाच मदत करतात.

या सर्व प्रवासादरम्यान केलेल्या निरीक्षणावरुन असे वाटते की -

१. शेतकर्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेणेपुर्वी किमान एकदा आम्हास लिखीत स्वरुपात कळवावे.
२. बदललेली नैसर्गीक अवस्था पाहता विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पिक पद्धतीत बदल करावेत.
३. संस्थेचे पदाधिकारी आपल्या आसपास असतात, त्यांचा सल्ला घ्या किंवा आम्हास कळवा. गोपनियता पाळणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
४. शेतकर्यांना मानधन, पेन्शन, विमा, मेडिकल, मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती व तत्सम सुविधा चालु करणेबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे. याबाबत प्रस्ताव करणे चालु आहे.
५. संघटना मजबुत करणेसाठी जिल्हा, तालुका व गावनिहाय रचना करणे.

आपला विनीत,
महेश बोरगे, सांगली (सावळज)
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Monday, January 23, 2012

शेतीमधील संवाद क्रांतीचे जनक माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली - एक नजर


श्री.पांडुरंग मारुती मोरे, सावळज
'माझीशेतीच्या' माध्यमातून आधुनिक 
शेती करतात..
(सदर फोटो दर्शक आहेत)
जगातील पहिला प्रकल्प, कोणत्याही मोबदल्याशिवाय भारतीय शेतकर्यांना मोबाईल सेवेमार्फत मार्गदर्शन.... 2009 साली प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रारंभ केलेली ही सेवा सध्या प्रचंड प्रमाणात विस्तारली आहे. ही सेवा सर्व शेतकर्यांच्या मोबाईलवर चालु करता येते. यामध्ये शेतकर्यांच्या मोबाईल क्रमांक संदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. याशिवाय शेतकर्यांना त्यांचे मोबाईलवर मोफत स्थानिक हवामान, बाजारभाव, पीक सल्ला, शासकीय योजना देनेचीही सोय करनेत आली आहे. त्याकरिता शेतकर्यांना त्यांची माहिती माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या या लिंकवर कळवावी लागते. सन २००९ पासुन अविरतपणे ही सेवा चालु आहे. कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना ग्रामीण भागातील तरुण महेश बोरगे (Mahesh Borge) यांनी केलेला प्रयोग आज संपुर्ण महाराष्ट्र आणि 5 राज्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही प्रचार -प्रसिद्धी शिवाय चालु आहे.

श्री. अंबिका महिला बचत गट, वज्रचौन्डे
यांचा  'माझीशेती'च्या माध्यमातून
कडधान्ये व्यवसाय ...
(सदर फोटो दर्शक आहेत)

शासकीय योजनांचा सुकाळ, शेतकर्यांची जात्याच संशोधक वृत्ती, वेगवेगली कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रियन शेतकरी आपल्या शेतातुन उत्पादन काढीत आहेत पण ब्रिटिश कालापासून व्यापारी अणि शेतकरी जनता यांचेत समन्वय नसल्यामुले आजही शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या करिता माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या शेतकर्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव आणि व्यापारी, करखानदारयांना चांगल्या प्रतिचे, उच्च दर्जाचे शेतमाल देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. याशिवाय शेतकर्यांना वेगवेगळ्या बाजारपेठेतील अद्यावत माहिती उदा. आवक, प्रति क्विंटल दर इ. ही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. 



कृषितद्न्य श्री. शंकरराव निंबालकर
यांचे बागेतिल भाजीपाला...
(सदर फोटो दर्शक आहेत)
  
जागतिक बाजारपेठेत पाश्चात्य देशांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला जास्त मागणी आहे. भारतातील आणि पाश्चात्य देशातील उत्पादनात काहीही फरक नाही. जो फरक आहे तो उत्पादनासाठी अमलात आनल्या जाणार्या पद्धतिमध्ये. भारतीय शेतिला सेवा पुरवठा करणारे बाहेरच्या देशातुन सेंद्रिय खते, औषधे मागवतात आणि त्यामध्ये पूर्वापर चालत आलेल्या सवयींनुसार प्रमाण वाढवुन आकर्षक आवरण वापरून बाजारात विक्रिला पाठवतात, यामध्ये नुकसान फक्त शेतकर्यांचे होते. यावर उपाय म्हणजे शेतकर्यांनी एकत्र येवून शेतीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पडतालुन खात्री करुन मगच वापराव्यात. तसेच बाहेरच्या देशातुन काही जैविके मागवायाची झाल्यास स्वत:  मागवावित. याही बाबतीत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत मार्गदर्शन केले जाते. एकंदरित सर्व शेतकर्यांनी त्यांची वार्षिक मागणीनुसार आणि गरजेनुसार सर्व एकत्र खरेदी करुन त्याचे वाटप केले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात खरेदी झालेमुले बरीच बचत होते आणि शेतकर्यांचा फायदा होतो.

शेतकरी संघटन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने गेले पाच वर्षांत संस्था महाराष्ट्र राज्यातील तळागाळात पोहचुन भारतीय कृषि व्यवस्थापन क्षेञामध्ये खारीचा वाटा उचलत आहे यात शंका नाही.