माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल:
ठळक नोंद घेणे योग्य -
१. सर्व शेतकरी बंधुना संस्थेच्या वाटचालीवर विश्वास आहे.
२. कोणत्याही राजकीय विचाराने प्रेरित नसलेली, प्रशासनाच्या सहाय्याने शेतकरी सेवेसाठी वाहुन घेतलेली संस्था पाहुन आश्चर्य वाटले.
३. समाजातील सर्व भेदाभेद बाजुला ठेवुन सर्व शेतकरी समान मानले जातात, हे सर्वांना आवडले.
४. कोणताही स्वार्थ न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन जुडलेले शेतकरी पाहुन सर्वांचे मन भरुन आले.
५. महेश बोरगे आणि भेटलेले शेतकरी व प्रतिनीधी यांच्यातील चर्चा व त्यातुन होणारे भविष्यातील वाटचाल यांमुळे सर्वच शेतकर्यांचे भविष्य उज्वल होईल, असे सर्वांना वाटते.
६. सर्वसमावेशक धोरण व निर्णयप्रक्रिया पाहुन सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य व पाठींब्यावर मर्यादीत न राहता सक्रीय राहण्याचे आश्वासन दिले.
७. भविष्यातील २ ते ३ वर्षांचे नियोजन सांगितले. आतापर्यंत संस्थास्तरावर केलेले कामांची माहिती दिली.
८. नियोजीत शेतकरी विकासाची दिशा कशी असेल, कोणत्या ठिकाणी काय रोख ठेवायचा याबाबत चर्चा झाली.
९. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी देखील शेतकर्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेस सर्व स्तरावरुन मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. १०. एकंदरीत चर्चा केली असता समजले की शेतकर्यांमध्ये संस्थेबद्दल प्रेम आणि आस्था आहे. प्रेम, त्याग आणि आस्था असलेशिवाय कोणतेही कार्य तडीस जात नाही.
सर्व विभागातील शेतकर्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या कळवळ्या त्याबद्द्ल संस्थेच्यावतीने मी आपला आभारी आहे.
”शेतकरी आत्महत्येवर” चर्चा केली असता असे कळाले की
१. आत्महत्या केलेले शेतकरी अगोदर खुप निराश होते.
२. आत्महत्येपुर्वी काही काळ (३ ते ४ महिणे) ते खुपच एकलकोंडे झालेले होते.
३. यांना माहितीची कमतरता दिसुन आली.
४. नैसर्गीक आपत्तीपासुन सावरता येत नसल्याने हळुहळु खचत होते.
५. सावकारी कर्ज वाढले होते व संबंधीत सावकर पैश्याचे जोरावर माणसिक ञास देत होते.
६. काही जणांचे तर कौटुंबिक स्तरावरील वाद टोकावर गेलेले जे कोणाशी व्यक्त करता येत नव्हते.
७. ज्यांच्याकडे मदत मागितली त्यांनी वेळीच मदत न करता मजाक उडवला.
८. राजकीय पार्श्वभुमी समाजाला विघातक वळणावर घेवुन जात आहे.
९. शासकीय अधिकारी जाणुनभुजून ठराविक लोकांनाच मदत करतात.
या सर्व प्रवासादरम्यान केलेल्या निरीक्षणावरुन असे वाटते की -
१. शेतकर्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेणेपुर्वी किमान एकदा आम्हास लिखीत स्वरुपात कळवावे.
२. बदललेली नैसर्गीक अवस्था पाहता विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पिक पद्धतीत बदल करावेत.
३. संस्थेचे पदाधिकारी आपल्या आसपास असतात, त्यांचा सल्ला घ्या किंवा आम्हास कळवा. गोपनियता पाळणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
४. शेतकर्यांना मानधन, पेन्शन, विमा, मेडिकल, मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती व तत्सम सुविधा चालु करणेबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे. याबाबत प्रस्ताव करणे चालु आहे.
५. संघटना मजबुत करणेसाठी जिल्हा, तालुका व गावनिहाय रचना करणे.
आपला विनीत,
महेश बोरगे, सांगली (सावळज)
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444