माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
दि. 22/01/2015
घराच्या गच्चीत हरितगृह उभारून घेतले परदेशी भाज्यांचे उत्पादन... मनीष चांदेकर
घराच्या गच्चीवरील 1500 चौरस फूट जागेत हरितगृह उभारून, त्यात सहा महिन्यांपासून परदेशी भाजीपाल्यांचे यशस्वी उत्पादन पुण्यातील मनीष चांदेकर यांनी घेतले आहे. शहरातील कमी जागेमध्ये त्यांची शेती करण्याची प्रबळ इच्छा पूर्ण झाली आहे.पुणे येथील मनीष चांदेकर हे हॉटेल व्यवसायाशी संबंधित काम करतात. त्यातून त्यांनी परदेशी (एक्झॉटिक) भाज्यांविषयी समजले. कुतूहलातून परदेशी भाज्यांविषयी लागवडीपासून सर्व बाबींची माहिती गोळा केली. मात्र उत्पादन घेण्यासाठी शेती नसल्याने माहिती असली तरी लागवड करणे शक्य नव्हते. याच दरम्यान सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी)तर्फेआयोजित"एक्झॉटिक भाजीपाला उत्पादन' कार्यशाळेमध्ये सहभागी झाले. त्या ठिकाणी अधिक ज्ञानासोबत अन्य लोकांशी ओळखीही झाल्या. त्यातून टेरेसवरील 1500 चौरसफूट जागेमध्ये भाज्यांची लागवड करण्याची प्रेरणा मिळाली.गच्चीवर उभारले पॉलिहाउसघराच्या गच्चीवर फॅब्रिकेशनद्वारा हरितगृहाचा लोखंडी सांगाडा तयार केला. त्यावर पॉलिथिन पेपरचे छत व चारही बाजूंनी शेडनेट लावले. घरावर शेती करायची असल्याने पुढील गळती टाळण्यासाठी व वजन कमी राहण्यासाठी मातीशिवाय शेती करण्याचा विचार केला. त्यासाठी पर्याय म्हणून कोकोपीटची ग्रो बॅग वापरण्याचे ठरले. मात्रया बॅगेची उपलब्धता पुण्यामध्ये नाही. गुजरातमधील एका कंपनीकडे त्याचे दर अधिक होते. त्यानंतर कोईमतूर येथील कंपनीत दर योग्य असल्याचे कळले, तर प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत किमान एक हजार बॅग घ्याव्या लागतील, असे लक्षात आले. मात्र त्यांना घराच्या गच्चीवरील हरितगृह उभारणीविषयी सांगून एक हजार बॅग घेणे शक्य नसल्याचे पटविले, तेव्हा कुठे त्यांना 100 बॅग मिळाल्या.- हरितगृहामध्ये सिंचनासाठी ठिबक व तापमान, आर्द्रता नियंत्रणासाठी फॉगर यंत्रणा बसविली आहे. पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर चेरी टोमॅटो आणि काकडीची लागवड केली. प्रकल्पाबाबत समजल्यावर एका कंपनीने हे बियाणे मोफत दिले.पॉलिहाउस उभारणीसाठी आलेला खर्चलोखंडी सांगाडा - 20 हजार रुपयेशेटनेट आणि पॉलिथिन पेपर - 30 हजार रुपयेठिबक आणि फॉगर्स - 18 हजार रुपयेकोकोपीट बॅग्ज - 2 हजार 500 रुपयेपाणी टाकी, पंप व अन्य - 12 हजार रुपयेअन्य खर्च - 8 हजार रुपये.............एकूण खर्च - 90 हजार 500 रुपयेपॉलिहाउसमधील विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन,विक्रीतून मिळालेले उत्पन्न (एप्रिल ते डिसेंबर)भाजीचा प्रकार---रोपे संख्या---उत्पादन---प्रतिकिलो दर---उत्पन्नहिरवी काकडी---70---180 किलो---25 रुपये---4500पांढरी काकडी---90---180 किलो---25 रुपये---4500चेरी टोमॅटो---15---40 किलो---100 रुपये---4000ब्रोकोली---30---15 किलो---80 रुपये---1200लेट्यूस---30---9 किलो---60 रुपये---580येथे मिळाली बाजारपेठउत्पादन तर सुरू झाले, आता धडपड सुरू झाली विक्रीसाठी. रोपांची संख्या कमी, त्यामुळे एकूण उत्पादन कमी. मोठ्या व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर परिसरातील भाज्या विक्रेत्याकडे सेंद्रिय परदेशी भाज्या म्हणून विक्रीसाठी नमुने दिले. येरवडा, विमाननगर परिसरातील हॉटेल, घरगुती ग्राहकांकडून त्याची खरेदी चांगल्या दरानेहोत असल्याने हळूहळू विक्रीची समस्या सुटत गेली.दोन बादल्या पाणी पुरेसेचांदेकर यांच्या पॉलिहाउसमध्ये कोकोपीट बॅगेमध्ये एकूण 240 लावली होती. त्यातून बाष्पीभवन होत नाही. तसेच संपूर्ण पाण्याचावनस्पतीसाठी वापर होत असल्याने फारच कमी पाणी लागते. दिवसभरात दोन बादल्या म्हणजेच 30 ते 40 लिटर पाणी पुरेसे होते.- उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी फॉगर्सची व्यवस्था केली आहे.- ठिबक सिंचनामुळे विद्राव्य खते देता येतात. कीडनियंत्रणासाठी दहा दिवसांनी निंबोळी तेल फवारल्याचे चांदेकर यांनी सांगितले.- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली शेतीची आवड जोपासणे शक्य झाले.- घरगुती सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ताज्या भाज्यांची उपलब्धता.- मोकळी जागेचा, वेळेचा सदुपयोग झाला.- लहान मुलांना रमण्यासाठी बाग.तुम्हीदेखील हे करू शकताग्रामीण भागातील परसबागेप्रमाणे शहरी भागातही गॅलरी, गच्ची येथील जागेमध्ये भाज्यांचे उत्पादन घेता येते. त्या दिशेने चांदेकर प्रयत्न करीत आहेत. हरितगृहाच्या उभारणीची गरज नाही. कोकोपीट वापरातून 6 बाय 2 अशा आकाराचा गादीवाफा करूनही उत्पादन घेता येते. थोड्याशा सामग्रीतून शेडनेट व अन्य घटकांतून लहान आकाराचे हरितगृहही तयार करता येते. त्यात टोमॅटो, मिरची, वांगी,मेथी, कोथिंबीर, कांदा, आले, लसूण यासारख्या भाज्या घेता येतील, असे मनीष चांदेकर यांनी सांगितले.मी कोकणातील काही रिसॉर्ट व्यावसायिकांना पुण्यातून ग्राहक उपलब्ध करून देण्याचे काम करतो. फावल्या वेळेमध्ये "घरची शेती' पाहतो. "एसआयएलसी'च्या कार्यशाळेमध्ये ओळख झालेल्या रवींद्र सावंत यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत मिळाली.- मनीष चांदेकर, 7755955097.
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444