Search here..

Saturday, May 30, 2015

वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी द्राक्ष बागेमध्ये प्लॅस्टिक आच्छादन हा चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात, त्यावर शास्त्रीय पद्धतीने अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. - डॉ. जे. एम. खिलारी, रोहीत पांढरे

वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी द्राक्ष बागेमध्ये प्लॅस्टिक आच्छादन हा चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात, त्यावर शास्त्रीय पद्धतीने अधिक अभ्यास होण्याची गरज आहे.
- डॉ. जे. एम. खिलारी, रोहीत पांढरे

गेल्या दोन-चार वर्षांपासून राज्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पाऊस, दव, धुके, अति थंड किंवा अति उष्ण तापमानाचे चढ-उतार यामुळे मोठे नुकसान होत आहे. 2014-15 मध्ये तर ऑक्टोबर छाटणीनंतरच्या द्राक्षमण्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात पाऊस पडल्याने नुकसान वाढत गेले.

नुकसानीचा अंदाज आणि स्वरूप -
राज्यातील चारही द्राक्ष विभागामध्ये सुमारे 30 ते 70 टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले. नुकसानीमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भावाचे दृश्य नुकसान सर्वत्र कमी अधिक होते. मात्र प्रत्यक्ष नुकसानीमध्ये द्राक्षमणी, घड हे केंद्रस्थानी असून, घड कूज (Early bunch stem necrosis) व घड आणि मण्यांच्या देठातील जळ (Bunch stem necrosis) सारख्या विकृतीचा प्रादुर्भाव अधिक असतो. या प्रादुर्भावापेक्षाही बेरी क्रॅकिंगसारख्या साध्या वाटणाऱ्या विकृतीने मोठे नुकसान केले. त्यावर केलेल्या उपाययोजना फारशा उपयुक्त ठरल्या नाहीत. याउलट काढणीपूर्व, काढणी आणि (www.facebook.com/agriindia) काढणीपश्चात द्राक्षामध्ये अनेक रोगांचा शिरकाव झाल्याने द्राक्ष पिकविण्याप्रमाणेच विकणेही अवघड होऊन बसले. या कालावधीत द्राक्ष बागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादनाविषयी झालेले मोजके प्रयोग व त्याचे निष्कर्ष खूपच आशादायी वाटले.

प्लॅस्टिक आच्छादन -
- हवामानाच्या लहरीपणाचे फटके द्राक्ष शेतीला अनेक देशांमध्ये बसत आहेत. अशा स्पेन, इटली, चिली, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इस्राईल यांसारख्या देशांनी द्राक्षवेलींची हानी टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा मार्ग स्वीकारला आहे.

- आपल्याकडेही या दशकाआधी बारामती व नाशिक येथे काही शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक शेड हाऊसमध्ये हे प्रयत्न केले. याशिवाय जाणोरी (जि. नाशिक) येथील काही शेतकऱ्यांनी (mazishetifoundation@gmail.com) प्रयोग चालू ठेवले आहेत. या सर्व प्रयत्नांना प्रगत देशांमधील प्रगतीची पुरेशी जोड नसल्याने अंशतः यश मिळाले.

- मागील वर्षी नाशिक येथे स्पेन, इटली या देशांमधील प्रयोगाच्या धर्तीवर प्लॅस्टिकचा आच्छादनाचा वापर करून काही प्रयोग घेतले गेले. त्याचा फायदा होताना दिसून आला.

प्लॅस्टिक आच्छादनाचे दोन प्रमुख कार्ये आहेत.
1) पाऊस, गारा, ऊन, वारा, दव, धुके यापासून संरक्षण.
2) अनैसर्गिक किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेलीची वाढ आणि विकास यांना चालना देणे.

त्यामध्ये जल औष्णिक (Thermo Hydrolic) घटकांचा समावेश होतो. थोडक्यात, अशा वातावरणाचे दुष्परिणाम होण्याऐवजी वेलीची / घडांची वाढ आणि विकास चांगला होणे.

आच्छादन वापराचे फायदे -
ग्राफिकसाठी -
1) आच्छादनाच्या प्लॅस्टिक भरपूर सूर्यप्रकाश आत येण्यासाठी भरपूर पारदर्शक असावे. त्याचबरोबर जमिनीवरून परावर्तित होणाऱ्या लांब अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांना ते कमीत कमी पारदर्शी असावेत. यालाच "स्क्रीन इफेक्ट' असे म्हणतात.

2) वातावरणातील लांब अवरक्त किरणे टाळली गेल्याने वेलींवर औष्णिक ताण पडत नाही.

3) धुक्यापासून संरक्षण - समशीतोष्ण कटिबंधातील सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष शेतीचे सतत नुकसान होते. धुके तसेच अधिक तापमानामुळे उकड्या तसेच जळ अशा अनेक समस्या उद्भवतात. सन स्कॉर्चिंग प्लॅस्टिक आच्छादनामुळे कमी होण्यास मदत होते.

4) पानांचे कार्यक्षमतेत, साखर निर्मितीत, रंगनिर्मितीत वाढ -
वातावरणातील अन्य घटकांच्या तुलनेमध्ये प्रकाशाचे वेलीवर सर्वाधिक परिणाम होतात. द्राक्षवेलीतील शारीरिक क्रियांमधील बरेचसे विकर (enzymes) प्रकाशामुळे प्रभावीत होत असतात. प्रकाशातील सूक्ष्म बदलही अचूकतेने टिपत असतात. वेलीची पाने वातावरणातील प्रकाशाच्या विद्युत पट्ट्यामधील (Electro magnetic spectrum) दृश्य विभागातील (www.mazisheti.org) प्रकाशच प्रामुख्याने घेत असतात. दृश्य विद्युत चुंबकीय पट्ट्यातील 400 ते 700 नॅनोमीटर वारंवारितेचा प्रकाश फक्त हरितद्रव्य निर्मितीसाठी उपयोगात येतो. या पट्ट्यातील प्रकाशास हरितद्रव्य निर्मितीसाठी क्रियाशील प्रकाश (Photosynthetic Active Radiation) म्हणतात. बाहेरील वातावरणात पानांवर पडणाऱ्या या प्रकाशातील 85 ते 90 टक्के प्रकाश वेलींची पाने शोषण करतात. उरलेला 6 टक्के प्रकाश परावर्तित होतो. या परावर्तित प्रकाशाला बाहेर जाण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन अधिकाअधिक पारदर्शक असले पाहिजे. आच्छादनामुळे वेलींवरील पानांचे आकारमान वाढते.
त्यामुळे पानांचे क्षेत्रफळ - उत्पादन यांचे गुणोत्तर वाढते. फोटो सिन्थेटिक ऍक्टिव रेडिएशन (पीएआर) वाढते. प्रकाश संश्लेषण वाढते, पानांमधील शर्करा (अन्न) वाढते. साखर भरण्याच्या टप्प्यामध्ये अशा द्राक्षात लवकर आणि वेगाने गोडी वाढते. आकारमान आणि वजन वाढते.

- द्राक्ष वेलीमध्ये पूर्वी साठवलेल्या अन्न साठ्याचा वापर घडांची वाढ व विकासासाठी करता येतो.
- बाहेर अधिक उष्णता असल्यास प्लॅस्टिक आच्छादनाखाली काही अंशी ती कमी राहते, तर बाहेर कमी तापमान असेल तर आत काही अंशी वाढ झालेली असते. परिणामी, साखरेची निर्मिती आणि रंग निर्मिती या क्रिया सुलभरीत्या चालू राहतात. बाहेरील अधिक तापमानात (32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) दोन्ही क्रिया मंदावतात आणि नंतर थांबतात. सोबतच अधिक तापमानामुळे होणारे सनस्कॉर्चिगही टाळले जाते.

5) प्लॅस्टिक आच्छादनामुळे प्रकाशात बदल ः
प्लॅस्टिक आच्छादनामुळे आत आलेला प्रकाश कॅनोपीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर होते. याला प्रकाशाच्या वर्णावलीची विभागणी (Spatial Deistribution) असे म्हणतात. ही विभागणी प्लॅस्टिक आच्छादनामुळे सारखी होते. आच्छादनामुळे योग्य तरंगलांबीचा प्रकाश येतो. परिणामी, वेलीच्या सभोवती असलेल्या सूक्ष्म वातावरणात (Micro Climate) बदल होतो. पर्यायाने शाकीय वाढ (Vegtative) आणि पुनरुत्पादनाचे चक्र (reproductive cycle) यात अपेक्षित बदल होतात. प्लॅस्टिक आच्छादनामुळे प्रकाश स्थिर राहतो. याउलट कार्बन- डाय-ऑक्साईड (CO2) मात्र प्रसरित (डिफ्यूज) होतो. प्लॅस्टिकखालील पर्णसंभारात कार्बन- डाय- ऑक्साईडचे प्रमाण वाढते. तो कॅनोपीत सगळीकडे पसरतो. कार्बन- डाय- ऑक्साईडचा वापर वेली अधिक कार्यक्षमपणे करू शकतात. परिणामी, पानात हरितद्रव्य निर्मिती कार्यक्षमपणे चालते. यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाची निवड, टाकण्याची वेळ, साधावयाचा परिणाम यांचा मेळ मात्र बसला पाहिजे.

6) तोडणीनंतर द्राक्ष मण्यांचे आयुष्य वाढते.

7) काढणीपूर्व अवस्थेपासून पक्वता व काढणीपश्चात अवस्थेमध्ये रोग व किडीपासून संरक्षण मिळते.

8) पाण्याची बचत होते.

9) द्राक्ष बागेतील क्रॅकिंग, बंच स्टेम नेक्रोसिस, अर्ली बंच स्टेम नेक्रोसिससारख्या विकृतीवर नियंत्रण मिळवता येते. त्याचप्रमाणे उकड्या, सनस्कॉचिंगसारख्या किचकट विकृतींना लगाम घालता येतो.

10) अपेक्षेप्रमाणे पक्वता लांबविता येते किंवा लवकरही आणता येते.

सारांश -
आपल्या वातावरणात योग्य अशा प्लॅस्टिक आच्छादनाची निवड करून वापरल्यास निश्चितच फायदे होतात.

- आपत्कालीन हवामानाचे परिस्थितीत नुकसान टळेल. सोबतच वेलीसाठी शरीर शास्त्रीय फायदे होत असल्याने उत्पादन आणि दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. अर्थात, या बाबतीमध्ये शास्त्रीय पातळीवर प्रयोग व अभ्यासाची गरज आहे.

प्रतिक्रिया -
आमच्या थॉमसन सीडलेस जातीच्या द्राक्ष बागेमध्ये 22 ऑक्टोबर 2014 रोजी छाटणी केली. त्यानंतर त्यावर 23 नोव्हेंबर 2014 ला प्लॅस्टिक आच्छादन टाकले. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात पाच वेळा मुसळधार पाऊस होऊनही आमचे द्राक्ष सुरक्षित राहिले. त्याला कुठेही क्रॅकिंग आले नाही.
उलट आच्छादनाखाली पानांचे आकारमान वाढले व पाने खरड छाटणीपर्यंत हिरवीगार राहिली. यामुळे द्राक्ष मण्यांचे आकारमान व वजन वाढलेले दिसले. मण्यांमध्ये साखरेचे प्रमाणही वाढलेले आढळते.
- सोपान चौधरी, मु.पो. दीक्षी (ओझर मिग), ता. निफाड, जि. नाशिक

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444