जमीन
चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.
लागवड
लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले भेट कलम किंवा शेंडा कलम निवडावे. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये चांगली माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करावी.
लागवड केल्यानंतर पाऊस सुरु झालेवर आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अशी दोन भागात विभागुन 150: 100: 100 NPK खतांची मात्रा द्यावी.
चिकूच्या झाडाला नेहमी पाणी मिळाले पाहिजे, परंतु पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्या. पाणी जास्त झाले तर फुले आणि फळांची गळ होते पाणी ठिबक पद्धतीने द्यावे.
कीड नियंत्रण
बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळांचे उत्पादन घटते, फळांची गुणवत्ताही खालावते. बागेची स्वच्छता ठेवावी. बागेमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोचण्यासाठी गरजेनुसार फांद्यांची छाटणी करावी. कीडलेली तसेच गळलेली फळ नष्ट करावित. ०१ मि.लि. प्रोफेनोफॉस (40 टक्के प्रवाही) किंवा ०१ मि.लि. डेल्टामेथ्रीन (2.8 टक्के प्रवाही) किंवा ०१ मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (05 टक्के प्रवाही) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीडनाशक आलटून पालटून फवारावे.
कळी पोखरणारी अळीचे नियंत्रण
नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि मे जून महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कळी पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव झाला तर फलधारणा होत नाही.
किडीच्या नियंत्रणासाठी 0.45 ग्रॅम इनामेक्टीन बेन्झोएट (पाच एसजी) किंवा एक मि.लि. डेल्टामेथ्रीन (2.8 ईसी) किंवा एक मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (पाच ईसी) किंवा एक मि.लि. प्रोफेनोफॉस (40 ईसी) प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी पन्नास टक्के फुले आल्यानंतर करावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. कीटकनाशक निवडताना कोणतेही कीटकनाशक लागोपाठच्या फवारणीत परत वापरू नये. फवारणीपूर्वी झाडावर तयार असलेली फळे काढून घ्यावीत.