आवळा
जमीन
आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.
लागवड
लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते.
वाण / बियाणे
लागवडीसाठी कृष्णा, कांचन, NA-7, NA-10, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी.
खत व्यवस्थापन
पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडास प्रति वर्ष (पहिले 10 वर्षे)
शेनखत - 40 ते 50 किलो
नत्र - 500 ग्रॅम (दोन हप्त्यात विभागुन द्यावे.)
स्फुरद - 250 ग्रॅम
पालाश - 250 ग्रॅम
कीड व रोग नियंत्रण
साल खानारी आळी, खोड कीडा, खवले कीड आणि अनार बटरफ्लाय या किडिंचा प्रादुर्भाव होतो.
यासाठी 10 लीटर पाण्यात मिसळून फवारनी करावी.
पहिली फवारनी प्रवाही मोनोक्रोटोफोस (36%) 15 मिली किंवा प्रवाही लम्ब्डा सायहॅलोथ्रिन (5%) 6 मिली फवारावे.
दुसऱ्या फवारनीसाठी प्रवाही प्रॉफेनोफोस (50%) 10 मिली फवारावे.
तीसरी फवारनीसाठी पाण्यात मिसलणारी कार्बरील पावडर (50%) 20 ग्रॅम किंवा प्रवाही लम्ब्डा सायहॅलोथ्रिन (5%) 6 मिली फवारावे.
तांबेरा (करपा) नियंत्रणासाठी 1% बोर्डोमिश्रण किंवा 0.2% मेंकोजेब हे बुरशीनाशक फवारावे.
फांदीमर या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या फांद्या कापून टाकाव्यात आणि त्यावर बोर्डोपेस्ट लावावी.