लिंबू
जमीन
कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी. साधारणपणे 6.5 ते 7.5 सामू व क्षारांचे प्रमाण 0.1 टक्क्यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली असते.
लागवड
हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी. लागवड 6 x 6 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खोदून उन्हात चांगले तापू द्यावेत. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात दिड किलो सिंगल सुपर फॉस्फेट, पाच ते सहा घमेली चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड व चांगल्या पोयटा मातीने खड्डे भरावेत. त्यानंतर जातिवंत रोपांची लागवड करून योग्य व्यवस्थापन करावे.
नर्सरी
विक्रम, प्रमालिनी, साई सरबती, फुले शरबती
आंतरपीके
कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू, मोहरी