Search here..

Wednesday, January 13, 2016

जायफळ

माहिती अद्ययावत करणे चालू आहे.

लागवड 
जायफळाची लागवड 50 टक्के सावली राहील अशा ठिकाणी करावी. नारळ, सुपारीच्या बागांमध्ये 6 x 6 किंवा 7.5 x 7.5 मीटर अंतरावर 90 x 90 x 90 सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत.

बियाणे / वाण
लागवडीसाठी कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती या जाती निवडाव्यात.

जून महिन्याच्या सुरवातीस एक वर्ष वयाचे कलम खड्ड्याच्या मधोमध लावावे. मादी कलमांची लागवड केली असल्यास पाच ते सहा टक्के नर कलमे किंवा दहा रोपे परागीकरणासाठी व फळधारणेसाठी बागेत लावावीत. कलमांची लागवड केल्यानंतर कलमाच्या जोडाखालील येणारी फूट सतत काढावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे. 

ख़त व्यवस्थापन 
खड्डे भरताना वरच्या थरात सुपीक माती आणि दोन घमेले शेणखत, एक किलो नीमकेक, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरावे.